Tuesday, 14 February 2023

देशात उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्याचे ध्येय

 देशात उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्याचे ध्येय  .

- कुणाल सत्यार्थी

            मुंबई, दि. 14 : “जगात उष्माघाताचे सर्वात जास्त प्रमाण भारतात आहे. यावर उपाययोजनांबाबत दोन दिवसीय कार्यशाळेत सखोल चर्चा झाली असून यंदा भारतात उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्यासाठी शासन, संस्था, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक घटक सर्वांनी मिळून काम करू”, असे आवाहन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी यांनी केले.


            ‘उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आयआयटी पवई येथे करण्यात आले होते. त्याच्या समारोपीय चर्चासत्रात श्री. सत्यार्थी बोलत होते.


             देशातील विविध राज्यांतील व महाराष्ट्रातील विविध शासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी उष्णतेच्या लाटांविषयी संशोधन, अभ्यास आणि उपाययोजनांबाबत कार्यशाळेत आपले मत मांडले.


            उष्ण लहरींच्या वाढत्या प्रभावाने मनुष्यजातीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा विविध पद्धतीने नुकसान होताना दिसत आहे. उष्णतेच्या बचावासाठी असलेल्या कृती आराखड्याबरोबरच माहितीचा प्रसार, पायाभूत सुविधा, वर्तणूक, संस्थापक क्षमता निर्माण करणे, तांत्रिक, नैसर्गिक घटकांचा वापर करुन उष्माघातापासून बचाव कसा करता येऊ शकेल, यावर या चर्चासत्रात चर्चा करण्यात आली.


            उष्ण लहरी शमविण्यासाठी राज्य शासनाच्या कृती आराखड्याची पुनर्रचना आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ग्रामीण भागात उष्ण लहरींमुळे प्रभावीत होणाऱ्या पिकांसाठी उपाययोजना सांगाव्यात, शेती, जनावरे आणि कामगार वर्गामध्ये जातील जास्त माहिती पोहचविल्यासाठी प्रयत्न करावेत, शहरांमध्ये 'उष्ण लहरींबाबत सर्व माहिती संकलन आणि नियंत्रणासाठी ‘हिट अधिकारी’ यांची नेमणूक करावी, आंतर - संस्था समन्वय साधण्याचे प्रयत्न व्हावेत, उष्ण लहरींचे निरीक्षण करण्यासाठी संशोधन आणि माहिती संकलित करावी, उष्णतेच्या आरोग्यावरील होणाऱ्या परिणामांसंदर्भात संशोधनाला चालना दिली जावी, असे मत प्राधिकरणाच्या डॉ. कृष्णा वत्सा यांनी मांडले.


            उष्ण लहरींबाबत आणि त्यावरील उपाययोजनांबाबत प्रसिद्धी करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागांसाठी स्वतंत्र आराखडा असावा, तेथील लोकांच्या गरजेनुसार आणि त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रसिद्धी करावी, असे पत्रसूचना कार्यालयाचे अमनदीप यादव यांनी सांगितले.


            देशातील प्रत्येक भागात वेगवेगळे तापमान असते. तसेच दोन्हीकडे एकसारख्या तापमानातही लोकांची जीवनपद्धती वेगळी असू शकते, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना आखणे गरजेचे आहे. झोपडपट्टी भागात दाटीवाटीत राहणाऱ्या वस्तीत जास्त तापमान असते, आग लागण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत कमी खर्चात योग्य उपाययोजना कशा कराव्यात यासाठी संशोधन होणे गरजेचे असून, उष्माघाताने होणारे बळी हे नैसर्गिक आपत्तीत गणले जावे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.


            आज झालेल्या समारोपीय चर्चासत्रात ‘उष्ण लहरींवर उपाय’ यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग, सहसचिव कुणाल सव्यार्थी, डॉ. कृष्ण वात्सा, सचिव अलोक, महिला हाऊसिंग ट्रस्टचे संचालक बिजल ब्रह्यभट्ट, सीडस् चे संचालक मनु गुप्ता, NRDC चे डॉ. अभियंत तिवारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर, प्रो. रवी सिन्हा यांसह शैक्षणिक संस्थातील तज्ज्ञ, शासकीय अधिकारी उपस्थित होते.


