Tuesday, 21 February 2023

रोजगार प्रशिक्षण


 

मेरा भारत महान

 


सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ

 सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ


राज्यात 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


             कोल्हापूर दि. 20 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले.


            कणेरी मठ येथे 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. समारंभास शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भय्याजी जोशी, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


            विकास योजना व प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम केले जात असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर 33 लाख झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. आपले शासन सर्वसामान्यांचे शासन असून शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत. यास केंद्र शासनाचेही सर्व सहकार्य असून केंद्राकडून सर्व प्रस्ताव मंजूर होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी काळाची गरज ओळखून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची संकल्पना मांडल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वामीजींना धन्यवाद दिले. अध्यात्म शास्त्र आणि नैसर्गिक तत्त्वाची सांगड घालून सिद्धगिरी मठावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा लोकोत्सव मठाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येकाचा आहे. या संकल्पनेत प्रत्येकाने सहभाग व योगदान दिल्यामुळेच हा लोकोत्सव यशस्वी होत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लोकोत्सव चळवळ व्हावी व हा उत्सव घराघरात पोहोचावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


अपारंपरिक स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण मुक्तीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर शासनाने भर दिला आहे. ग्रीन हायड्रोजन, सोलार एनर्जी असे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पातून दहा ते बारा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


            पर्यावरणाच्या विनाशाने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलायला हवी, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचेल. आपल्या संस्कृतीमध्ये नदीला माता आणि निसर्गाला ईश्वर मानले जात असून पर्यावरण रक्षणाचे शाश्वत विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे.


            कणेरी मठ येथे काडसिद्धेश्वर स्वामीजींनी शेतीत प्रयोग केले. पर्यावरणपूरक शेती बनवली. कणेरी मठ मोठे ज्ञानाचे भंडार असून हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव राज्याच्या अन्य शहरात आयोजित करून पंचमहाभूतांचे संवर्धन करण्याबाबत व्यापक काम होणे गरजेचे आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी वेगवेगळ्या कल्पना राबविल्या आहेत. त्यांच्या या कल्पना भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी मैलाचा दगड ठरतील.


            काडसिद्धेश्वर स्वामीजींनी विषमुक्त शेती करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले असल्याचे सांगून या महोत्सवात उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण स्वागत करतो, असे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले.


            श्री. जोशी म्हणाले, या लोकोत्सवातून देण्यात येत असलेला पर्यावरण रक्षण आणि शांतीचा संदेश विश्वभर पोहोचेल.


            पर्यावरण संवर्धनाविषयी ‘जाणू या पंचमहाभूतांचे महत्त्व जपू या त्यांचे अस्तित्व’ हा संदेश जगभर देऊया, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले. ते म्हणाले, आज पंचमहाभूतांचा समतोल ढासळला असल्याने यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. यासाठी ‘पर्यावरण रक्षणाची स्वतः पासून सुरुवात करुया, निसर्गाची हानी थांबवू या व पर्यावरण रक्षण हाच परमार्थ समजू या’, असे आवाहन त्यांनी केले. कणेरी मठ येथे वेस्ट पासून बेस्ट बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप सुरु करण्याचा मानस असल्याचे स्वामीजी यांनी यावेळी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात शासनाच्या प्रत्येक विभागाने आपले योगदान दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले


            या समारंभात ‘सुमंगल विचार संपदा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि कापडी पिशव्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


            समारंभास पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.


०००००



 



शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी होणार

 शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी होणार


— प्रधान सचिव विकास खारगे.

            मुंबई, दि. 20 : शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी समितीची बैठक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली.


            या बैठकीस काही अशासकीय सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घ्यावयाच्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात राज्यभरात विकेंद्रीत पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करणे, शाहिरांचे पोवाडे व लोकगीतांचे कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करणे याचबरोबर शाहीर साबळेंच्या चरित्रावर आधारित पुस्तक प्रकाशित करणे, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करणे, शाहीर साबळे यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन तयार करणे, इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


            यावेळी बोलतांना सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, नुकतेच राज्याने “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात आले असून हे गीत शाहीर साबळे यांनी म्हटले आहे. हे गीत त्यांनी इतके लोकप्रिय केले होते की अनेकांना ते आधीच राज्यगीत आहे असे वाटत होते. आजच्या बैठकीत प्रत्येक सदस्याने केलेल्या सूचनांची दखल शासनाने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा या उपक्रमांना भक्कम पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केलेले सादरीकरण तसेच बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे याचा एकत्रित कालबद्ध आराखडा तयार करुन राज्य शासनाची मंजुरी घेण्यात येईल.


            शाहीर साबळे जन्मशताब्दी समितीतील प्रत्येक सदस्याने एकाहून अधिक उपक्रमाची जबाबदारी घेतली, याबद्दल श्री.खारगे यांनी आनंद व्यक्त केला. जन्मशताब्दीनिमित्त शाहीर साबळे यांच्यावर चरित्रग्रंथ लेखनाची जबाबदारी प्रकाश खांडगे यांच्याकडे देण्यात आली आहे. या चरित्रग्रंथासाठी शासन पूर्ण सहाय्य करेल असे श्री खारगे यांनी यावेळी सांगितले.


            या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सहसंचालक श्रीराम पांडे, प्रकाश खांडगे, अंबादास तावरे, कैलास म्हापदी हे प्रत्यक्ष आणि केदार शिंदे, भरत जाधव, नंदेश उपम, अंकुश चौधरी आणि चारुशीला साबळे वाच्छानी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


००००

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी -

 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी

- केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला

 

            पालघर, दि. 20 : मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. प्रथमच या योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांनी दिली.

            पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे महा - मत्स्य अभियानांतर्गत सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.रूपाला बोलत होतेवनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारखासदार राजेंद्र गावितआमदार श्रीनिवास वनगा तसेच मच्छीमार बांधव उपस्थित होते.

            केंद्रीय मंत्री श्री. रूपाला म्हणाले, किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बांधवांना 7 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मच्छीमार बांधवांनाही टक्के दराने कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा सर्व मच्छीमार बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. रूपाला यांनी केले.

            मत्स्य उत्पादन अधिक काळ टिकण्यासाठी शीतगृहाची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढच्या पिढीलासुद्धा मत्स्य उत्पादनाचा लाभ मिळावा यासाठी मत्स्य संगोपन व संवर्धनासाठी मच्छीमार बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.रूपाला यांनी केले.

पालघर जिल्ह्यामध्ये मच्छी मार्केट उभारले जाणार

- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मत्स्य उत्पादन विक्री करण्यासाठी मच्छीमार बांधवांना हक्काची बाजारपेठ आवश्यक असल्याने पालघर जिल्ह्यामध्ये सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाणार असल्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            मच्छीमार बांधवांना डिझेल परतावा मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तसेच डिझेल परतावा मिळण्यासाठी विलंबही होतो. डिझेल परतावा वेळेवर मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यामध्ये याविषयी कायदा करण्याची आवश्यकता असल्यास राज्य शासन मच्छीमारांच्या हितासाठी कायदाही करेल, असे श्री. मुनगंटीवार यांनी आश्वस्त केले.

            वाढवन बंदराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


सवय झालीच पाहिजे

 मी : उपम्याला परत मीठ जास्त झालंय,

25 वर्षात हाताला सवय कशी काय होत नाही?

😡😡😡


बायको : मी म्हणते नसेल झाली हाताला सवय,

पण 25 वर्षात जिभेला सवय व्हायला काय हरकत होती?

जिन्दगी गुलजार है

 








Featured post

Lakshvedhi