Monday, 20 March 2023

मौखिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ‘स्वच्छ मुख अभियान’ उपयुक्त ठरेल

 मौखिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ‘स्वच्छ मुख अभियान’ उपयुक्त ठरेल.


-वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. २० : मौखिक आरोग्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे ‘स्वच्छ मुख अभियान’ मौखिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            २० मार्च या जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे "स्वच्छ मुख अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, डॉ. विवेक पाखमोडे यांच्यासह दंत वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आजपासून राज्यातील सर्व शासकीय दंत महाविद्यालयात स्वच्छ मुख अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काळात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच सर्वसामान्यांमध्ये मौखिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. चुकीच्या आहार पद्धती, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, वाढता ताण- तणाव यामुळे लोकांमध्ये विविध व्याधीचे प्रमाण वाढते आहे. ही बाब चिंताजनक असून नागरिकांना निरोगी राहण्यासाठी नेमके काय खावे याबाबतही जनजागृती करणे आवश्यक आहे.


            आपला देश हा तरुणांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे ही बाब चिंताजनक आहे. आजही अनेक नागरिक गुटखा, खर्रा, तंबाखू, मावा, पानमसाला इत्यादीचे सेवन करत असल्याने अशा प्रकारच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली असली, तरी देखील सेवन केले जात आहे ही बाब गंभीर आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने लोकांना व्यसनाधिनतेपासून परावृत्त केले, तरी मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊ शकते. त्यामुळे मौखिक आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते. स्वच्छ मुख अभियान ठराविक कालावधीसाठी न राहता निरंतर प्रक्रिया बनावी, असे सचिव डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.


००००

म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी

 म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत.

            मुंबई, दि. २० : प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३ हजार १२० सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


       यावेळी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने - पाटील, ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे, समिती सदस्य धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.


              उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की अन्न, वस्त्र याबरोबरच निवारा आवश्यक आहे. रोजगारासाठी शहरी भागात नागरिक येतात. त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी. तसेच बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करीत लवकरात लवकर घरांच्या सोडती काढाव्यात.


            पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या ६ हजार ५८ सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातील २ हजार ९३८ सदनिका या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. ३ हजार १२० सदनिकांसाठी ५५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले.

एकूण सदनिका - ६०५८

एकूण प्राप्त अर्ज - ५८४६७

म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका- २९३८

२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजना - २४८३

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) - ६३७

एकूण सदनिका - ३१२०

एकूण प्राप्त अर्ज - ५५८४५

जय हो

 चिरनेर गाव चे सुपुत्र अंकुश कातकरी (सध्या राहणारी विंधने) यांची मुलगी अंकिता कातकरी ही M.P.S.C परीक्षा पास झाली आहे तिला चांगल्या पगाराची तिला चांगल्या नोकरीची ऑफर सुध्दा आली आहे परंतु तिला I.A.S अधिकारी व्हायची आहे त्या साठी ती U.P.S.C परीक्षा दिल्ली येथे देत आहे पहिल्या दोन परीक्षा ती चांगल्या गुणाने पास झाली आहे आता शेवट ची परीक्षा काही दिवसातच आहे त्यात ती पास झाली तर महाराष्ट्र ची रायगड तसेच उरण चिरनेर येथील पहिली I.A.S. आदिवासी महिला (मुलगी) होण्याचा मान तिला मिळेल व कातकरी समाजाची मान उंचावेल तसेच तिला आदिवासी समाजा कडून पास होण्यासाठी साठी लाख लाख शुभेच्छा 

आदिवासी बांधव चिरनेर

*ह्या ग्रुपमध्ये आपण सर्वजण सुशिक्षित आहोत, प्रत्येकांनी आपल्या फॅमिली ग्रुपवर हा मेसेज पाठवा, आपल्या कुटुंबातील मुलांना वाचायला द्या, अशी मि विनंती करते, जेणेकरुन ते काहीतरी बोध घेतील* 🌺🙏🌺

आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे

 *रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते !!* 


आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आवळा अनेक औषधांमध्ये वापरला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहेत.


त्यात व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नसारखे मिनरल्स असतात, जे अनेक रोगांवर फायदेशीर असतात. जर तुम्ही रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि इंफेक्शनसारख्या समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो.


*आवळा खाण्याचे फायदे :-* 


*पचन समस्या :* 

आवळ्याचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या दूर होतात. पचन, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या आवळ्याच्या सेवनाने दूर होते. जर तुम्हाला अन्न पचनास त्रास होत असेल, आतड्याची हालचाल नीट होत नसेल तर आवळ्यानं बनवलेल्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा.


*प्रतिकारशक्ती वाढवणे :* 

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. आवळ्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आजारांच्या हंगामात आवळ्याचा आहारात समावेश केल्यास सर्दी सारखे संसर्ग होत नाहीत.


*हाडे मजबूत होतात :* 

आवळा हाडांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आवळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते ज्याचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी होतो. आवळा खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि सांधेदुखी यांसारख्या हाडांशी संबंधित समस्यांमध्ये त्रास कमी होतो. हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी आवळ्याचा ज्युस हा रोज सकाळी घ्या.


*हृदयासाठी फायदेशीर :* 

आवळा हृदयाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्यातील क्रोमियम बीटा हृदयाच्या मज्जातंतूंना ब्लॉकेजपासून वाचवते, ज्यामुळे हृदय चांगले कार्य करते आणि निरोगी राहते.


*डोळ्यासाठी फायदेशीर :* 

आवळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली नजर चांगली करण्यास मदत करते. आवळ्यापासून बनवलेला मुरंबा, चटणी यासारख्या गोष्टी खाल्ल्यानं चवीसोबतच दृष्टीही वाढते.


*मधुमेह :* 

आवळ्यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.


*संसर्ग होण्यापासून होतो बचाव :* 

आवळ्यामध्ये असलेले पोषक घटक संसर्ग दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आवळा बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतो. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. याच्या सेवनाने सर्दी आणि पोटाच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/K4DuEzqiAazB1CS5PY0O75

मनाची श्रीमंती

 मनाची श्रीमंती 


       रात्री अचानक गलका ऐकू आला म्हणून मी खिडकीतून खाली बघितले. सुरक्षा रक्षकाला कोणी तरी विनवणी करत होतं बंगल्यात प्रवेश देण्याबद्दल.

मी फोनवरून सुरक्षा रक्षकाशी संपर्क साधून विचारणा केली असता त्याने त्या व्यक्तीचे नांव सांगताच माझ्या छातीत धस्स झाले. 

      मीच घाईघाईने खाली गेलो. तिथल्या प्रकाशात मी त्याला ओळखू शकलो नाही. माझा उडालेला गोंधळ बघून ती व्यक्ती मला म्हणाली

"अरे केशवा, ओळखले नाहीस मला ? मी तुझा शाळा सोबती वामन्या. वामन जोशी."

      "वामन्या तू ? अरे पण काय ही अवस्था करून घेतली आहेस तू" मी त्याचा हात धरत सावकाश चालत त्याला खालच्या दिवाणखान्यात आणून बसवलं. आमच्या आवाजाने घरातील माणसे आपापल्या खोल्यातून बाहेर येत आम्हा दोघांना आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहिली.

      वामन एव्हाना बऱ्यापैकी शांत झाला होता. मी घरच्या मंडळींना वामनची ओळख करून दिली.

     "केशवा, अरे माझ्यापाशी वेळ नाही जास्त. एकदा तुझं काम झालं की मी निघेन लगेच" असं म्हणून वामन्याने त्याच्या जवळच्या पिशवीतून एक वर्तमानपत्रात बांधून आणलेली वस्तू माझ्या हाती सोपवली आणि म्हणाला, "केशवा, आता माझा जीव खऱ्या अर्थाने शांत झाला. आता कधीही वरून बोलावणं आलं तरी मी जायला मोकळा झालो. तुझं ऋण डोक्यावर घेऊन जगत आलो आजवर. पण आज त्यातूनही मुक्त झालो."

      वामन्याचं बोलणं बुचकळ्यात टाकणारे होते. मी त्याला कागदात गुंडाळून काय आणलं आहे ते विचारले. 

     "तुच उघडून बघ केशवा." वामन हात जोडून म्हणाला.

      मी कागदाचा दोरा सोडला आणि त्याक्षणी त्यातून पैशाची बंडलं खाली पडली. मोठी रक्कम होती ती.

      वामन्याने पुढे होऊन माझे हात पकडले. "केशवा, २० वर्षांपूर्वी माझ्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी योग्य वेळी तु केलेल्या आर्थिक मदतीची मी व्याजासह आज परतफेड केली आहे. माझी पत्नी आता हयात नाही. पण तिच्या अखेरच्या दिवसात मी तिला ह्या परतफेडीचे वचन दिले होते. त्या वचनांतून मी आज उशिराने का होईना पण मुक्त झालो आहे."

      मी नि:शब्द झालो ते ऐकून. आजकाल पैशासाठी इमान विकणाऱ्या, नाती तोडणाऱ्या आणि माणूसकीला काळीमा फासणाऱ्या कलियुगात वामन्या सारखी माणसं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी तरी उरली आहेत हे बघून मन सुखावले आणि थेट कोकणातल्या माझ्या शाळेच्या दिवसांत गेले. 

       माझे वडील भिक्षुकी करायचे त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वामन्याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. बालपणी केलेल्या सगळ्या मजा वामन्याने खर्च केलेल्या पैशांतून होत्या. आमच्यासाठी तो आनंदाने पैसे खर्च करायचा. 

      पुढे शिक्षणासाठी मी मुंबईला मामांकडे आलो आणि तल्लख बुद्धीच्या जोरावर शहरातील एक निष्णात वकील म्हणून नाव कमावले. आज सगळी सुखं आणि लक्ष्मी माझ्या घरी भरभरून आहेत. पण वामन्याची आजची परिस्थिती बघून वाईट वाटले. 

       बोलता बोलता वामन्या बोलून गेला की त्याचे अण्णा गेल्यावर हळूहळू किराणा व्यवसायाला उतरती कळा लागली. गावात मारवाड्यांनी तशीच दुकाने सुरू केली आणि गिऱ्हाईक आपोआप तुटत गेले. 

      मी एव्हाना भानावर आलो. "तु आधी जेवून घे, मग आपण बोलू निवांत." पण वामन्याने त्याला नकार दिला.

      "अरे पण एवढी रक्कम तु उभी कशी केलीस?"

       वामन्याचे उत्तर ऐकून मघाशी मी जमिनीवरून उचललेली पैशाची बंडलं पुन्हा एकदा माझ्या हातून निसटून खाली पडली. वामन्या शांतपणे म्हणाला, "मी माझी एक किडनी दान केली. त्यातूनच मिळालेले हे पैसे आहेत. अरे गेले काही वर्षे मी बैचेन होतो. पत्नीला दिलेलं वचन मला झोपू देत नव्हते. एक दिवस मुंबईतील रुग्णालयात एका रूग्णाला किडनीची आवश्यकता असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात छापून आली होती. ती वाचून तडक इथे आलो. परमेश्वराच्या कृपेने पुढचं सर्व सुरळीत झाले. मी निघतो आता. मिळेल ती एसटी पकडून घरी जातो परत."

       मी खुप गयावया करून देखील वामन्या थांबला नाही. मी बळेबळेच त्याला जेवायला लावले. वामन्याच्या मनांची श्रीमंती आमच्या सगळ्यांचेच डोळे दिपवून आणि पाणावून गेली.

ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून मी त्याला मुंबई सेंट्रल डेपोमध्ये कोकणातील बसमध्ये बसवून दिले.

      बस सुटायच्या आधी वामन्याला घट्ट मिठी मारत मी म्हणालो, "वामन्या, मी आजवर मिळवलेली अफाट श्रीमंती तुझ्या मनाच्या श्रीमंती समोर खुजी ठरली आहे."

       उसनं अवसान आणून वामन्या माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाला, "केशवा, जोपर्यंत मैत्री आणि माणूसकी जपणारी आणि तुझ्यासारखी वेळेला धावून येणारी माणसं ह्या जगात आहेत तोपर्यंत परतफेडीची दिवाळी साजरी करण्याचे भाग्य प्रत्येक याचकाला मिळत रहाणार. 

       नुसतं विश्रांतीसाठी माझ्या घरी येण्याचे वचन मात्र मी वामन्याकडून घेतले आणि नंतरच्या काही क्षणांतच वामन्याची एसटी सुटली.


©सतीश बर्वे👌👌🙏🏽

झाकली मूठ🤛 सव्वालाखाची....*

 Interesting 

एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले... त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले

राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली... आता या चवण्णीछाप राजाला अद्दल घडवायचीच.

पुजारी हुशार होता... राजा गेल्यावर पुजार्‍याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला...

"राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा."

आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का... ? पहिलीच बोली दहा हजार पासून... सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच 'नाही परवडत' असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.

तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, "महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय..."

राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, "हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको...."

तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली....


*....झाकली मूठ🤛 सव्वालाखाची....*😃

सूप्रभा त


 

Featured post

Lakshvedhi