Monday, 13 February 2023

विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार

 विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार


  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमिपूजन


        नाशिक, दि. : 13 (जिमाका वृत्तसेवा) : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            आज नांदगाव तालुक्यातील करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टी यांचे भूमिपूजनाच्या आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला 15 टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वाने येथील स्थानिकांना दररोज पाणी मिळणार असून त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मनमाड म्हणजे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथील रस्त्यांच्या विकासाकरिता निधी देण्यात येऊन बंद असलेल्या योजना सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद इमारतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.


            ते म्हणाले, नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एमआयडीसी सुरू करण्याकरिता येत्या नजीकच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे फिरते दवाखाने, फिरते कार्यालये या संकल्पनाचे कौतुक करून यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे काम येथे होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार : डॉ भारती पवार


            आज करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनातून महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी करंजवण -मनमाड पाणी पुरवठा योजनेस तात्काळ मंजूरी दिली आहे यातून त्यांची कामाबद्दलची तत्परता गावोगावी पोहचत आहे. नांदगाव शहरात साकारत असलेली भव्य शिवसृष्टी केवळ नांदगावचा नाहीतर सर्व महाराष्ट्रातील जनतेचा ऐतिहासिक वारसा आहे. नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव व सटाणा तालुक्यांचा समावेश करण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येवून त्याबाबत मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी पाणीपुरवठामंत्री श्री. पाटील म्हणाले की, या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या 50 टक्के समस्या कमी होणार आहेत. या योजने सोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीने देखील 500 कोटी रुपयांच्या पाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मनमाडच्या विकासात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर व मार्गस्थ -२ गावे पाणी पुरवठा (करंजवण धरण उद्भव) योजना, शिवसृष्टी व ललवाणी उपजिल्हा रुग्णालय, मनमाड या कामांच्या कोनशिलांचे अनावरण करण्यात आले. तसेच फिरते दवाखाने व फिरते कार्यालये असलेली वाहनांचे लोकार्पण करून दिव्यांग बांधवांसाठी सायकलींचे वाटप यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



बलिदान मास

 


लगीन करावं पाहिजे

 *आता लग्नात नाचणाऱ्यांची गरज संपली* 🤦‍♀️😄


मी श्री स्वामी समर्थ पाहिले

 🙏🌸 *: मी श्री स्वामी समर्थ पाहिले :* 🌸🙏


*"खरोखरच मनापासून वाचाल तर डोळ्यात पाणी येईल.*


      एका भयाण रात्री *"मठाच्या* पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण *पंधरा वर्षाचा एक मुलगा* अभ्यास करताना पाहिला.

*थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण वाचनात *मग्न* होता. 


हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. 

दिवसा कधी दिसत नसायचा. 

खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. 

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. 

मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ. 

         

*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील. 

मी त्या मठाकडे आलो. 

तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मठाच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला. 

मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो.

मला बघून तो गालातल्या गालात *हसला.* 

जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 

मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? 


सर माझ्या *घरात लाईट* नाही. 

माझी *आई आजारी* असते. 

दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास करायला. माझी *ऐपत* नाही.


बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ? 


सर तुम्ही *स्वामी* आहात !


नाही रे! 


सर तुम्ही माझ्या साठी *स्वामीच* आहात. 


ते जाऊदे तू *जेवलास* का? 

मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे. 


सर म्हणूनच मी *हसलो.* 

मला माहित होतं. 

माझे ( स्वामी ) कोणत्याही *रूपात* येतील पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार. 

मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो, ते काहींना काही मला *देतातच.* 

कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* ते मला देऊन जातात. 

आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो. 

मला माहित होतं....ते काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात.

तुम्ही *स्वामी* आहात ना !


मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं. 

रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *स्वामींना* कोसत होतो. त्यांनी आज मला *देवा ची उपाधी* देऊन लाजवलं होतं.


 त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो.

माझे डोळे *तरळले.*

त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 

तो पाच मिनिटांनी परत आला. 

त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती. 

सर, 

माझी *आई* सांगते, ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत.


क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती कडे* पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटले. 


नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.

*शाळा, कॉलेज, मंदिर,मठ बंद* झाले. 

देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर *शुकशुकाट* झाला.

असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *मठाकडे* डोकावलं.

रात्रीची वेळ होती.

मठाच्या पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही. 

वाईट वाटलं मला.  

या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?

काय खात असेल ?

कसा जगत असेल ?

असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले. 


कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले. 

असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला. 

मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले.

सर्व आपल्या घरी निघाले. 

निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो. 

पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे* धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता. 

मला बघून त्याने आवाज दिला, 

सर .... 


अरे तू *इथे* काय करतोस ? 

सर आता मी *इथेच राहतो.* 

आम्ही घर बदललं.

*भाडं* भरायला पैसे नव्हते. 

त्यातच लॉकडाऊन मध्ये *मठ* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.

 

मग मला घेऊन आई इथे आली. 

काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे. 

त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत. 

तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.* 

ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो.

 

सर मी *हार* नाही मानली. 

*आई* सांगायची........

ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार. 


बरं..... तुझी आई कुठे आहे ? 

सर ती *कोरोनाच्या* आजारात *गेली.* 

तीन दिवस ताप खोकला होता. 

नंतर दम अडकला. 

मी कुठे गेलो नाही.  

इथे *पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला. 

*१४ दिवस* इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो.

*सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची.

*आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं. 

          

सर तरी मी *हरलेलो* नाही पण *दुःख* एव्हढच आहे की मी *पास* झालेलो पहायला *आई* ह्या जगात *नाही.* 

ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश* असेल हे माझं *यश* बघून.  

कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय. 

आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर *खरी अडचण* उभी राहिलीय. 

*ऑनलाईन* अभ्यास करायला माझ्या जवळ *मोबाईल* सुद्धा नाही. 


असो 

सर, 

तुम्ही का वाईट वाटून घेता ? 

तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ? 

सर, 

तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा. 


त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.

चिमूटभर माझ्या हातावर ठेवली. 

सर *तोंड गोड* करा. 


तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो.

*भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*


सर, 

मला माहीत होते, *स्वामी* या जगात आहे आणि ते माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार. 

त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकवला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो. 

आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......

न सांगता. 


खरे स्वामी तर कधीच नाही दिसले पण, 

मी त्या *मुलाच्या डोळ्यात स्वामी* पाहिले ....

 

*स्वामी पाहिले....*


       🙏 *धन्यवाद !!* 🙏


हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं.. 

म्हणून मी *शेअर* करतोय.....

 

कारण मलाही कळले स्वामी आहेच🙏🏻🌹 *श्री स्वामी समर्थ*🌹🙏

अध्यत्म

 


संध्या छाया, भिवावती हृदयया

 


शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार

 शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार


                               - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        मुंबई दि.१२- महाराष्ट्र विविध क्रिडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित 'बोरिवली खेल महोत्सव 2023' या ठिकाणी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), आमदार प्रवीण दरेकर, बोरीवलीचे आमदार आणि खेळ महोत्सवाचे संयोजक सुनील राणे, दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी , कांदिवलीचे आमदार योगेश सागर, कुस्तीपटू तथा ॲथलिट नरसिंग पंचम यादव, यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध उपक्रम सातत्याने राबवित असून खेळाडूंच्या कौशल्याची दखल घेऊन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्यांना यापूर्वी शासकीय सेवेत नियुक्ती दिलेल्या आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपण महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यासह कुस्तीमध्ये विविध किताब जिंकलेल्या खेळाडूंच्या मानधनात तीन पट वाढ केली आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरी साठी महाराष्ट्रात खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षण सुविधा, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक पोषणतत्वे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह सर्व पूरक सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

            तसेच कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे. भारताला खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक कुस्तीमध्येच मिळवून दिले होते. आता ही आपले कुस्तीपटु वेगवेगळ्या ठिकाणी पदक मिळवत आहेत. खेलो इंडिया मध्येही विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळाडूंनी बजावली असून सर्वात जास्त पदक महाराष्ट्राने पटकावली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र भविष्यात उज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे, राज्याचे नाव मोठे करेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

            मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील आणि एशियन चॅम्पियन इरानचे हुसेन रमजानी यांची विशेष लढत यावेळी झाली. या लढतीत विजयी झालेल्या पृथ्वीराज पाटीलचा आणि प्रतिस्पर्धी कुस्तीपटु हुसेन रमजानीचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फेटा ,गदा देऊन सत्कार करण्यात आला. रोमहर्षक कुस्ती या खेळ महोत्सवात बघायला मिळाली यात आपल्या महाराष्ट्र केसरीने इराणच्या कुस्ती पटुला चित करून कुस्ती जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री यांनी आनंद व्यक्त करत दोन्ही कुस्ती पटुंना शुभेच्छा दिल्या.


000


 


 


 

Featured post

Lakshvedhi