सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 27 January 2023
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती" हा विषय चित्ररथाद्वारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने
नमस्कार
यंदाच्या वर्षी "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती" हा विषय चित्ररथाद्वारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सादर केला
यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखवण्यात आली होती
हा चित्ररथ अतिशय लक्षवेधी ठरला असल्याचे अनेक माध्यमातून दिसून येत आहे
*वोटिंग महत्वाचे*
महाराष्ट्र चित्ररथ ला 1 क्रमांक पसंती साठी आपल्या मोबाईल नंबर वरुन पसंती क्रम खालील प्रमाणे द्यावा
MYGOVPOLL 337011,12
पाठवण्याची नंबर
7738299899
यातील 12 वा क्रमांक महाराष्ट्रासाठी आहे
यंदा चित्ररथाची पुरस्कारासाठी निवड ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी वरील लिंक आपणास वापरता येईल
महाराष्ट्राच्या शक्तिमाता या निमित्ताने संपूर्ण जगभर गेलेल्या आहेत. आपणास विनंती आहे वरीलप्रमाणे आपली पहिली पसंती महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्यावी आणि महाराष्ट्राचा चित्ररथ देशात पहिला यावा यासाठी आपण योगदान द्यावे ही विनंती....
https://secure.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/
यंदा चित्ररथाची पुरस्कारासाठी निवड ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी वरील लिंक आपणास वापरता येईल
महाराष्ट्राच्या शक्तिमाता या निमित्ताने संपूर्ण जगभर गेलेल्या आहेत. आपणास विनंती आहे वरीलप्रमाणे आपली पहिली पसंती महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्यावी आणि महाराष्ट्राचा चित्ररथ देशात पहिला यावा यासाठी आपण योगदान द्यावे ही विनंती....
जय हिंद,प्रजासत्ताक
: रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे...इयत्ता ५ वी ते ७ वी तील विद्यार्थी
Mangaon Kadam: संकल्पना....श्री .सखाराम कदम
प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे 'जश्न-ए-हिंदुस्तान' मुशायरा कार्यक्रम संपन्न
प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे 'जश्न-ए-हिंदुस्तान' मुशायरा कार्यक्रम संपन्न
मुंबई, दि. 26 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे 'जश्न-ए-हिंदुस्तान' हा अकरावा अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रम संपन्न झाला.
राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, प्रधान सचिव विकास खारगे, अनुपकुमार यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.
सन 2013 पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
यावेळी मौलाना आझाद फायनान्शिअल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन, मुंबई यांच्या वतीने सर जे.जे. महानगर रक्तपेढीसाठी एक ॲम्बुलन्स भेट देण्यात आली. या ॲम्बुलन्सची चावी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमात कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत, डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी असे नामवंत शायर सहभागी होवून त्यांनी शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण केले. मुशायरा ऐकण्यासाठी रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतहर शकील यांनी सूत्रसंचालन केले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



