Thursday, 9 February 2023

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

 ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस


            ठाणे, दि. 9 (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व पुस्तके वाटप करण्यात आली.


            स्वयम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयम् अॅपचे अनावरण, स्वयम् च्या ‘झेप’ या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयम् अॅपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्री महोदयांनी केली. यावेळी स्वयम् च्या संस्थापक डॉ. निता देवळालकर उपस्थित होत्या.


नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्वीकार


            मुख्यमंत्र्यांनी आनंदआश्रमात धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या शुभेच्छांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वीकार केला. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.


०००००

भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे

 भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे


- वांगचुक नामग्येल.

            मुंबई, दि. ९ : भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्या सामाजिक - आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भगवान बुद्धांशी संबंधित भारतातील सांस्कृतिक स्थळे भूतानच्या जनतेकरिता आदराची आहेत. भूतान नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. या पार्श्वभूमीवर भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा भूतानच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष वांगचुक नामग्येल यांनी येथे व्यक्त केली.  


            वांगचुक नामग्येल यांनी भूतानच्या दहा सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.


            सुरुवातीला संसद अध्यक्षांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्यावतीने राज्यपालांना शुभेच्छा कळवल्या. आपल्या भारत भेटीमध्ये आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतल्याचे नमूद करुन भूतान संसदेने भारतीय संसदेशी सहकार्य करार केल्याचे वांगचुक नामग्येल यांनी सांगितले.


            भूतानचे लोक सर्वात आनंदी असल्याचे आपण ऐकून आहोत. सांस्कृतिकदृष्ट्या भूतान व भारत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भूतानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याचा अभिमान वाटतो असे सांगून भूतान व भारत यांमध्ये व्यापार, वाणिज्य, लॉजिस्टिकस, याशिवाय पर्यटन, शैक्षणिक सहकार्य व जनतेच्या स्तरावर परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. भूतानमधील पर्यटकांनी भारतातील कुशीनगर, बोधगया, सारनाथ यांसह महाराष्ट्रातील अजंता वेरुळ लेण्यांना देखील भेट द्यावी असेही राज्यपालांनी सांगितले.   


            संसदीय शिष्टमंडळामध्ये भूतान संसदेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहांचे सदस्य असलेले विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. 


            यावेळी भूतान संसदेचे खासदार शैवांग ल्हामो, कर्मा गेलतशेन, ग्येम दोरजी, कर्मा वांगचुक, उग्येन वांगडी, कर्मा ल्हामो, उग्येन शरिन्ग, ल्हाकी डोल्मा, आदी संसद सदस्य उपस्थित होते.  


००००


 


 


 


Bhutan Parliament Speaker wants tourism ties with Maharashtra


 


       Mumbai 9 : A high level led by the Speaker of the National Assembly of Bhutan Wangchuk Namgyel met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Wed (8 Feb).


      Speaking on the occasion, Speaker Wangchuk Namgyel called for strengthening tourism ties with Maharashtra. He said India as also Maharashtra has many sites related to Buddhism which are of interest to the people of Bhutan. Stating that Maharashtra is home to the famous Ajanta and Ellora caves, he felt that tourism cooperation with Maharashtra will help people from both sides to visit each other.


      Chairpersons of various parliamentary committees of Bhutan and members of parliament were present.


००००



सह्याद्री मॅरेथॉन २०२३*.

 *सह्याद्री मॅरेथॉन २०२३*.... *_TWJ आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेल फेअर असोसिएशन माणगाव*_ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२/२/२०२३ रोजी भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी इच्छुक स्पर्धकांनी खालीलप्रमाणे दिलेल्या लिंकचा वापर करून आपला सहभाग नोंदवावा ही विनंती. प्रवेश फी रु. १००/- पुढील मोबाइल नंबर वर GPay चा वापर करून भरावी: ७५०७४०८४७८ सखाराम कदम. किंवा sakharamkadam977@okhdfcbank या UPI ID वर भरावी.  

टीप....सबंधित लिंक नोंदणी करताना आपण प्रवेश फी पाठविण्याचा स्क्रीनशॉट अपलोड करणे तसेच आधार कार्ड नंबर लागणार आहे ह्याची नोंद घ्यावी.

https://forms.gle/wM3DEUoSmBCFf5Ht5

जागरुक पालक, सुदृढ बालक


 आरोग्याच्या महायज्ञाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ


३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा


राज्यात ५०० ठिकाणी सुरू होणार 'आपला दवाखाना'

            मुंबई, दि. ९: राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना" या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.


            आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आली आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


आजच्या दिवसाचं औचित्य साधत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना" या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ होणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            ‘राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, स्त्री रुग्णालयं, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत "आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईलच, सोबतच त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळतील. याचाही लाभ राज्यभरातील जनतेला होईल’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मी स्वतः रक्तदान करीत असतो, हे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, रक्त ही निसर्गानं आपल्याला दिलेली मौल्यवान देणगी असून, त्यांच निरपेक्ष भावनेनं दान करण्यासारखं पुण्यकर्म नाही. हीच बाब लक्षात घेऊन आज राज्यात सुमारे ३६६ ठिकाणी "महारक्तदान शिबिरांचंही आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांत सहभागी होऊन रक्तदान करा, व एखाद्या गरजूला जीवनदान द्या”, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


            महाराष्ट्र नेहमीच रक्तसंकलनात देशात अग्रेसर असतो. तो यापुढेही राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करताना त्यांचे आभारही मानले. संकलित रक्त कुठेही वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. 


