Friday, 27 January 2023

मनशक्ती

 विद्यानिकेतन निगडी शाळा 1चा विद्यार्थी *ओंकार लकडे*( इयत्ता सहावी) एका पायाने अपंग, पण सहलीसाठी रायगड या किल्ल्यावर गेला असता कोणत्यही प्रकारची मदत न घेता किल्ला पायी चढून व उतरुण पूर्ण केला आहे. *ओंकारच्या जिद्दीला सलाम🙏*

 कोणताही किल्ला /गड हा नेहमी मनाच्या शक्तिवर चढला जातो, शरीराच्या शक्तीवर नाही हेच ओंकार ने दाखवून दिले आहे💪🏻💪🏻🚩🚩


Thursday, 26 January 2023

आला महाराजा,

 


जय हिंद, प्रजासत्तक दिन





 सेंट मेरी स्कूल अलिबाग

जय हिंद

 


प्रजासत्ताक दिना निमित्त


 वसुंधरा सोसायटी

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

 प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण


            मुंबई, दि.26: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


            महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.


०००

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहन.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहन.

        नागपूर, दि.26 : येथील कस्तुरचंद पार्कवर आयोजित भारतीय प्रजासत्तादिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.


            श्री फडणवीस यांनी नागपूर पोलीस,होगगार्ड, छात्रसेना,स्काऊटगाईड आदी 17 पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या नेतृत्वात या सर्व पथकांनी मुख्यमंचासमोरून पथ संचलन केले. श्री फडणवीस यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली. अश्वदल, श्वानपथक आणि अग्नीशमनदलाचेही पथसंचलन झाले. जिल्हा क्रीडा परिषदेचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला. विद्यार्थ्यांनी या चित्ररथावर मल्लखांबासह योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केली.

Featured post

Lakshvedhi