Saturday, 21 January 2023

प्रभात

 














मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद

 मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद.

            मुंबई, दि. २० : सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे दि. २३ व २४ जानेवारी, २०२३ या कालावधीत रॉयल हॉल, नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे आयोजन करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले.


             ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेच्या आयोजनाबाबत मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, साप्रविचे सह सचिव सोमनाथ बागूल, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती/प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके यांची उपस्थिती होती.


            श्रीमती सौनिक म्हणाल्या की, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन दि.२३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे या परिषदेला संबोधित करणार आहेत.


            केंद्र सरकार व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. देशातून ३० राज्यांमधील अधिकारी सहभागी होणार आहेत. या परिषदेत प्रशासकीय सुधारणा, ई-गव्हर्नन्स,गुड गव्हर्नन्स इत्यादी विषयांवर चर्चा विनिमय होणार आहे. देशातील त्या त्या विषयातील तज्ञ वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे श्रीमती सौनिक यांनी सांगितले.


            या परिषदेत स्टार्टअप आणि गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स पुरस्कार प्राप्त उपक्रम, महाराष्ट्र राज्य सरकारचे सर्वोत्तम पध्दती, डिजिटल संस्था आणि डिजिटल सचिवालय,ई गव्हर्नन्स मधील स्टार्टअप, ई सेवा राज्यामध्ये वितरण अशा विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीमती सौनिक यांनी यावेळी सांगितले.


000000

अंधेरीतील ईएसआय दवाखान्याचे नूतनीकरण सहा महिन्यात पूर्ण करावे

 अंधेरीतील ईएसआय दवाखान्याचे नूतनीकरण सहा महिन्यात पूर्ण करावे

- केंद्रीय सचिव आरती आहुजा.

            मुंबई, दि. २० : राज्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआय) कामगारांसाठी दवाखाने आहेत. त्यात १२ राज्य कामगार दवाखाने तर ६५ ठिकाणी राज्य कामगार विमा सेवा योजनाद्वारे कामगारांना आरोग्य सेवा दिली जाते. मुंबईतील अंधेरी येथे ५०० खाटांच्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे २२० खाटांचे काम सुरु आहे. उर्वरित खाटांचे काम अग्निशामक विभागाच्या परवानगीने सहा महिन्यात नूतनीकरण पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.


            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ईएसआयसी योजनेंतर्गत आरोग्य सेवा आणि योजनांच्या आढावा बैठकीत श्रीमती आहुजा बोलत होत्या. यावेळी ईएसआयसीचे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार, राज्याचे आरोग्य आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह विमा योजनेचे आयुक्त उपस्थित होते.


            श्रीमती आहुजा यांनी राज्यातील विमा दवाखान्यांचा आढावा घेतला. राज्यात ३९ लाख ९० हजार ४९० कामगार विमा योजनेच्या माध्यमातून दवाखान्याचा लाभ घेत आहेत. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता अंधेरी पूर्व येथील विमा दवाखान्यात खाटांची संख्या वाढविली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक विभागाची परवानगी घेवून काम सुरू करावे. एकही कामगार विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. राज्यातील गडचिरोली, वाशिम, रत्नागिरी येथे दवाखान्यांना परवानगी मिळाली आहे. त्याची पुढील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. नंदुरबार आणि हिंगोली येथील सर्वेक्षण पूर्ण करून माहिती संकलित करावी. यावरही त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.


            कोल्हापूर येथे १०० बेडपैकी ३० बेड सुरू आहेत तर बिबवेवाडी (पुणे) येथे १०० बेड पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. प्रत्येक दवाखाना परिसरात अग्निप्रतिबंधक सुरक्षा, परीक्षण यावर भर द्यावा. ज्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी असेल तिथे राज्य शासनातील निवृत्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्याच्या सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.



मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

 प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी

मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

          मुंबई, दि. २० : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.


          या कार्यक्रमात नामवंत शायर सहभागी होणार असून वसीम बरेलवी, कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत. डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी हे शायर या कार्यक्रमात मुशायऱ्याचे सादरीकरण करणार आहेत. अतहर शकील हे सुत्रसंचालन करणार आहेत.  


          विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत या कार्यक्रमास निमंत्रित आहेत. सन २०१३ पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या मुशायरा कार्यक्रमांमध्ये देशभरातील नामवंत शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण करतात.

शासकीय कार्यालय मध्ये विविध भरती

 शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध


एकाच अर्जाद्वारे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार


- अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर


               मुंबई, दि. २० : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.


            राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वित्त, गृह, महसूल व वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.


            या पद भरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पद भरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अशासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध

एकाच अर्जाद्वारे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार

- अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर

               मुंबईदि. २०  : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आजमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहेअसे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

            राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागमहाराष्ट्र लोकसेवा आयोगवित्तगृहमहसूल व वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.

            या पद भरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.  पद भरतीचा तपशीलअर्हतावयोमर्यादाअर्ज करण्याची पद्धतपरीक्षा योजनाअभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.

'याविभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती

 सामान्य प्रशासन विभाग - सहायक कक्ष अधिकारी - ७० पदे

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी - ८ पदे

 वित्त विभाग - राज्य कर निरीक्षक - १५९ पदे

 गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक - ३७४ पदे

 महसूल व वन विभाग - दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे

 गृह विभाग- दुय्यम निरीक्षकराज्य उत्पादन शुल्क – ६ पदे

 वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद

 वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे

 मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे

000000 आभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.


'या' विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती


● सामान्य प्रशासन विभाग - सहायक कक्ष अधिकारी - ७० पदे


● महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी - ८ पदे


● वित्त विभाग - राज्य कर निरीक्षक - १५९ पदे


● गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक - ३७४ पदे


● महसूल व वन विभाग - दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे


● गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे


● वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद


● वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे


● मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे


000000

महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठीतातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी

 महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठीतातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्रीय पर्यावरण, वने, कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून आढावा

पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, अभयारण्यांतर्गत गावे, सीआर झेड २ अंतर्गतएसआरए प्रकल्प याविषयी महत्वपूर्ण चर्चा


            मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.


            केंद्रीय मंत्र्यासमवेत झालेल्या या बैठकीत वन, कामगार, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य विकास या विभागाशी संबंधीत विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कालबद्ध पद्धतीने त्यावर मार्ग काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            पश्चिम घाट, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र याबाबत प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याबाबत श्री. रेड्डी यांनी सादरीकरण केले. राज्य शासन विभाग आणि केंद्रीय वन विभागाच्या तज्ञ समिती सोबत बैठक घेऊन प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य अंतर्गत असलेली गावे पुनर्वसित करताना देण्यात येणारी मदत वाढविण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्य हानी, पिकांची हानी यासंदर्भात केंद्र शासनाकडून मदत देण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.


            केंद्रीय कामगार विभागामार्फत महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण येथे ११०० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार असून त्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत तसेच काही ठिकाणी उच्चदाब वीज वाहिनी दूर करण्याबाबत चर्चा झाली. या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            मुलुंड येथे वैद्यकीय महाविद्यालय, तर ठाणे येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय कामगार मंत्री श्री. यादव यांनी यावेळी सांगितले. ठाणे येथील रुग्णालयाचे बळकटीकरण करतानाच तेथे कार्डधारक आणि विना कार्डधारक रुग्णांना सेवा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केली त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            सीआरझेड २ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि मोडकळीस आलेल्या आणि उपकर प्राप्त इमारतींची पुनर्बांधणी करताना विशेष सवलत देण्याबाबत यावी चर्चा करण्यात आली. कांदळवनाच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्रात कांदवळवन कक्ष आणि फाऊंडेशन असून कांदळवनाच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्राचे कौतुक यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केले. माथाडी मंडळ अंतर्गत माथाडी कामगारांच्या कामगार भविष्य निर्वाह निधी भरण्यासंदर्भात येणाऱ्या समस्येबाबत चर्चा यावेळी झाली. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


००००



मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन स्तुत्य उपक्रम

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन स्तुत्य उपक्रम

                             - निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे

महाराष्ट्र सदनात पुढील दोन दिवस ग्रंथ विक्री प्रदर्शन.

            नवी दिल्ली, २० : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन ग्रंथ विक्री प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केले.


            कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे पुस्तक विक्री प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी निवासी आयुक्त डॉ. पांडे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, मराठी भाषेचा राजधानीत प्रचार व प्रसार व्हावा, तसेच या भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राजधानीत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.


            महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अतंर्गत महाराष्ट्र सदन येथे ग्रंथ विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, परिचय केंद्राच्या प्रभारी उप‍संचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आणि सदनातील अभ्यागत याप्रसंगी उपस्थित होते.


            या ग्रंथ प्रदर्शनात पॉप्युलर प्रकाशन, संस्कृती प्रकाशन आणि रसिक प्रकाशनाची दालने आहेत. साहित्य, संस्कृती, अर्थविषयक, राजकीय, ऐतिहासिक, वैचारिक अशा विविध विषयांवर आधारित सुप्रसिद्ध लेखकांसह, नवोदित लेखकांची पुस्तके मांडण्यात आली आहेत. पुढील दोन दिवस सकाळी १० ते सांयकाळी ७ पर्यंत हे ग्रंथ विक्री प्रदर्शन राहणार आहे. राजधानीतील मराठी लोकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्राकडून करण्यात येत आहे.


            याठिकाणी परिचय केंद्राच्या वतीने ‘लोकराज्य’ मासिकाचे दालनही मांडण्यात आले आहे. राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती या माध्यमातून राजधानीतील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.


            मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज महाराष्ट्रातील कवी त्यांच्या स्वरचित रचनेचे काव्य वाचन करतात. महाराष्ट्र सदन येथे दर्शनीय ठिकाणी मराठीमध्ये़ सुविचार लिहीले जात आहे. यासह उर्वरित दिवसांमध्ये लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, वर्क्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत. 


              मराठी भाषा विभागाच्या शासन निणर्यानुसार दिनांक १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे आयोजन राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये करण्यात येते.


००००

Featured post

Lakshvedhi