Saturday, 11 March 2023

शिवथरघळ : एक अद्भुत वैज्ञानिक कोडे !!

 *🤔 शिवथरघळ : एक अद्भुत वैज्ञानिक कोडे !! 

                                                                *एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली... आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले.*

*एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! "हाय ! मी भोपळे !" ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता... इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली... माझी उत्कंठा ताणली गेली.. "हे काय आहे ?" "ही जीपीएस मशीन्स आहेत ... डू यू नो व्हॉट जीपीएस इज ?"* 

*माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! "येस, आय नो... पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?" हसत हसत ते म्हणाले "मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे " असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्‍यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले - "हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !" असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली ... ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !*

*भोपळे म्हणाले "चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात..." असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो... उघड्या आकाशाखाली... कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !*

*भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?*

*मी : "९० तरी असेल."*

*भोपळे : "गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?"*

*मी : "तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत."*

*भोपळे: "करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !"*

*असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८... नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !*

*भोपळे :" मी जगभरातील अनेक देश फिरलोय... सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते". आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो - "भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात ?"*

*"तीच तर गंमत आहे!" भोपळे हसत हसत म्हणाले - "इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !"*

*मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !*

*"डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !" असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले.* 

*भोपळे : "वर पहा, किती आकाश आहे ?"*

*मी :" ७० अंश तरी आहेच आहे."*

*भोपळे :" मग किती उपग्रह दिसावेत ?"*

*मी : निदान २०-२५ ?*

*भोपळे : "करेक्ट, नाऊ लेट्स चेक..." असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली ... आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !*

*भोपळे म्हणाले "पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !" आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्र्कन स्मरल्या !*

*विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !! विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार !*

*म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !*

*अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या... भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला... समर्थांच्या पायावर लोटांगण घातले... आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती... अधिक गंभीर होती... अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !*

*आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !*

*दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल ... तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !*

*🙏🙏🏼!! जय जय रघुवीर समर्थ !! 🙏🙏🏼*


*लेखक :- सदाशिव खेडेकर*

(Forwarded post)

Courtesy Milind Patwardhan

Lai भारी,

 


कॅल्शियम गोळ्या न खाता शेवगा सेवन करा ?

 *कॅल्शियम गोळ्या न खाता शेवगा सेवन करा ??*


*शेवगा, सांधेदुखी व कॅल्शियम... आणि भारतीय शेती.....*

भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले.


शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. म्हणून या वर्षी पुन्हा शेतकऱ्यांनी गुणवत्ता-पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या. 


एक्स्पोर्टची मागणी तेवढीच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले. मारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे. 


एका बाजूला कॅलशियमची कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. 


तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्यांचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्या गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. 


तर जनावरांचे कॅलशियम कमी झाल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्याही वाढलेल्या आहेत. 


दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जाताना दिसत आहेत. 


आज बाजारात शेतकरी 40 ते 50 रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पीक घेणे थांबवतील. मग हाच शेवगा इसराईल मधून भारतात 200 ते 300 रुपये किलोने येईल व तेव्हा तो रांगा लाऊन आपल्याला घ्यावा लागेल. 

महिलांनी त्यांचे सुगरणीचे गूण उपयोगात आणून शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्यावे तसेच त्याचे सूप तयार करून द्यावे.

आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. 

शेवग्याची शेंग भाजी, सूप शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.

शेवग्याची चटणी, शेवगा सूप, शेवग्याचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील. 

ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. 

त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत. 

महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व स्वत:च्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे. 

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची रोज २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचवावी. स्वत:साठी सुद्धा ते सकस दूध वापरावे व इतरांना देखील तसे सांगून ५ रुपये जादा दराने विकावे. 

शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे. 

निसर्ग उपचारात शेवग्याचे फार मोठे महत्व आहे. 

त्यापासून -


▪गाजराच्या १० पट अ जीवनसत्व मिळते.

▪दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.

▪केळ्यांच्या १५ पट पोट्याशियम मिळते, 

▪पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते. 


अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पाडून घेऊ नये व शेतकऱ्यांनी पण हे पीक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून त्याचा विचार करावा. 

▪शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजवून घेऊन त्याचा गर काढून तो वाळविता देखील येतो.

▪हे ओर्गानिक कॅल्शियम पचनास चांगले असते. जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्शियम मिळते. मात्र ते सावलीत वाळवून ठेवावे लागते. 


*एक्स्पोर्टचे कारण :* 

पाश्च्यात्य देशात जंक-फूडमुळे हाडांचे विकार वयाच्या १५ व्या पासूनच दिसत आहेत. 

हाडांचे झिजणे, कॅलशिमच्या कमतरता रोखण्यासाठी तेथे शेवग्याचा वापर चालू झाला आहे. 

🌾🎋


ही माहिती जास्त लोकांपर्यंत पाठवुन शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करावा ही विनंती.

आरोग्य संपदा...🙏

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांसाठी

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांसाठीसर्व संबंधित विभागांनी सक्रियता वाढवावी


- कृषि आयुक्त सुनील चव्हाण.

            पुणे, दि. 10: बदलत्या जीवन शैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश वाढवण्यासाठी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी व त्याचा आहारात वापर वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सक्रियता वाढवावी, अशा सूचना कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज दिल्या.


            तृणधान्य वर्षानिमित्त नियोजनासाठी स्थापित राज्य कृती दलाची पहिली बैठक साखर संकुल,पुणे येथे झाली. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.


            यावेळी सुभाष नागरे, संचालक कृषि प्रक्रिया आणि नियोजन, दिलीप झेंडे,कृषि संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण, विकास पाटील, कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक, परभणी संशोधन कृषि विद्यापीठाचे संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर,माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, समाजकल्याण विभागाचे उपसंचालक एस.एस. रणखांबे आदी उपस्थित होते.


            आयुक्त श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून गावोगावी विविध कार्यक्रम घेऊन लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच पथनाट्य, प्रशिक्षणे, विविध माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करणे, महाविद्यालये, शासकीय कार्यालये याठिकाणी प्रचार, प्रसिद्धी करावी. पुढच्या रब्बी हंगामापर्यंत प्रत्येक गावांत सीड बँक तयार करावी. त्यामुळे तृणधान्याच्या उत्पादन वाढीस निश्चितच मदत होईल. प्रशिक्षण आयोजित करताना तृणधान्याच्या महत्त्वाबरोबरच अन्य लोकोपयोगी विषयाची माहिती दिल्यास प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, उत्पादन व उत्पादकता वाढ, पोषण मूल्य व आरोग्य विषयक कायदे, मूल्यवर्धन, प्रक्रिया व पाककृती विकास, नव उद्योगातून व्यावसायिक दृष्टिकोन वाढविणे, प्रचार-प्रसिध्दीतून जनजागृती करणे, निर्यातवृद्धी व धोरणात्मक निर्णयातून अंमलबजावणी या सप्तसुत्रीद्वारे पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे.


            कृषी विस्तार प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साठी राज्यात सुमारे 250 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच सादरीकरणाद्वारे महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तृणधान्य विशेष महिना संकल्पनाही विशद केली. त्यानुसार जानेवारी महिना- बाजरी, फेब्रुवारी- ज्वारी, ऑगस्ट- राजगिरा, सप्टेंबर- राळा, ऑक्टोबर- वरई आणि डिसेंबर- नाचणी याप्रमाणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच कृषि विद्यापीठांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.


            यावेळी मराठवाडा परभणी विद्यापीठाचे संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी येत्या रब्बी हंगामात 100 एकर शेतीमध्ये परभणी शक्ती ही ज्वारीचे वाण पेरण्यात येणार असल्याचे सांगितले.


            माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर यांनी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत माहे फेब्रुवारी 2023 चा लोकराज्य तृणधान्य विशेषांक काढल्याचे सांगून या विभागामार्फत विविध प्रसार माध्यमांद्वारे सर्वांगीण प्रसिध्दी करण्यात येईल, असे सांगितले. तर अर्चना ठोंबरे व डॉ. सोनम कापसे यांनी आहारातील तृणधान्याचे महत्त्व सांगितले.


00000

जीवन ऐसे











 

आम्ही साऱ्या जणी मैत्रिणी


 

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळेची संयुक्त जबाबदारी

 शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळेची संयुक्त जबाबदारी


- मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 9 : राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्यासाठी एन.एम.एम.एस. (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) शिष्यवृत्ती देण्यात येते.


            ही केंद्र शासनाची योजना असून अर्ज भरण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळा यांची संयुक्त जबाबदारी आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य डॉ.राहुल पाटील यांनी परभणी येथील बाल विद्यामंदिर हायस्कूल या शाळेतील एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री केसरकर म्हणाले की, परभणी येथील बाल विद्यामंदिर हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या एनएसपी पोर्टलवरील ऑनलाईन अर्जांची पडतळणी करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत केंद्रशासनास पत्रव्यवहार करण्यात आला आहे.


००००

Featured post

Lakshvedhi