            राज्यात “जागरुक पालक, सुदृढ बालक” मोहीमही हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी या अंतर्गत होणार आहे.


            राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्या आहेत. आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे त्यासाठी कौतुकास पात्र आहेत. यापुढेही सामान्य माणसाची आरोग्यसेवा अशाप्रकारे होत राहील आणि आपला महाराष्ट्र समृद्ध आणि निरोगी राहील, अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


००००


तुज मागतो मी आता


 

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारी पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.

 डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारी पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 8 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज www.indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जाऊन भरावेत. नियम व अटी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचनेच्या परिशिष्ट पाच (V) मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरावे लागेल.


            पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार जर असेल तर, केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती/नोंदणी क्रमांक/मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही फसव्या फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी कळविले आहे.

सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा

 सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


भेंडी बाजार येथे प्रकल्पाच्या सेक्टर 4चे भूमिपूजन.

            मुंबई, दि. 8 :- स्मार्ट सिटींच्या उभारणीद्वारे लोकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत असून मुंबईतील भेंडीबाजारसारख्या गजबजलेल्या भागात आकारास येत असलेला सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा (SBUT) गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            भेंडी बाजार येथे सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या गृहनिर्माण प्रकल्प सेक्टर 4 च्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, दाऊदी बोहरा समुदायाचे जागतिक अध्यात्मिक नेते डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन, आमदार अमीन पटेल व मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा हा गृहनिर्माण प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबईतील भेंडीबाजार हा भाग अतिशय दाट लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. अशा गजबजलेल्या भागात हा प्रकल्प आकारास येत आहे हे नक्कीच कौतुकास्पद व पथदर्शी आहे. आपण सर्वजण परिवर्तनाबद्दल बोलतो पण हा प्रकल्प ख-या अर्थाने बदल घडविणारा ठरतो आहे. अनेक अडथळ्यांवर मात करत हा प्रकल्प उभा राहतो आहे. उत्थान हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे हे महत्वाचे. समाजाची श्रद्धा असेल, तर काय घडू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा प्रकल्प असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.


एसबीयुटी (SBUT) प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील धारावीसारख्या गजबजलेल्या भागाचेही पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. 'SBUT' प्रकल्पाचा मुख्य उद्देश लोकांचे जीवनमान उंचावणे असून हा प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट ठरेल. नागरी पुनरुत्थान घडवून आणणारा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरेल. शासनाकडून या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण होईल. इथे जर बदल घडू शकत असेल तर संपूर्ण मुंबईत असे प्रकल्प नक्कीच उभे राहतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.


            दाऊदी बोहरा समाजाचे आध्यात्मिक नेते सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन म्हणाले की, सर्व नागरिक या परिसरात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील गरजू लोकांना लाभ होणार आहे. स्मार्ट सिटीच्या उभारणीत हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.


स्मार्ट सिटीकडे वाटचालीसाठी प्रकल्प पथदर्शी


            सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 18 मे 2016 रोजी झाले. भेंडी बाजारातील सुमारे 250 मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी रुंद रस्ते, आधुनिक पायाभूत सुविधा, अधिक मोकळ्या जागा आणि अतिशय दृश्यमान व्यावसायिक क्षेत्रांसह 17 नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.


या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्दिष्ट 3200 कुटुंबे आणि 1250 व्यवसायांचे पुनर्वसन करण्याचे आहे. छोट्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांना 375 ते 400 स्क्वेअर फुटांची सुसज्ज घरे, निरोगी, स्वच्छ सुरक्षित वातावरण, आणि मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी पुरेशी जागा इथे उपलब्ध होत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल हा या प्रकल्पाच्या उभारणीचा महत्त्वाचा उद्देश आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करण्यात आला असून सर्व सोयी - सुविधांनी युक्त इमारती येथे बांधण्यात येत आहेत.


            'अन-नसर' नावाच्या सेक्टर 4 मध्ये पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या एकूण 16.5 एकर जमिनीपैकी अंदाजे 1.5 एकर जागा समाविष्ट आहे. An-Nasr मध्ये जवळपास 1400 निवासी युनिट्स आणि 375 पेक्षा जास्त व्यवसाय असतील. 74 मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे प्रत्येकी 53 आणि 54 मजल्यांचे दोन नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.


            या प्रकल्पाद्वारे हाती घेतलेले पुनर्विकास क्षेत्र उत्तम व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेसाठी नऊ उप-समूहांमध्ये (सेक्टर) विभागण्यात आले आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सेक्टर 6 अल-एझचाही समावेश आहे, त्यासाठीचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले. 2020 मध्ये, SBUT ने अल-सदाह नावाचा पहिला टप्पा पूर्ण केला ज्यामुळे 610 हून अधिक कुटुंबांचे आणि 128 कुटुंबांचे जीवनमान सुधारले. ट्रस्टने रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांसाठी नियोजित बांधकामांमध्ये किरकोळ आस्थापने देखील उपलब्ध करून दिली आहेत जेणेकरून त्यांचे जीवनमान चांगले होईल आणि एक सर्वसमावेशक समाज निर्माण होईल.


            पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून, भेंडी बाजार आधुनिक सुविधा, रुंद रस्ते, शाश्वत पद्धती आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi