सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 15 February 2023
पत्रकारांसाठी पत्रकार चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा २०२३ आयोजित
महोदय,
अलिबाग प्रेस असोसिएशन ही अलिबागमधील कार्यरत पत्रकारांची संघटना आहे. अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडासंकुल, नेहुली - अलिबाग येथे ही स्पर्धा शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी खेळविली जाणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकारांचे संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेदरम्यान आपण भेट देवून आम्हाला उपकृत करावे अशी आपणास विनंती आहे.
आपला विनित
राजेश भोस्तेकर
चिटणीस अलिबाग प्रेस असोसिएशन ९८८१८७८१३२
सुप्रभा
*हातात हात घेतला तर मैत्री होते..*
*दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..*
*हातावर हात आपटला तर टाळी वाजते..*
*कुणाचा हात धरला तर साथ होते..*
*कुणाला हात दाखवला तर धमकी होते..*
*हात वर केले तर असाहाय्यता दिसते..*
*हाता वर हात ठेवले तर निष्क्रियता दिसते..*
*हात पुढे केले तर मदत होते..हात पसरले तर मागणी दिसते..*
*हाताचे महत्व इतक की अनेक हात पुढे आले तर*
*अशक्य ते शक्य होते.*🌹🌹🌹🌹🌹
🙏🏻🙏🏻 *सुप्रभात.*🙏🏻🙏🏻
खराब नोटा?
फाटलेल्या, घाण किंवा खराब झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी कृपया आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जा. अधिक माहितीसाठी 14440 वर मिस्ड कॉल द्या. -RBI
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुमारे १२ लाख प्रकरणे निका
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुमारे १२ लाख प्रकरणे निकाली
वाहतूक विभागाला ५१ कोटींहून अधिक महसूल.
मुंबई, दि. 14 : राज्यभरात दिनांक ११ फेब्रुवारी, 2023 रोजी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११.९५ लाख दखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून ७.८० लाख वाहतूक विभागाची ई- ट्रॅफीक चालनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे ५१.२० कोटीं रूपये निधी वसुल होऊन मिळाला आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व प्रभारी मुख्य न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला, प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व न्यायमूर्ती रमेश धानुका, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती, उपसमित्या आणि ३०५ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
लोक अदालतीच्या 5 दिवस आधी घेण्यात आलेल्या विशेष अभियानामध्ये 55 हजार 687 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीततेसाठी न्यायमूर्ती बी. रमेश धानूका, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी लोक अदालतपूर्व बैठका आयोजित करण्यावर भर दिला होता. न्यायमूर्तींच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीपूर्वी अनेक समुपदेशन सत्रे आयोजित करण्यात आली होती. ज्यामुळे पक्षकारांना विरोधी पक्षाशी संवाद साधण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळाली. राज्यभरात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकांचे वसुलीचे दावे, वैवाहिक प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेले तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती. विशेष बाब म्हणजे वैवाहिक वाद प्रकरणामध्ये 100 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये आपसात तडजोड झाली.
ही राष्ट्रीय लोक अदालत आणि यापूर्वीच्या लोक अदालतीचे प्राप्त यशावरुन असे दिसून येते की, वैकल्पिक वाद निवारण केंद्रासोबत राष्ट्रीय लोक अदालत देखील विवादांचे निराकरण करण्यासाठी योग्य यंत्रणा आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्यानंतर उभयतांच्या संमतीने लेखी तडजोड नोंद केली जाते व त्याआधारे ॲवार्ड पारीत केला जातो. तो ॲवार्ड हा अंतिम असतो व त्याला हुकूमनाम्याचे स्वरुप प्राप्त होते. त्या ॲवार्डच्या विरुद्ध अपीलाची तरतूद नाही. लोक अदालतीमध्ये प्रकरण निकाली निघाल्यावर पक्षकारांना संपूर्ण कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.
मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे एका धनादेश अनादरित प्रलंबित प्रकरणामध्ये दृकश्राव्य माध्यमाद्वारे तडजोड झाली. त्यात या प्रकरणातील एका पक्षकाराने अमेरिकेतून दृकश्राव्य पद्धतीने हजेरी लावली व एक पक्षकार न्यायालयात हजर होते. तसेच एका पुनर्विलोकन अर्जामध्ये (धनादेश अनादरित प्रकरणामध्ये) तडजोड झाली. त्यामधील धनादेशाची रक्कम ही रुपये 200 कोटी एवढी होती.
जळगाव विधी सेवा प्राधिकरणातील एका मोटार अपघात नुकसान भरपाईमध्ये उभय पक्षकाराकडून तडजोड होऊन लोक अदालतीच्या दिवशीच पक्षकाराला नुकसान भरपाई रक्कम रुपये 2.25 कोटी रुपयेचा धनादेश देण्यात आला.
पुढील राष्ट्रीय लोक अदालत ही दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीमध्येही सर्व संबंधित लाभधारकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी केले आहे.
000
Tuesday, 14 February 2023
भारत रंग महोत्सवाला आजपासून प्रारंभ
भारत रंग महोत्सवाला आजपासून प्रारंभ
दिल्ली आणि गुजरातमध्ये मराठी नाटके सादर होणार.
नवी दिल्ली, 14 : प्रतिष्ठित राष्ट्रीय नाटक विद्यालयातंर्गत होणाऱ्या 22 व्या ‘भारत रंग महोत्सवा’त दिल्लीसह अन्य शहरांत 6 मराठी नाटके सादर केली जातील. दिल्लीत 2, नाशिकमध्ये 3 आणि केवडिया येथे 1 अशी एकूण सहा शहरांमध्ये नाटके दाखविली जाणार आहेत.
22 वा भारत रंग महोत्सव आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल, नाटक दिग्दर्शक तथा अभिनेते राम गोपाल बजाज, अभिनेत्री आणि निर्माता वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाटक विद्यालयाचे संचालक रमेश चंद्र गौर यांच्या उपस्थितीत कॉपरर्निकस मार्ग येथील कमानी सभागृहात मुख्य कार्यक्रम सोहळयाचे उद्घाटन होईल. यावर्षी दिल्लीसह अन्य दहा शहरांत ‘भारत रंग महोत्सव’ साजरा होत आहे.
दिल्ली येथे रविवार 19 फेब्रुवारीला सांयकाळी 6 वाजता ‘शब्दांची रोजनिशी’ हे नाटक सादर केले जाईल. गुरूवारी 23 फेब्रुवारीला सांयकाळी 6.30 वाजता ‘मराठी कर्ण’ (दशावतार) हे नाटक सादर केले जाईल. हे दोन्ही नाटके कमानी सभागृहात सादर होतील.
नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने महाकवी कालीदास कलामंदीर सभागृह येथे 18, 20 तसेच 23 फेब्रुवारीला ‘संगीत मत्स्यगंध’, ‘विश्वामित्र’, ‘संगीत सुवर्णतुला’ ही नाटके सादर केली जाणार आहेत. केवडिया येथे गुजरात स्टेट संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने एकता सभागृहात 23 फेब्रुवारीला ‘तेरव’ हे नाटक सादर होणार आहे. महाराष्ट्रातील हिंदी नाट्य संस्थांची नाटकेही दिल्लीसह अन्य शहरांत सादर केली जाणार आहेत.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