०००

दिलखुलास' कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ

 दिलखुलास' कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ

डॉ. श्रीपाद बाणावली यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक बाल कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 15, गुरूवार दि. 16 व शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी ‘जागतिक बाल कर्करोग दिवस’ जगभर पाळला जातो. कॅन्सर या आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता यावी तसेच वेळीच या आजाराला पायबंद घालता यावा हा जागतिक बाल कर्करोग दिवस पाळण्यामागचा मुख्य उद्देश आहे. बाल कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती, टाटा मेमोरियल सेंटरचे अधिष्ठाता व कॅन्सर तज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000





टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचा 'महाराष्ट्राचा महासंकल्प' कार्यक्रम

 सर्व क्षेत्रांच्या समृद्धीसाठी विकासाच्या रोडमॅपद्वारे कामे सुरू

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचा 'महाराष्ट्राचा महासंकल्प' कार्यक्रम.

            मुंबई, दि. 14 : सर्व क्षेत्रांच्या आणि समाजाच्या समृद्धीसाठी विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याद्वारेच राज्यातील विविध विकासकामे वेगाने प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            दादर येथे टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या वतीने 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत उपस्थित होते.


महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. 15 टक्के जीडीपी महाराष्ट्र तयार करतो. 20 टक्क्यांपेक्षा जास्त निर्यात महाराष्ट्रातून होते. सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. 38 टक्के थेट विदेशी गुंतवणूक ('एफडीआय') महाराष्ट्रात येते. देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमीचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला वन ट्रिलियनची करावी लागेल. महाराष्ट्राची लवकरात लवकर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकडे वाटचाल करत आहोत. तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात येत आहेत. यातून वेगवान विकास घडत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर


            पायाभूत सुविधांचा विकास हा विकासाचा मूलमंत्र आहे हे जाणून पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे.


            सेवा, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. याद्वारे 14 जिल्हे थेट 'जेएनपीटी' बंदराशी जोडले जात आहेत. पाच हजार किलोमीटरचे अॅक्सेस कंट्रोल हायवे तयार करण्यात येत आहेत. समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेण्यात येत आहे. 25 हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक तेथे येत असून भविष्यातील स्टील हब म्हणून गडचिरोलीची नवी ओळख निर्माण होईल. नागपूर-गोवा हायवेमुळे मराठवाड्यातील पाच जिल्हे इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग होतील यामुळे शेती व उद्योगालाही चालना मिळेल. विरार-अलिबाग कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे. पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी ऑरिक सिटी आकारास येत आहे. एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोमुळे नागरिकांना सुविधा मिळत आहे.


            नवी मुंबईचे विमानतळ आणि ट्रान्स हार्बर लिंक ची उभारणी याद्वारे तिसरी मुंबई आकाराला येत आहे. मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


इनोव्हेशनच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे स्टार्टअप आणि 'इनोवेशन'चे कॅपिटल आहे. देशातील 80 हजार स्टार्टअप्स पैकी पंधरा हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील शंभर युनिकॉर्न पैकी 25 युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. इनोव्हेशनच्या माध्यमातून इकोसिस्टीम तयार करून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येत आहे. डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्राची क्षमता देशात 60 टक्के झाली आहे.

जलयुक्त शिवार- 2 च्या माध्यमातून कृषी क्षेत्राला अधिक चालना.

            जलयुक्त शिवार- एकद्वारे 39 लाख हेक्टर जमीन रब्बीच्या पिकाखाली आली. जलयुक्त शिवार- दोनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करत कृषी क्षेत्राला अधिक चालना देण्यात येत आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून, 'टनेल टेक्नॉलॉजी' च्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यातील भागात आणत आहोत. याद्वारे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम करण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे पश्चिम विदर्भातील दुष्काळी जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येणार आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामविकासाला अधिक बळकट करण्यात येत आहे. आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल या दृष्टीने अधिक विचार करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने ॲग्री बिजनेसद्वारे गावातील प्राथमिक कृषी सोसायटी बहुउद्देशीय बनविण्यात येत आहेत. त्यांना ॲग्री बिझनेस सोसायटी करण्यात येत आहे. याद्वारे कृषी क्षेत्रात मूल्यसंवर्धन होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आरोग्य क्षेत्रातही आमूलाग्र बदल

            शालेय आणि उच्च शिक्षणातही दर्जा वाढ करण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रातील सुविधांमध्येही आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येत आहे. समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी व त्यांना घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


-----000-----


 



 



Na ती



 

मुलगीही हुंडी मागते.

