Saturday, 18 March 2023

दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजकांची मुलाखत.

 दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजकांची मुलाखत.

            मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजक लक्ष्मी पवार व ऋतुजा उद्यावर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 20 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            राज्यशासनाच्या उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात एक सामंजस्य करार झाला असून याचा फायदा राज्यातील नवउद्योजकांना होत आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करण्यात आले आहे. भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून 'कॉर्नेल महा-60' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वर्षभर राज्यातील 60 निवडक तरूण उद्योजकांना याअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवउद्योजकांशी 'दिलखुलास' कार्यक्रमातून संवाद साधला आहे. लक्ष्मी पवार व ऋतुजा उद्यावर या नवउद्योजकांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000000

तापी महाकाय जलपुनर्भरण योजनासुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आल्यास तत्काळ कार्यवाही

 तापी महाकाय जलपुनर्भरण योजनासुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आल्यास तत्काळ कार्यवाही


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. १७ : तापी नदीवरील महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाचे (तापी मेगा रिचार्ज स्कीम) सविस्तर संकल्पन आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून या संदर्भातील सर्वेक्षण, अन्वेषण आणि प्रकल्प अहवालाच्या सुधारित द्वितीय प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य शासनास प्राप्त झाल्यावर त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


            विधानपरिषदेत आज सदस्य एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, तापी नदीवरील महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समिती , नाशिक यांची मान्यता प्राप्त झाली आहे. राज्य शासनाकडे महामंडळाकडून हा प्रस्ताव आल्यास त्यास मान्यता प्रदान करण्यात येईल. महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प महत्वाचा असून या प्रकल्पासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करुन देत असल्याचे ते म्हणाले. या योजनेच्या सर्वेक्षण आणि अन्वेषण या कामांसाठी आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 22 कोटी 42 लाख रुपये वॅपकॉस या यंत्रणेस उपलब्ध करुन देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालया

 कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील पदभरती येत्या 15 दिवसांमध्ये पूर्ण करणार


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत.

            मुंबई, दि. 17 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील 100 खाटांचा महिला व बाल रुग्णालयातील पदभरती येत्या 15 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य वैभव नाईक यांनी कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री डॉ. सावंत म्हणाले, या रुग्णालयाकरीता 97 नवीन पदे निर्माण केली असून त्यापैकी 68 पदे भरली असून उर्वरित 29 पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.या रुग्णालयाकरिता आवश्यक यंत्रसामुग्रीचा पुरवठा तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डंम्पिंग ग्राऊंडबाबत

 बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डंम्पिंग ग्राऊंडबाबतजिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी


- मंत्री उदय सामंत


          मुंबई, दि. 17 : खामगाव नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रावण टेकडीजवळ असून या ठिकाणी शहरातील दैनंदिन संकलन करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. या ठिकाणी आग लागण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


          विधानसभा सदस्य संजय रायमुलकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


          मंत्री श्री. सामंत म्हणाले, या नगरपरिषदेकडे रोज 3 हजार 206 टन इतका कचरा संकलन होतो आणि नगरपरिषदेकडे 1 हजार 314 टन क्षमता असलेला खत निर्मिती प्रकल्प आहे. या व्यतिरिक्त ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ (SBM 2.0) मध्ये नगरपरिषदेने 10 टन क्षमतेचा खत निर्मिती प्रकल्प प्रस्तावित केला आहे. नगरपरिषदेने 10 हजार टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया केली आहे. उर्वरित 18 हजार 241 टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेत ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0’ अंतर्गत केंद्र शासनाची मान्यता मिळण्याकरीता 1 कोटी रक्कमेचा कृती आराखडा सादर केला आहे, असेही मंत्री श्री. सामंत

गोंदिया शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाची लवकरच बैठक

 गोंदिया शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाची लवकरच बैठक


- मंत्री उदय सामंत


          मुंबई, दि. 17 : गोंदिया शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन गोंदिया शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचा 208.33 कोटी किंमतीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीसमोर सादर करण्याचे प्रस्तावित आहे. या समितीची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


          याबाबत सदस्य विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


          मंत्री श्री. सामंत म्हणाले, गोंदिया शहराच्या मलनि:सारण प्रकल्पात केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत अभियान टप्पा-1’ योजनेंतर्गत 134.07 कोटीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे जवळपास 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचे काम जलदगतीने व्हावे यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

ऑनलाईन योगा क्लास"*फ्री

 *खुशखबर!!! खुशखबर!!! खुशखबर!!!*


*"ऑनलाईन योगा क्लास"*

💪💪💪💪💪💪💪💪💪


*आता एकदम - फ्री..!!! फ्री..!!! फ्री..!!!*

🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️


आता राहा..!

*नेहमीच एकदम फिट, हेल्दी, उत्साही, स्ट्रॉंग, सुरक्षित, सुस्थितीत ( Comfortable ), लवचिक ( Flexible ) आत्मविश्वासपूर्ण, सकारात्मक, उत्पादकतापूर्ण ( Productive ), प्रसन्न आणि आनंदी..*

त्यासाठीचेच एक प्रभावी माध्यम म्हणजे आमचा 

👇👇👇👇👇👇👇👇

*"ऑनलाईन योगा क्लास ( Online Yoga Class )"*

=========================


*आमच्या योगा क्लासची वैशिष्ट्ये :*

=========================

✅ क्रमाक्रमाने योगातील बेसिक ते ऍडव्हान्स अशा प्रत्येकालाच संपूर्ण आयुष्यभर प्रचंड उपयुक्त ठरतील अशा गोष्टी शिकण्याची संधी

✅ थेअरी व प्रॅक्टिकल अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास

✅ वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे व फायदेशीर व्यायाम प्रकार, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, मेडिटेशन ( ध्यान ) यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास

✅ आहार मार्गदर्शन

✅ नैसर्गिक पद्धतीने वजन कमी -जास्त करण्यासाठी आवश्यक गोष्टींचे ज्ञान

✅ स्वतः ला व आपल्या संपूर्ण परिवाराला नेहमीच हेल्दी व फिट ठेवण्याबाबत सुयोग्य मार्गदर्शन

✅ कोणत्याही प्रकारच्या शारीरिक-मानसिक आजार/समस्या यांतून कायमसाठी 100% मुक्ती मिळविण्यासंदर्भातले योग्य मार्गदर्शन

✅ योग्य व आदर्श दिनचर्या, जीवनशैली यासंदर्भातले मार्गदर्शन

✅ योगा क्लास सोबतच कोणत्याही प्रकारचे पर्सनल कोचिंग/मार्गदर्शन.. मोफत..!

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴


*योगा क्लासची वेळ :-*

*सोमवार ते शनिवार - सकाळी 6 वा. ते 7 वा. पर्यंत*

( या शिवाय दररोजचे क्लास रेकॉर्डिंग उपलब्ध - त्याद्वारे आपल्या स्वतः च्या उपलब्ध वेळेत क्लास करण्याची सोय )

=======================


*योगा क्लास प्लॅटफॉर्म :-*

*युट्युब लाईव्ह स्ट्रीमिंग*

( योगा क्लाससाठी नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तींना आमच्या पर्सनल ग्रुपमध्ये ऍड करून दररोजच्या क्लासची युट्युब लिंक उपलब्ध करून दिली जाईल. )

=========================


*तसेच आपण डायरेक्टली आमचा योगा क्लास ग्रुपही खालील लिंक वरून जॉईन करू शकता..*

👇👇👇👇👇👇👇👇


https://chat.whatsapp.com/CjmCBc483oVDCVQHgP3CuY



*आयोजक :*

*कोच वी जे देवदूत*

हेल्थ, फिटनेस, रिलेशनशिप, लाईफ कोच अँड योगा ट्रेनर 

पुणे

*CALL/WHATSAPP - 7038987501*


👆👆👆👆👆👆👆👆👆

*ऑनलाईन योगा क्लासविषयी, अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी आम्हाला त्वरित संपर्क करावा*


*कृपया, हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करावा, ही विनंती..*


*धन्यवाद!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पंतप्रधान मोदीजींच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया

 पंतप्रधान मोदीजींच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन .

आ. भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पूर्वमध्ये रोजगार मेळाव्याचा शुभारभ.


मुंबई : राज्यातील प्रत्येक बेरोजगाराला नोकरी देणे, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. या माध्यमातूनच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत निर्माण करू, असे प्रतिपादन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. कांदिवली पूर्व येथे प्रमोद महाजन मैदानात आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांसह कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


 पालकमंत्री लोढा म्हणाले, विविध कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ हवे असते आणि शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची आवश्यकता असते यामधील दुवा आमदार अतुल भातखळकर यांच्या रूपाने या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तयार झाला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात अशा पद्धतीचे मेळावे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.


 आमदार भातखळकर म्हणाले, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक वॉर्डात त्यांच्या कॅम्प आयोजन केले, ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्रेशन झाले आहे. अनेकदा शिक्षण पूर्ण झाल्यावर कोणत्या कंपनीशी संपर्क साधावा हे माहीत नसते त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नोकरी बरोबरच स्वयंरोजगारासाठी मुद्रा सारख्या योजनेतून अर्थसहाय्य उपलब्ध होते. लवकरच आम्ही या योजनेच्या संदर्भात मेळावा आयोजित करणार आहोत, असेही आमदार भातकळकर म्हणाले.


 प्रारंभी पालकमंत्री लोढा यांचा सत्कार आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार भातखळकर यांचा सत्कार कौशल्य विकास अधिकारी श्री. पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. या रोजगार मेळाव्यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हजारो युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेतला.



Featured post

Lakshvedhi