Sunday, 5 February 2023

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक

 जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक

                                                                                    -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि.4 – “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.


            विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. आज या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका परिषदेत श्री. केसरकर बोलत होते. यावेळी जर्मनीच्या बाडेन वृटेमबर्गचे राज्यमंत्री डॉ. फ्लोरियन स्टॅगमन, लॉर्ड मेयर डॉ.फ्रँक मेंट्रप, स्टूटगार्ड चे महापौर थॉमस फुहरमन, जर्मनीचे महा वाणिज्य दूत अचिम फॅबिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


            मंत्री श्री केसरकर म्हणाले की, मुंबईचे जर्मनीतील विविध शहरांशी घनिष्ठ संबंध असून महाराष्ट्र जर्मनीशी हृदयाने जोडला गेलेला आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने विविध व्यावसायिक तसेच कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी करार केलेले आहेत. शाळांमधून व्यवसाय आणि कौशल्य आधारित प्राथमिक शिक्षण दिले जाते. जर्मनीमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असून जर्मनीची आवश्यकता विचारात घेता व्यवस्थित नियोजन करून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याबाबत परस्पर सामंजस्य करार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.


            महाराष्ट्रात पर्यावरण, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्यास वाव असून विशेषतः कोकणातील पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जर्मनीतील पर्यटकांनी कोकणात यावे, असे आवाहन श्री.केसरकर यांनी यावेळी केले. 


            जर्मनीतील राज्यमंत्री डॉ. स्टॅगमन यांनी यावेळी बोलताना भारत विविध क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटी, कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रात आम्ही सहकार्य करू इच्छित आहोत, तर जर्मनीला सुमारे चार लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ती पूर्ण करू शकतो. या माध्यमातून परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


0000

काळाघोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

 काळाघोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट


                   मुंबई, दि.5 : मुंबईतील कला प्रेमींसाठी संगीत नाट्य आणि कलेची मेजवानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला शनिवार दि. 4 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. या महोत्सवाला शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी काळा घोडा आर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


                   या महोत्सवात नृत्य, संगीत, व्हिज्युअल आर्ट्स थिएटर, साहित्य, खाद्य, बालसाहित्य आणि कार्यशाळा, सिनेमा, हेरिटेज वॉक, स्टँड अप कॉमेडी, स्ट्रीट आर्ट, शहरी डिझाईन आणि आर्किटेक्चर, व्हिज्युअल आर्टस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


                    काळा घोडा आर्ट असोसिएशन तर्फे आयोजित होणारा काळा घोडा कला महोत्सव फोर्ट आणि चर्चगेट परिसरातील रॅम्पर्ट रोड, क्रॉस मैदान, कूपरेज बँडस्टँड , म्युझियम गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या वर्षी पुन्हा एकदा कलाप्रेमींसाठी ही पर्वणी उपलब्ध होत आहे. हा महोत्सव 12 फेब्रुवारी पर्यंत कला रसिकांसाठी खुला राहणार आहे. 


                   सन 1999 मध्ये स्थापित झालेल्या या वार्षिक कलामहोत्सवाने देशातील तसेच जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात सुरु असलेल्या या कलामहोत्सवात ललित कला, नृत्य, नाटक - सिनेमा, वास्तुकला, छायाचित्रण, सांस्कृतिक आणि प्रादेशिक कला अशा अनेक कलांचे सादरीकरण होणार आहे.


                   पालकमंत्री श्री. केसरकर यांनी या महोत्सवाची पाहणी करुन आढावा घेतला आणि आवश्यक त्या सोयी सुवींधाकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना करुन कलाकांराचे अभिनंदन केले. तसेच कलाप्रेमींना या कार्यक्रमात सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत 3 हजार 600 रुग्णांना 28 कोटींपेक्षा अधिक मदत.

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत

3 हजार 600 रुग्णांना 28 कोटींपेक्षा अधिक मदत.

                   मुंबई, दि. 5 – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत 3 हजार 600 रुग्णांना 28 कोटींपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे.


                   जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत, ऑगस्ट - 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर - 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर - 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर - 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर -1013 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.


                    मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

                        

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक

 कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            रत्नागिरी, दि. 5:- कोकणात लोककलेची समृध्द परंपरा असून पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबध्दरित्या होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. तसेच कोकणातील लोककला वृद्धिंगत करण्यासाठी लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


                   चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर 5 ते 8 फेबुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक व खाद्य महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते.


                   कार्यक्रमस्थळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री शेखर निकम, प्रसाद लाड, योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


                   लोककला प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या लोककलावंतांच्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.


                   मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील गडकिल्ले, सागरी किनारे, निसर्गसंपन्न वातावरण कोकणचे वैभव आहे. दळवणवळण गतिमान होण्यासाठी मुंबई ते गोवा जुना महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे.


                   कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या मोबाईल वापराने कलेपासून दूर गेलेली तरूणाई लोककला महोत्सवामुळे निश्चितच याकडे वळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.  


    पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यासह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. तसेच रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे.


                   खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे.


       अशा महोत्सवांमुळे गोवा, केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्‍याच निसर्ग संपन्न, पंरपरा जपणाऱ्या आणि सांस्कृतिक संपन्नता असणाऱ्या कोकणाकडे वळविण्यास मदत होईल. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


        चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर, रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा 40 पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार असून सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे 30 पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवैय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.


 


00000

स्वर गंगा


 

𝔻𝕚𝕤𝕔𝕠𝕧𝕖𝕣𝕪 𝕠𝕗 𝔽𝕒𝕟𝕥𝕒𝕔𝕪* ✨

 ✨ *𝔻𝕚𝕤𝕔𝕠𝕧𝕖𝕣𝕪 𝕠𝕗 𝔽𝕒𝕟𝕥𝕒𝕔𝕪* ✨


💁🏻‍♀️..तू माझा Dp का नाय बघितला....😏😒


*💕डि.पी.*


*💕आज तिने डि.पी बदलला होता...👩🏻*

हजारावर कमेंट्स आणी शेकडयावर लाईक आले होते....

पण जे अपेक्षीत होतं *ते घडलं नव्हतं....*


*त्याची कमेंट अजून यायची बाकी होती...*

हा सगळा अट्टाहास *त्याच्यासाठीच तर ती करत असे..*


तिला माहित होत....

Dp बघितला असणार त्याने...

पण कमेंट देण्यासाठी थोड *अवघड वाटत असेल त्याला...*


 👦🏻 अरे व्वा आज ....सक्काळीच...

*भारीच आहे की हि..*

सकाळ एकदम प्रसन्न करून टाकली हिने...

*तिचा डि.पी. बघून मनोमन सुखावला तो....*

    सुंदर... कमेंट बॉक्समधे अक्षर टाइप झाली...

*send करताना क्षणभर थांबला तो....*

delete केली त्याने कमेंट....

थोडं वाट पहायला लावायचं का तिला ?...

*वाट पहाण्यात पण सुख असत...नाही का ?*

💕...आपण नाही का वाट पाहत तिच्या बदलणा-या डि.पी ची....

*नानाविवीध रुपे तिची मोहिनी घालतात आपल्याला.....*

आवडत आपल्याला तिला पहायला.....

*सणवार असले कि मग काय दिवाळी दसरा....*

साग्रसंगीत सजलेले *तिचे रुप पहाणे म्हणजे सोहळाच कि.....*

आणी मग दिवसभर एकच चाळा...

तिला पहाण्याचा....

प्रत्यक्षात तिला *पहाण्याचा योग* यायला हवा पण ...


*💕जो बात तुझमे है.. तेरी तसबिर मे नही....*

*...तसबिरमे नही...💕*


    *कसलं धडधडीत लिहितेस ग.....*

खर आहे का हे....

खरच का तुझं डि.पी. चेंज करणं *त्याच्यासाठी असतं..*


      *छे गं ...मी माझा डि.पी माझ्या सोयीने आणी मला आवडतो म्हणून बदलते....*


तेवढचं variation ना गं आयुष्यात....

*अजुन काही वर्ष...already मध्यावर आलय आयुष्य....*

मला स्वत ला आवडत ...

काहितरी चेंज...*आपणच आपल्याला बघुन सुखावायला काय हरकत आहे....*

मी शिकलेय स्वतःवर प्रेम करायला...

*स्वतः चं कौतुक करायला...जगणं सोप्प होत गं त्यामुळे....*


     असं मैत्रिणीच्या प्रश्नावर उत्तर देऊन *तिने स्वतः चं समाधान करून घेतलं ....*



💕 संजीवनी....*αяιєѕ0504*....


~coffee feasted~ copy pasted by....

*.....¢αρяι1409*


💖 💕

..| .🎼..

..|\('.') .. 🎼..

..|..!./-.🎸

..| < |...´¨) *Gd aftrnn*🌾

Fan traditional

 


Featured post

Lakshvedhi