 *हुंडा फक्त मुलगाच मागतो का...?*

*जरा विचार करून बघा.......*

*सर्वप्रथम अनामिक लेखकाचे मनापासून आभार.* 🙏🏻🙏🏻🌹🌹


*समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त.*


*मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली.*

*“समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…”*

*“हं. जाऊ चल. आलोच.” समीर आवरुन हॉलमध्ये आला. आई तिथेच होती. “चला आईसाहेब” असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला. पाठोपाठ आईसुद्धा बाहेर पडली.*


*गाडीमध्ये बसल्यानंतर समीरने आईला विचारले,*

*“तू भेटली आहेस का त्यांना या आधी ?”*

*“हो रे.. एकदा भेट झाली आहे आमची..”*

*“माझ्या अटींबद्दल सांगितले का..”*

*“हो… ते तयार आहेत. अगदी तुझ्या मनासारखंच होईल.”*


*आईच्या या उत्तरावर समीर किंचित हसला. ते दोघे मुलीच्या घरी पोहोचले.*

*मुलीच्या वडिलांनी समीर आणि आईचे स्वागत केले.*

*घरी बाकी साऱ्याची ओळख करून दिली आणि मुलीच्या आईला म्हणाले,*


*“आर्या ला बोलवा .”*

*“हो..”*

*आर्यच्या आई हसतमुखाने म्हणाल्या.*

*थोड्या वेळाने आर्या आली.* *शिडशिडीत, सावळी, सुंदर आर्या. उंच, गोऱ्या समीरला शोभेल अशी.*


*समीरला आर्या पाहताक्षणी आवडली. तिने समीरच्या आईला वाकून नमस्कार केला आणि समीरच्या बरोबर समोर अलगद बसली.*

*काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला.*


*नंतर आर्याच्या वडिलांनी तिला व समीरला पाठवले.* 

*समीर व आर्या गच्चीत आले होते. दोन-चार शब्दाची देवाण-घेवाण झाल्यानंतर समीर म्हणाला,* 

*“तुम्हाला मुंबईला यावं लागेल लग्नानंतर…”*


*“हो.. ते माहिती आहे की मला…"*


*“कसं काय ?”*


*“म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या… म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला.”*


*“अस्स… बर…"*


*"तसं तर मी आईलाही आताच नेणार होतो पण ऐकत नाहीत आईसाहेब..." यावर आर्या म्हणाली, “म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला ?”*


*“हो.. अर्थात…”*


*समीरच्या या उत्तरावर आर्याच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या.*


*“काय झालं ?”*


*“काही नाही…”*


*“सांगा.. बिनधास्त. मनात शंका ठेवून राहू नका.”*


*“खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये सेटल आहात, कारण पुण्या-मुंबईसारखं मनमोकळं इथे जगता येत नाही म्हणून मी तयारही झाले होते. पण, आता तुमच्या आई येणार म्हणजे…”*


*तिला मध्येच तोडत समीर म्हणाला,*


*“मला कळालं तुम्हाला काय म्हणायचे आहे, चला जाऊ या.”*


*“पण…”*


*“उरलेलं खाली जाऊन बोलू…”*


*ते दोघे हॉलमध्ये आले. त्यांना पाहून आर्याचे बाबा मिश्कीलीने बोलले,*


*“लवकर आलात…*


*तर मग तुम्ही कळवा आम्हाला मग पुढील बोलणी करू.”*


*“हो, नक्की..” समीरच्या आई बोलल्या.*


*"मला बोलायचं आहे… सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत…” समीरच्या या वाक्यावर सगळे खूप दचकले...*


*“का ? काही प्रॉब्लेम ?" आर्याचे बाबा म्हणाले.*


*अक्च्युअली, मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावईही व्हायचं आहे. पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून नाही व्हायचं.”*


