Thursday, 23 March 2023

आधारभूत किंमत व्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर रक्कम

 आधारभूत किंमत व्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना

प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर रक्कम

- मंत्री रवींद्र चव्हाण.

मुंबई, दि. 23: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत व्यतिरिक्त प्रति हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.


सदस्य राजू कारेमोरे, प्रकाश आबिटकर, सुनील भुसारा आणि अनिल देशमुख यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेसंदर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.


मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम देण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेअंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत आहे. डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मार्यादेत प्रति हेक्टर 15 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.


०००००

कोणत्याही शासकीय शाळेतील वीज पुरवठा खंडित होणार नाही

 कोणत्याही शासकीय शाळेतील वीज पुरवठा खंडित होणार नाही


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

मुंबई, दि. २३ : "शासकीय शाळांमधील वीजदेयके न भरल्याने वीज पुरवठा खंडित होणे ही बाब दुर्दैवी आहे. या पुढे कोणत्याही शासकीय शाळेतील वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येईल," असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य सुनील राणे, संजय सावकारे, अशोक चव्हाण, ॲड.आशिष शेलार, दिलीप वळसे- पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील वीज पुरवठा याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.


मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शाळांमधील वीज पुरवठा खंडित होणार नाही ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळेच वीज पुरवठा खंडित झाल्यावर तातडीने वीज मंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांशी बोलणे करुन यापुढे असे होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. थकित वीज देयकांसाठी प्राथमिक शाळांसह सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडित करु नये, यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल.


शाळांना पुरविण्यात येणाऱ्या विजेसाठी घरगुती वीज दरापेक्षा कमी दर लावला जातो. सध्या सर्व शासकीय शाळांमधील जानेवारी २०२३ पर्यंतची वीज देयके अदा करण्यात आली आहेत. येणाऱ्या काळात सौरऊर्जेवर शाळा सुरु करण्यावर शासनामार्फत भर देण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनाशी निगडित सार्वजनिक बाबी महत्वाच्या असतात. त्यामुळे थकीत वीज देयकांसाठी, अशा सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार नाही याची काळजी यापुढे घेण्यात येईल. तसेच येत्या काही दिवसात या विषयाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.


०००००

खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भाततज्ज्ञांची समिती नियुक्त करणार

 खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भाततज्ज्ञांची समिती नियुक्त करणार


-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


मुंबई, दि. २३ : विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अंवलबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण राहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.


सदस्य समाधान अवताडे, राजेश टोपे, राहुल कूल, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वाघोली येथील 'द लॉक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल'ने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्याना डांबून ठेवल्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.


मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, द लॉक्सिकॉन इंटरनॅशनल शाळेतील साधारण २०० मुलांना शाळा सुटल्यानंतर शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने घरी सोडण्यात आले नव्हते. यानंतर या मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यात येईल.


 या शाळेच्या संदर्भात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार झालेली असताना एकही पालक पोलिस ठाण्यात आलेले नाही. वास्तविक विनाअनुदानित शाळेचे शुल्क किती असावे हे राज्य शासन ठरवत नसल्याने अनेकदा विना अुनदानित शाळांमधील शुल्क संदर्भात अनेक तक्रारी राज्य शासनाकडे येत असतात. येणाऱ्या काळात याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती याबाबत काम करेल. तसेच या प्रश्नाबाबत अधिवेशन संपल्यानंतर एक बैठकही घेण्यात येईल.


केंद्र सरकारने राईट टू एज्युकेशन आणल्यानंतर विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा या आरक्षित ठेवण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने तेथील स्थानिक गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा हा‍ नियम आहे. केंद्र सरकारकडून आरटीई अंतर्गत निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

सवलत द्या आम्हालाही


 

शोभा यात्रा अलिबाग

 


। श्री स्वामी समर्थ ।।*

 *।। श्री स्वामी समर्थ ।।*


*चैत्र शुक्ल द्वितीया - दिन विशेष - अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन { जन्मोत्सव }.*


*स्वामी समर्थ प्रकटदिन आपल्या सर्वांसाठी खुप मोठी महापर्वणी आजच्याच दिवशी हा 'अक्कलकोटस्थ परब्रह्म' आपल्या सर्वांच्या पुर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अंनत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रगट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हदयात ममता निर्माण करणारा, , तेजरुपी मायासागराचा धनी असलेला, आपला 'श्री स्वामी देव' याच चैत्र शुध्द द्वितिया शके १०७१ { इ. स. १९४९ } मध्ये छेली या खेडे गावी प्रगट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इ. स. १९४९ ते १८७८ हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु १९४९ पुर्वी आणि १८७८ नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठिण कार्य आहे. तरी सुध्दा दया सागर स्वामींनाच शरण जावून आपण स्वामींचा प्रगट दिन सोहळा साजरा करू या.*


*भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.*


*आजचा राहुकाळ :- दुपारी - १.३० ते ३.०० वाजे पर्यंत.*


🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹


*।। श्री स्वामी समर्थ ।। शुभ प्रभात ।।*

*हे ईश्वरा ! सर्व जीवसृष्टी सुखी राहो ! सर्वांचे जीवन रोगमुक्त राहो ! आम्हा सर्वांना कुशलता दे ! सर्व दु:खमुक्त राहोत !*

*हे ईश्वरा ! सर्वत्र शान्ति असु दे !*

आरोग्य संदेश -त्रिकटू चूर्ण..*

 *त्रिकटू चूर्ण..*


 आयुर्वेद हे विशाल ,सम्रुद्ध, आहे.. अनेक मौलिक औषधि यात आहे. असेच एक महत्त्वाचे औषध..त्रिकटु चूर्ण आहे..सुंठ, काळे मिरे, व पिंपळी. यांचे समभाग घेऊन तयार होते..सुंठ हि नवीन पेशी तयार करते, पिंपळी फुफ्फुसे स्वच्छ करून बळकट करते,पचन संस्था मजबूत करते, श्वसनमार्गाचे विकार बरे करते, काळे मिरे गॅस, अपचन, अजिर्ण, दूर करून अन्नपचन चांगले करते, एकूणच त्रिकटु चूर्ण हे मल्टिविटामिन आहे.रोगप्रतिकार शक्ती वाढवते...या चूर्णाबद्दल *भावप्रकाश* मध्ये असे वर्णन आहे..


                  त्र्यूषणं दीपनं हन्ति श्वास-कास त्वगामयान्*

                   गुल्म मेह कफ स्थौल्य मेद: श्लीपदपीनसान्*.

थोडक्यात त्रिकटु चूर्ण अग्नी मांद्द, पीनस( सर्दि खोकला),गुल्म.वायू. मेह त्वचा विकार, खोकला, कुष्ठरोग, आमदोष, हत्ति रोग, गलरोग, बरे करते...


आपण याचे फायदे जाणून घेऊ या...

👇

  त्रिकटु चूर्ण कफ हर आहे अनेक वेळा आहार बदलतो, हवामान बदलतं, आणि श्वसनमार्गाचे विकार सुरू होतात, सर्दि खोकला, ताप, अंगदुखी, कणकण, असे त्रास होतात.अशा वेळी हे चूर्ण मधात मिसळून चाटण द्यावे दिवसातून दोन वेळा, लगेच बरे वाटते..(Help to clear excess kapha or mucous from the body)..


 . त्रिकटु चूर्ण हे भूक वाढवणारे चांगले औषध आहे, जेवणाच्या आधी लिंबाच्या रसासोबत घेतल्यास

 पाचक रस सुटुन छान भूक लागते.आणी नंतर पचन नीट होते, रस रक्त वाढते, त्यामुळे सिजनल आजार होत नाही. संग्रहणि, आव, इरिटेबल, सिंड्रोम बावेल, मध्ये हे चूर्ण, डाळिंबाचा रसासोबत दिल्यास आराम पडतो.रोज कुटजारिष्ट दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घेऊन हे चुर्ण घ्यावे.आराम पडतो...




..त्रिकटु चूर्ण हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, कारण यातिल सुंठ हि पचन नीट करून मेद या धातूला नियंत्रणात ठेवते, तसेच. नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होते, त्रिकटू चूर्ण हे गोदंति भस्मासोबत घेतल्यास थायराईड कंट्रोल मध्ये राहतो. घशात संक्रमण झाल्यास, हे चूर्ण मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो, हिरडा, गुळ, व तिळ तेल व त्रिकटू चूर्ण एकत्र करून खावे याने सर्व प्रकारचे त्वचा विकार बरे होतात.संधिवात, आमवात, गुडघेदुखी कंबरदुखी या सर्व त्रासांवर

...त्रिकटु चूर्ण हे मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो,.आम दोष दूर करते, कारण

. शरिरातील आम म्हणजे, एक प्रकारचा विष दोष आहे, ( Trikatu Churna helps to take out excess impurities or ama from the body.).


    तेव्हा हे चूर्ण तुम्ही आयुर्वेद शाॅपमधून आणू शकता, किंवा. अगदि घरि देखिल शुद्ध स्वरूपात तयार करू शकता. याचे फायदे बघता टाॅनिक म्हणून घेऊ शकता. अगदी चिमुटभर.... आणि निरोगी राहा


 सुनिता सहस्त्रबुद्धे 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा .




_*

Featured post

Lakshvedhi