Wednesday, 8 February 2023

परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

 परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते वेब पोर्टलचे उद्घाटन


            मुंबई, दि. 7 : महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थांमधून राबविण्यात येणाऱ्या नावीण्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील विद्यार्थ्यांना व्हावी, आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या वेबपोर्टलचे उद्घाटन सिंहगड शासकीय निवासस्थान मुंबई येथे करण्यात आले.


            राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार पसंती देतात. त्यांची प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी उमेदवारांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीचा मार्ग अधिक सुलभ होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


             यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेन्द्र ब. वारभुवन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.


            वेब पोर्टल हे प्रामुख्याने एनआरआय, एफएनएस, ओसीआय/पीआयओ व सीआयड्बल्यूजीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध विद्यापीठांच्या संबंधित अभ्यासक्रमांची माहिती व आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या लिंक उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


००००

Tuesday, 7 February 2023

Gathering prize winner

 

Rayan school 

आदर्श गाव, आदर्श घ्यवाच.

 


कसं आहे ना?



खूपच सुंदर अर्थपूर्ण आणि भावपूर्ण कविता 👌


*कसं आहे ना?* 


एक कागदाचं

पान असतं...!!


 *'श्री'* लिहलं, की 

पूजलं जातं ...


 *प्रेमाचे* चार शब्द 

लिहले, की

जपलं जातं...


काही *चुकीचं* 

आढळलं, की 

फाडलं जातं...


एक कागदाचं 

पान असतं...!!


कधी त्याला 

 *विमान* बनवून 

भिरकावलं जातं...


कधी *होडी* बनवून 

पाण्यात सोडलं जातं...


कधी *भिरभिरं* बनवून 

वाऱ्यावर फिरवलं जातं...


आणि कधी तर 

 *निरुपयोगी* म्हणून 

चुरगाळलंही जातं...


एक कागदाचं

पान असतं....!!


जे लेखकाच्या 

 *लेखणीला* हात देतं...


जे चित्रकाराच्या 

 *चित्राला* साथ देतं...


जे व्यापाऱ्याच्या 

 *हिशोबाला* ज्ञात ठेवतं...


आणि हो, 

वकीलासोबत *कोर्टात* गेलं, 

की *साक्षही* देतं...


एक कागदाचं

पान असतं.....!!


 *पेपरवेट* ठेवलं, की 

एकदम गप्प बसतं...


काढून घेतलं, की 

 *स्वच्छंदी* फिरतं आणि 

कशांत अडकलं, तर

 *फडफडायला* लागतं...


एक कागदाचं

पान असतं.....!!


ज्यावर बातम्या छापल्या, 

की *वर्तमानपत्र* बनतं...


प्रश्न छापले, की 

 *प्रश्नपत्रिका* बनतं...


विवाहाचं निमंत्रण छापलं, 

की *लग्नपत्रिका* बनतं...


तर कधी आदेश~संदेश

लिहले, की तेच *टपालही* 

बनतं...


एक कागदाचं

पान असतं....!!


 *माणसाच्या* जीवनांत

आणि *त्यांत* खूप

 *साम्य* असतं...!!


एक कागदाचं

पान असतं...!!

जन्मला आला तर birth certificate असतं

निधन झाला तर Death certificate असतं

एक कागदाचं

पान असतं 


🙏🏻

हसते हसते

 


अरे संसार संसार

 छान कविता. 

अरे संसार संसार 

*गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,*

*माणसं तडतड करत आहेत.*

*काय झालंय कळत नाही,*

*फारच चीडचीड करत आहेत.*


*नातेवाईक असो, मित्र असो,*

*भयंकर स्पर्धा वाढलीय.*

*तेंव्हापासूनच माणसाची,*

*मानसिक अवस्था बिघडलीय.*


*कुणी कुणाला काहीच विचारीना,*

*मनानचं कसंही वागायलेत.*

*आजूबाजूच्या लोकांकडून,*

*जास्तच अपेक्षा ठेवायलेत.*


*कमाई किती, खर्च किती,*

*काहीच कुठे मेळ नाही.*

*भेटायला जाणं, गप्पा मारणं,*

*आता कुणालाच वेळ नाही.*


*कॅपॅसिटी नसतांनाही,*

*खरेदी उगीच करायलेत.*

*Salary व्हायलीय कमी,*

*अन हप्तेच जास्त भरायलेत.*


*शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,*

*की हा घेतो फोर व्हीलर.*

*दूध बॅग आणायला सांगितली की,*

*मोजीत बसतो चिल्लर.*


*अरे, अंगापेक्षा बोंगा,*

*कशाला वाढवून बसतो.*

*पगार जरी झाली तरी,*

*उदास भकास दिसतो.*


*पर्सनल लोन, Gold लोन,*

*जे भेटेल, ते घ्यायलेत,*

*दिलेले पैसे मागितले तरी,*

*गचांडीलाच धरायलेत.*


*सहनशीलता आणि संयम,*

*कुठे चाललाय कळत नाही,*

*पॅकेज भरपूर मिळायलंय,*

*पण, समाधान काही मिळत नाही.*


*घरी काय दारी काय,*

*नुसत्या किरकीरी वाढल्यात.*

*नवऱ्याला न सांगताच,*

*बायकांनी भिश्या काढल्यात.*


*कितीही साड्या, कितीही पर्स,*

*शर्ट, पँटीला गणतीच नाही.*

*तरीही कुरकुर चालूच असती,*

*धड साडी तर कोणतीच नाही.*


*मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,*

*तुला अक्कल नाही.*

*बायकोनं म्हणावं,*

*तुम्हालाच काही कळत नाही.*


*दोनदोन दिवस अबोला,*

*कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.*

*लग्न झालं की पोरं पोरी,*

*वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.*


*पत्नी पीडित नवऱ्याच्याही,*

*संघटना निघत आहेत.*

*डोळे मोठे करून पोट्टे,*

*बापाकडेच बघत आहेत.*


*दिवेलागण, शुंभकरोती,*

*'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,*

*शक्य असेल याच्यामुळेच,*

*माणसां माणसात वितुष्ट आलं.*


*चित्त थोडं शांत ठेऊन,*

*जुनी पाने चाळावी लागतील.*

*यदाकदाचित पुन्हा माणसं,*

*एकमेकाशी प्रेमाने वागतील.* 

🙏🏻

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू;

 बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू;


बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ.

            मुंबई, दि. 7 : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवाचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला.या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


            मंत्री श्री. भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.


            यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील 'रॉक क्रिक' चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.


थोडक्यात वॉटर टॅक्सी विषयी


            बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे रस्तामार्गे अंतर ४० कि.मी असून त्या करिता अंदाजे १ तास ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. परंतु बेलापूर ते गेटवे हे जलमार्ग अंतर २४ कि.मी असून त्याकरिता फक्त एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.


            जेट्टीचे काम हे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत करण्यात आले असून या कामासाठी 8.37 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत 50:50 या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वाहनतळ व इतर सुविधांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून 4.35 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या ठिकाणी 75 चार चाकी आणि 85 दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


            मेसर्स नयनतारा शिपिंग प्रा. लि यांचेकडून नयन XI या बोटीद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर - गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर -गेटवे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया -बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. जलवाहतुकीचा प्रवास सर्वसामान्य लोकांकरिता सुलभ, सोईचे व लवकर होण्यासाठी या कंपनीमार्फत सद्यास्थितीत सामान्य बैठकीसाठी रु २५०/- व बिझनेस क्लास करिता रु. ३५०/- इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकीग My Boat Ride या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


            1 जानेवारी 2022 पासून नव्याने सुरु झालेल्या जलमार्गावरील फेरी आणि रो-रो बोटीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पाळीव प्राणी, वाहन, माल इत्यादीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करात पुढील 3 वर्षासाठी म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत सूट देण्यात आली आहे.


00000

Featured post

Lakshvedhi