*“म्हणजे..” आर्याचे बाबा म्हणाले.*


*“म्हणजे, तिला फक्त मी हवा आहे. माझी आई नको.*

 *माझी नाती नकोत आणि सर्वात महत्त्वाचे हुंडा तर मला पटतच नाही… तो देणे आणि घेणे हे मला आवडत नाही.”*


*“पण आम्ही हुंडा मागितला तरी कुठे…? आणि तुमच्या आईंनी आधीच सांगितले की तुम्हाला हुंडा नको म्हणून.”*


*“हो, आम्हाला नकोच आहे हुंडा… पण तुमच्या मुलीला हवाय…”*


*“काही पण बोलू नका. मी असं काही मागितलं नाही आहे…”*


*“वेल सेटल, पुण्या-मुंबईत राहणारा, एकुलता एक, त्याच्या आई-वडिलांची जबाबदारी नको हा हुंडाच झाला की आणि तो देणं मला जमणार नाही."*


*लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळायलासुद्धा नको का ?*


*जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात… एखादी गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे.*


*एखाद्याला स्विकारताना त्याच्या गुण- दोषांसोबत त्याची नातीसुद्धा मनापासून स्विकारली तरच नातं खुलतं… असो ! चल आई निघू या आपण.”*


*असे म्हणून समीर निघून गेला आणि निरुत्तरीत होऊन आर्या व तिच्या घरचे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते.*


*मुलगा सरकारी नोकरीला पाहिजे, स्वत:चे चांगले घर पाहिजे, खूप बँक बँलंस पाहिजे, चारचाकी गाडी असावी आणि मुलाकडे खूप प्रापर्टी असावी...........*


*मुलीला सर्व सुखसोयी मिळाव्यात हा प्रत्येक आई वडिलांचा प्रयत्न असतो. पण मुलीला लग्नासाठी तयार करताना आई-वडिलांनी तिला आधी सासरची जबाबदारी घेणं, नाती सांभाळणं विशेष म्हणजे सासू-सासऱ्याचा स्वतःच्या आई-वडिलांसारखा सांभाळ करणं हे देखील शिकवायला हवं !*


*मुलाला शिकवायचं, नोकरी लावायची, छान घर बांधून द्यायचं अन् त्याच आई- वडिलांची अडचण कशी होऊ शकते मुलींना कळत नाही. पण आर्यासारख्या मुली समाजात बघायला मिळतात. म्हणजे नवलच म्हणावं लागेल.*


*आई- वडिलांनी रक्ताचं पाणी करून ज्या मुलाला घडवलं त्याच मुलाचं लग्न होताच आई- वडिलांनी एकदम त्याच्या आयुष्यातून एक्झीट घ्यायची. का ? तर त्यांना सुन-मुख हवंय, मुलाचं लग्न हवंय. पण अशा मुली स्वतःच्या भावांचा का नाही विचार करीत !*


*त्यांच्या येणाऱ्या वहिनींनी पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आई-वडील नको. तर मुलींनी चांगल्या भविष्याचा विचार जरूर करावा पण कुटुंब तोडून नाही !*


*आणि हो*


*कृपया फक्त वाचू नका तर मनःपूर्वक विचार करा ही विनंती. कारण आज संपूर्ण समाजात थोडेसे सोडले तर अशीच परिस्थिती आहे. फक्त मान्य करायला मोठं मन हवं..!* 👍🏻💯🔥🙏🏻

Beej अंकुरे अंकुरे

 अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो.


मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो.


हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात.


अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं,


'कुठून आणता ही सीताफळं? तुमचे मळे आहेत का?'


'कुठले मळे साहेब? आम्ही गरीब माणसं. लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात.


झाडं उगवलीत दरीत. सारं फुकटच. आम्ही फळं गोळा करतो. पिकवतो आणि तुम्हाला विकतो.


शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची.'


त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते.


पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी!


बारमाही काम करता येईल असा हा देश.


बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती.


बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो.


वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते.


ही दृष्टी किती लोकांची असते? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल..

Toll tax

 


Featured post

Lakshvedhi