सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 22 February 2023
कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्याज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत
मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार
कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्याज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत
- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.
मुंबई, दि. 21 :- मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील निश्चितच मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. याअंतर्गत जागतिक दर्जाच्या नामांकित शिक्षण संस्थांसोबत करार करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि न्यूयॉर्क येथील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान परस्पर शैक्षणिक सहकार्य विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.
या करारानुसार पात्र विद्यार्थ्यांना बरो ऑफ मॅनहटन कम्युनिटी कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (बीएमसीसी) मध्ये केवळ 20 टक्के शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण व प्रशिक्षणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचबरोबर संशोधन, अध्यापन, अभ्यासक्रम आदी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविले जाणार आहे.
शालेय शिक्षण विभाग आणि मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान झालेल्या या करारावर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी, तर मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोच्या वतीने शिक्षण विभागाचे अध्यक्ष अँथनी मुनरो यांनी स्वाक्षरी केली. मंत्री श्री. केसरकर यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कराराप्रसंगी मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोचे उपाध्यक्ष संजय रामदत, शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक डॉ.कैलास पगारे, राजभवन येथील उपसचिव प्राची जांभेकर आदी उपस्थित होते.
00
केंद्रीय जहाज व परिवहन मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
केंद्रीय जहाज व परिवहन मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प.
मुंबई, दि. 21 : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, मुंबई मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी आदी अधिकारी उपस्थित होते.
लोथल येथे साकारत असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे दालन असावे आणि त्याठिकाणी शिवकालीन आरमार विषयी चित्रमय प्रदर्शनासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्यात सागरमाला अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करतानाच नवीन प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून मागणी करण्यात येईल. महाराष्ट्रात पुढील दीड वर्षांत रो-रो सेवेचे चार प्रकल्प सुरू करण्यात येतील त्यामध्ये मुंबई ते मोरा, मुंबई ते काशीद, मुंबई ते दिघी, मुंबई ते रेवस कारंजा यांचा समावेश आहे.
रो-रो सेवेसाठी बंकर फ्यूलला लावला जाणारा वॅट कमी करण्यात यावा तसेच जुन्या प्रवासी बोटींचे अद्ययावतीकरण करण्यात यावे, पर्यावरणपूरक बोटींची समावेश याविषयी देखील चर्चा करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर
सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर
केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी सकारात्मक चर्चा
- कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे.
नवी दिल्ली, दि. 21 : सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती, राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
येथील संचार भवनात श्री खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यात रेल्वेशी संबंधित विषयांवर चर्चा केली असून संबंधित निवेदनेही श्री. खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना यावेळी दिले.
यामध्ये सांगली जिल्ह्यातील अराग-मिरज येथे रेल्वे अंडर ब्रिज (RUB) असा रेल्वेचा प्रस्ताव असून यासाठीचे कंत्राट देण्याकरीता निविदा काढण्यात आली आहे. या प्रक्रियेला रद्द करून या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्यात यावे, अशी मागणी श्री. खाडे यांनी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्याबाबतचे तत्काळ निर्देश दिले, असल्याचे श्री खाडे यांनी सांगितले.
यासह सांगली जिल्ह्यातील येरळा नदीवरील रेल्वेच्या जागेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीचे रस्ते रेल्वे विभागाकडून बांधावे, अशी मागणीही केली. सांगली येथील रेल्वे स्थानकाचे शेड अपूर्ण असून ते पूर्ण व्हावे. याशिवाय सीएसटीएम कोल्हापूर-तिरूपती महालक्ष्मी एक्सप्रेस ही रोज चालणारी गाडीचे नुतनीकरण व्हावे. काही गाडयांचा थांबा सांगली रेल्वे स्थानकांवर व्हावा. सांगली आणि परिसरातील लोकांची अधिक प्रवास असलेल्या स्थानकांपर्यंत नवीन रेल्वे गाडया सुरू करण्याची मागणी श्री खाडे यांनी यावेळी केली.
मिरजमध्ये ‘क्रीडा संकुल’ची केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे मागणी
मिरज येथे क्रीडा संकुल असावे असे निवेदन आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. खाडे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दिले. खेलो इंडिया अंतर्गत मिरज येथे क्रीडा संकुलाची मागणी श्री. खाडे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे केली. केंद्रीय क्रीडा मंत्री श्री. ठाकूर यांनी याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी माहिती बैठकीनंतर श्री खाडे यांनी दिली.
00000
दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रीमंडळ व शासनाच्या इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.
दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रीमंडळ व शासनाच्या इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.
मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात गेल्या आठवड्याभरातील शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर बुधवार दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.
वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
लोणी (जि. अहमदनगर) येथे आजपासून २ दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन
लोणी (जि. अहमदनगर) येथे आजपासून २ दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन
महसूल विभागाचे लोकाभिमुख, सर्वसमावेशक धोरण निश्चित करणार
– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
लोणी दि. 21 : जनतेची कामे पारदर्शकरित्या आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून महसूल विभागाचे लोकाभिमुख व सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी लोणी (जि. अहमदनगर) येथे महसूल विभागाच्यावतीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. २२ फेबुवारी आणि २३ फेब्रवारी २०२३ ला हे अधिवेशन होणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील पत्रकार परिषदेत दिली.
यंदा प्रथमच ही परिषद लोणीसारख्या ग्रामीण भागात होत आहे. यामध्ये राज्यातील पाच विभागांचे अप्पर मुख्य सचिव, दोन विभागांचे प्रधान सचिव, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरिक्षक, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक उपस्थित राहणार असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले. राज्याच्या प्रगतीचा आणि सामान्य माणसाच्या विकासाचा मसुदा निश्चित करण्यासाठी परिषद महत्त्वपूर्ण आणि सर्वार्थाने यशस्वी ठरेल असा विश्वास महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी व्यक्त केला.
या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या २२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता होणार असून, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप सोहळा पार पडणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत नवीन वाळू धोरण, आयसरिता २.०, विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण, शासकिय जमिनीवरील अतिक्रमण, शर्त भंग, पानंद रस्ता, शिवार रस्त, कब्जेपट्टयाने दिलेल्या, जमिनींच्या शर्तभंगाबाबत, अर्धन्यायिक कामकाज, शत्रू संपत्ती अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, ई-चावडी, ई-मोजणी, ई-पीक पाहाणी, ई-ऑफीस, सलोखा योजना, भूसंपादन, बिनशेती, तुकडेजोड, तुकडेबंदी अधिनियम अशा विविध विषयांबाबत वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार असल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.
या परिषदेच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना मंत्री विखे- पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री कृषि सौरवाहिनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह, ऊर्जा, गृहनिर्माण व पाटबंधारे या सचिवांसह राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. वाळू धोरणाबाबतचा मसुदा या परिषदेमध्ये निश्चित करण्यात येणार आहे. या मसुद्यासाठी येणाऱ्या सूचनांच्या अहवालाचा अंतिम मसुदा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती राज्य सरकारला सादर करणार असून, त्यानंतरच अंतिम वाळू धोरण जाहीर केले जाणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय महसूल परिषद लोणी येथे घेण्याबाबतची पार्श्वभूमी विशद करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी लोणी येथे लोकनेते खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य परिषद संपन्न झाली होती. या परिषदेतील मसुदा हा देशाच्या आरोग्य धोरणाचा भाग बनला. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कौतुक केलेल्या प्रवरेच्या ‘पुरा’ मॉडेलचे देशात स्वागत झाले. कृषी मंत्री आणि शिक्षण मंत्री असताना राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमही या भूमीत संपन्न झाले आहेत. त्याचदृष्टीने ही महसूल परिषद राज्याच्या प्रगतीचा आणि सामान्य माणसाच्या विकासाचा मसुदा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि सर्वार्थाने यशस्वी ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
