Wednesday, 22 March 2023

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे

 लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण.

            मुंबई, दि. 21 :- लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.


            या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वरळी येथील नेहरू सेंटर येथे करण्यात आले होते. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा, मुख्य संपादक राजेंद्र दर्डा, आशू दर्डा, योगेश लखानी, युवराज ढमाले, सुजाता बजाज, अमृता फडणवीस, गौर गोपालदास हे उपस्थित होते.


            यावेळी अभिलिप्सा पांडा व षडज गोडखिंडी यांना उदयोन्मुख प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            पद्मविभूषण पं हरिप्रसाद चौरसिया यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार -'लिजेंड'ने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री शंकर महादेवन यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार -'आयकॉन'ने सन्मानित करण्यात आले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, लोकमत वृत्तपत्र परिवार विविध क्षेत्रात कार्यरत असून समाजाला जोडण्याचे काम करत आहे. ज्योत्स्नाताई सुरांच्या निस्सीम उपासक होत्या. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार देशपातळीवरील मोठा आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहे. अनेक नवोदित कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीने तर संपूर्ण जगाला सम्मोहित केले आहे. हा पुरस्कार सोहळा संस्मरणीय आहे.


            यावेळी षडज गोडखिंडी यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग जोग सादर केला. त्यांना तबला साथ ओजस अढिया यांनी केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध सतारवादक निलाद्री कुमार यांचे सतारवादन झाले.


            लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.


-----000-----

गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

 गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा


राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही.

            मुंबई, दि. 21 : मराठी नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त करतानाच या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, गुढीपाडवा फक्त नव्या वर्षाचे स्वागत नाही तर नव्या संकल्पांचा सण आहे. नव्या विचारांची, नव्या कृतीची आणि नव्या स्फूर्तीची ऊर्जा देणारा सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. चैत्र महिन्यापासून निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश या उत्सवामागे आहे. आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या कल्याणाची भावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय शासन घेत असून या कठिण काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.


००००

महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र

 महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रजासत्ताक दिनी चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या कलावंतांचा सत्कार.

            मुंबई, दि. 21 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावरील संचलनात कलावंतांनी कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी सादर करीत द्वितीय क्रमांक पटकावला. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून या चित्ररथाच्या सादरीकरणात सहभागी कलावंत कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.


            राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर राज्याचा ‘साडेतीन शक्तिपीठे : नारीशक्ती’ या चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तसेच राज्यगीताची संगीतमय निर्मिती करणाऱ्या कलावंतांचा सत्कार सोहळा आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररथ निर्मिती कलावंत, चित्ररथाबरोबर नृत्य करणारे कलांवत, राज्यगीताचे कलांवत आणि महाराष्ट्र वाद्य गीत सादर करणारे गायक नंदेश उमप, गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, प्राची गडकरी, पंकज इंगळे, आनंदी जोशी, विशाल भांगे आदींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रातर्फे कर्तव्य पथावर सादर झालेल्या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठाबरोबरच नारी शक्तीच्या सन्मानाची माहिती देशभरात पोहोचली. अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचवला जातो. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट, किल्ले, राज्याचे ऐश्वर्य आणि संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करावेत. त्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पोहोचवावे, असे सांगत गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील साडेतेरा कोटी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती आपल्या राज्यगीतात आहे. राज्यातील कलावंतांनी कमी कालावधीत चित्ररथ सादर केला. त्याबरोबरच त्यांनी संपूर्ण देशातून दुसरा क्रमांक पटकावला ही अभिमानाची बाब आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक विभागातर्फे स्पर्धांचे आयोजन करण्याचीही सूचना त्यांनी केली.


            प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावला. त्याबरोबरच शाहीर साबळे यांनी घराघरात पोहोचविलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्याने राज्यगीत म्हणून स्वीकारले. या पार्श्वभूमीवर कलावंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.


            गायिका वैशाली सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका वैशाली सामंत, नंदेश उमप, वैशाली माडे, आनंदी जोशी, विशाल भांगे आदींनी विविध गीते सादर केली. त्यांनी 'बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा', 'मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा' आदी गीते सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


000

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


 

मसाज आवश्यक आहे का ?*

 *मसाज आवश्यक आहे का ?* 


            आपले शरीर अनेक स्नायूंनी बनलेले आहे. ते स्नायू मोकळे करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. जरी आपण ग्रामीण भागातले असलो तर सहसा आपल्या शरीराची हालचाल तर होतेच म्हणून आपल्याला वाटेल की आम्हाला व्यायामाची काय गरज, पण व्यायाम हा आवश्यक असतोच. त्याच बरोबर मालिश ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळापासून आपण पाहत आलोय की लहान मुलांची तेलाने मालिश केली जाते, आणि असे केल्या केल्या लहान मूल अगदी शांत झोपी जाते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मुलांची मालिश केल्यास त्यांची शारीरिक वाढ ही अतिशय लवकर होते. आज आपण पाहू प्राचीन काळापासून चालत आलेले मालिश म्हणजेच स्पर्श चिकित्सा पद्धत. या पद्धतीने मोठे मोठे आजार सुद्धा दूर होतात. अर्धांगवायू सारखे आजर तर ऍलोपॅथिक औषधाने बरे होतच नाहीत त्यांना मसाज व निसर्गोपचार आणि थोडी मेहनत पूर्णपणे आजार दूर करू शकते.


संवाहन श्रमहरं व्रस्यं निद्रा सुख प्रदम् । मांसा सृक्त्यक् प्रसन्नत्वम् कुर्याहातकफाप्रहमू ।।


म्हणजेच, शरीराची मालिश करणे श्रमनाशक, धातूंना पुष्ट करणारे, झोप आणि सुखकारक तसेच श्वासोच्छ्वास, त्वचा आणि रक्त शुद्ध करणारी आणि वात, पित्त, कफ नाशक आहे.


 *मसाज चे फायदे :*


१. तणाव दूर करण्यास मदत करते. 

२. मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे दूर करते. 

३. ब्लडप्रेशर व्यवस्थित ठेवतो. 

४. शरीराच्या आतील दुखणे नाहीसे होते. 

५. इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते. 

६. कमरेत होणारे दुखणे नियंत्रित करते. 

७. यामुळे आपल्याला झोप देखील चांगली लागते.


*या व्यक्तींनी मसाज टाळावा*


१) ज्या व्यक्तीला त्वचेचे आजार आहेत. 

२) सूज किंवा जखम झालेल्या भागावर मसाज करू नये. 

३) गर्भावस्थेत स्त्रियांनी मसाज करू नये.

४ ) हृदयविकार असेल तर मसाज करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

 *तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच मालिश करावी.*


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी 

https://chat.whatsapp.com/K4DuEzqiAazB1CS5PY0O75

आर्ट एक salutes


 

अनुसूचित जातीसाठीच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक

 विधान परिषद लक्षवेधी :


अनुसूचित जातीसाठीच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षकांना

वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक


- मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. 21 : शाहू, फुले, आंबेडकर निवासी / अनिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य विक्रम काळे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.


            मंत्री श्री. राठोड म्हणाले की, अनुसूचित जातीसाठीच्या आश्रमशाळांना अनुदान देणे ही केंद्र सरकारची योजना होती. या योजनेअंतर्गत ३२२ शाळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३४ शाळांना केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले. केंद्राने अनुदान मंजूर न केलेल्या उर्वरित २८८ आश्रमशाळांना विना अनुदान तत्वावर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यांना अनुदान देण्याची मागणी होत असल्याने तपासणीअंती १६५ आश्रमशाळांसाठी राज्य शासनाची शाहू, फुले, आंबेडकर निवासी / अनिवासी आश्रमशाळा ही नवीन योजना सुरू करण्यात येऊन या आश्रमशाळांना २०१९-२० पासून २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत होत असलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव दिलेला असून यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi