Saturday, 18 March 2023

गोंदिया शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाची लवकरच बैठक

 गोंदिया शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाची लवकरच बैठक


- मंत्री उदय सामंत


          मुंबई, दि. 17 : गोंदिया शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन गोंदिया शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचा 208.33 कोटी किंमतीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीसमोर सादर करण्याचे प्रस्तावित आहे. या समितीची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


          याबाबत सदस्य विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


          मंत्री श्री. सामंत म्हणाले, गोंदिया शहराच्या मलनि:सारण प्रकल्पात केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत अभियान टप्पा-1’ योजनेंतर्गत 134.07 कोटीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे जवळपास 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचे काम जलदगतीने व्हावे यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi