*लाइटिंग से जगतपिता के स्वरूपो के मनमोहक दर्शनों का अद्भुत दृश्य*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 17 January 2023
दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची
अंमलबजावणी करणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली, 17 : नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात दिल्लीतील विविध मराठी संस्थांशी सोमवारी संवाद साधताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, यांच्यासह विविध मराठी संस्थेचे पदाधिकारी, केंद्र सरकारच्या विविध विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले मराठी अधिकारी, यासह सदनाचे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या ऐतिहासिक खाणाखुणा आजही महाराष्ट्राबाहेर दिसतात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती, लोककलेची समृद्ध अशी परंपरा आहे. दिल्लीतील मराठी अधिकारी, येथे वास्तव्यास असलेले मराठी नागरिक हे समृद्ध परंपरा वाढवित आहेत. त्यांचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. राजधानी दिल्लीत असणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.
राजधानीत केंद्र सरकारच्या विविध आयोगात, विभागात महाराष्ट्र केडरचे तसेच इतर केडरचे मूळ महाराष्ट्रातील अनेक अधिकारी आहेत. यासह मूळ महाराष्ट्रातील मात्र, व्यवसाय- खासगी नोकरी निमित्त आलेले मराठी लोक दिल्लीतील विविध भागात अनेक वर्षांपासून राहतात. त्यांनी येथे विविध संस्था उभारून महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जोपासली आहे. यासोबतच विविध स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या तरूण मुला-मुलींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या संस्था मदत करतात.
या संस्थांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यातील काही महत्वाच्या सूचना ज्या आपल्या विभागाशी संबंधित असतील त्यांची त्वरेने अंमलबजावणी केली जाईल, तर उर्वरित सूचनांवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
Miss you... ना...!☺
Miss you... ना...!☺
वयानुसार आपण काय काय ..
गोष्टी सोडल्या..
*आपण गाभुळलेली चिंच ..*
*अनेक वर्षात खाल्लेली नाही*
*जत्रेत मिळणारी ..*
*पत्र्याची शिट्टी ..*
*वाजवलेली नाही.*
*चटक्यांच्या बिया घासून ..*
*चटके द्यावेत ..*
*असं आता वाटत नाही*
*सर्कसमधला जोकर आपलं ...*
*मन आता रिझवू शकत नाही.*
*तसंच कापसाची म्हातारी ..*
*पकडण्याचा चार्मही ..*
*राहिलेला नाही..*
*कारण ..*
:
*कापसाच्या म्हातारीने ..*
*उडता उडता आपला ..*
*बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..*
*ते आपल्याला कळलंच नाही.*
*आता त्या सहली नाहीत...*
*दोन दोन मुलांच्या ..*
*जोड्या करून ..*
*चालणं नाही..*
*विटी दांडू नाही...*
*गोट्या*लगोरी*
*साबणाचे फुगे नाहीत..*
*प्रवासात बोगदा आला तर ..*
*एक अनामिक हुरहूर नाही..*
*त्या उडणाऱ्या म्हातारीने ..*
*हे सगळे आनंद नेले...*
*त्याच्या बदली ..*
*तिचं वार्धक्य तिने ..*
*आपल्याला दिलं...*
*म्हणूनच ती अजून उडू शकते...*
*आणि आपण जमिनीवरच आहोत.*
*लाटेने की काळाने ...*
*नेला तो मातीचा किल्ला?*
*भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…*
*हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,*
*इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….*
*गेले कुठे ते चालताना ..*
*“पॅकपॅक” आवाज करणारे ..*
*पायातले बूट?*
*"मी नाही देणार जा माझं चॉकलेट”*
*म्हणत आवळलेली ती ..*
*घट्ट मूठ….*
*किती जिव्हाळा होता ..*
*डोकं टेकवलेल्या ..*
*आईच्या हाताच्या उशीत?*
:
*ब्लँकेटहून जास्त ..*
*ऊब होती त्या ..*
*मायेच्या कुशीत…*
*हरवला तो प्रेमाचा घास….*
*“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…*
*घरात न सांगता ..*
*लपवून लपवून ..*
*खाऊ खायचा तो ..*
*प्लॅन ठरवलेला?*
*गेले कुठे जत्रेतले ते ..*
*गोड गोड म्हातारीचे केस?*
*छोट्याशा बुटांची ..*
*आईने बांधलेली ती ..*
*सुटलेली लेस….*
*गेली कुठे ती ..*
*मामाच्या गावी जाणारी ..*
*झुकझुक गाडी?*
*शाळेत बडबडगीते गाताना ..*
*एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?*
*झोपताना पाहिलेला तो ..*
*चांदोमामा कुठे हरवला?*
*अ आ इ ई ..*
*पाटीवर लिहिणारा तो ..*
*खडू कुणी पळवला?*
*कशाला आलं हे ...*
*आपल्याला शहाणपण????*
*हरवलं त्यात ते सुंदर बालपण..*
*खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?*
*आयुष्यातील काही ...*
*अनमोल क्षणांची आठवण ...*
*ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते...*
*पण बालपणीच्या काही ..*
*आठवणी,*
*मनाच्या कोपऱ्यात ..*
*अजूनही दाटलेल्या असतात,*
*त्यांना हलकेच गोंजारलं असता ..*
*त्यांची सय अधिकच गडद होते...*
*आपलं मनही किती विचित्र असतं ना...*
*जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं...*
*शाळा सोडून बाबांसारखं ...कामावर जावंसं वाटतं...*
*मात्र आता मोठं झाल्यावर ...*
*पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..*
*आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..*
*आय मिस माय चाइल्डहूड यार*
*कोई लौटा दे मुझे...*
*बीते हुए दिन..*
*चला मन थोडे हलके झाले ..*
चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे
चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे
- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार.
नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. त्यातही विदर्भात हे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांच्या अध्यक्षतेखाली सागर परिक्रमा योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देवून वरील मागणी केली.
विदर्भात तळी, मालगुजरी तळी, शेत तळी आदी असे एकूण 30,650 तळी आहेत. यात 1, लाख 87 हजार 249 हेक्टर पाण्याचे क्षेत्र आहे. यातील 50 टक्के तळ्यात मासेमारी केली जाते.
चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण सीमेला वैनगंगा आहे, तर पश्चिम सीमेला वर्धा नदी आहे. याठिकाणी 5,547 जल समिती (वॉटर बॉडीज) असून 25,429 हेक्टर पाणी क्षेत्र आहे. यामधील 29 टक्के तळी मत्स्यव्यवसायासाठी वापरले जातात तर 20 टक्के तळी हे शेत तळे आहेत.
देशातील इतर भागात ज्याप्रमाणे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारली आहेत, त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्येही संशोधन केंद्र उभारण्यात यावे. यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा जलदगतीने विकास होऊ शकेल. मत्स्य बीजपुरवठा, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती ही प्रशिक्षणाद्वारे देऊन कौशल्य विकास करता येईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मत्स्यव्यवसाय पूरकव्यवसाय म्हणून अधिक उपयोगी ठरत आहे. विदर्भात मत्स्यबीज समूह केंद्राला (फिश सीड क्लस्टर) संधी आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या समन्वयाने चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.
००००
G20
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट.
पुणे, दि. १७ : जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.
विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी बैठकीसाठी चांगली तयारी केल्याबद्दल यावेळी प्रशासनाचे कौतुक केले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुणे शहर आणि राज्याची क्षमता जगासमोर प्रदर्शित होत असल्याबद्दल श्री.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी दालनाला भेट द्यायला आलेल्या प्रतिनिधींशीदेखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. राज्यातील पारंपरिक तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्वाविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.
परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या उत्पादनात रुची
बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या उत्पादनांमध्ये विशेष रुची दाखवली. भरडधान्याच्या पदार्थांची चव आवडल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. विशेषत: हिमरू शाली, पैठणी, हाताने तयार केलेल्या कागदपासून तयार केलेल्या भेटवस्तू आदींमध्ये प्रतिनिधींनी विशेष रुची दाखवली. शहरातील प्रकल्प आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहितीदेखील यावेळी पाहुण्यांना देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संचलित हात कागद संस्था पुणे यांनी हात कागदापासून बनवलेल्या दैनंदिनी, संस्मरणीय भेटवस्तू, आकर्षक कागदी दिवे, घरच्या घरी हात कागद बनवण्यासाठी नव्यानेच सादर केलेले नावीन्यपूर्ण किट, ज्यूटचे फाईल फोल्डर, ड्रॉइंग ब्लॉक्स आदी विविध वस्तू प्रदर्शित केल्या. त्यात विदेशी पाहुण्यांनी विशेष रस दाखवला.
वन विभागामार्फत बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत पर्यावरणीय सभ्यता विकास संस्थेने बांबूनिर्मित हाताने बनवलेल्या वस्तू, शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, पारंपरिक गरजेच्या वस्तू, कार्यालयात ठेवण्याच्या वस्तू, फर्निचर आदी सुरेख वस्तू पाहताना त्यातील कलाकुसरीबद्दल त्यांनी कौतुकद्गार काढले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पर्यटन स्थळांची आणि पर्यटन सुविधा विशेषतः पुणे, कोकण, रत्नागिरी, रायगड मधील पर्यटन स्थळांची माहिती आणि महाराष्ट्र टुरिझम मॅपचे माहितीपत्रक देण्यात येत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा स्टॉल येथे महामंडळाने उद्योग विकासासाठी निर्माण केलेल्या सुविधांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले जात होते.
भारतीय आदिवासी सहकारी विपणन संस्थेच्या दालनामध्ये आदिवासी करागिरांमर्फत निर्मित हिमाचल प्रदेशातील पश्मिना शॉल, याकुल शॉल, आसामचे मुगा सिल्क, लाकूड व नैसर्गिक उत्पादनापासून निर्मित सौंदर्य आभूषणे, वारली पेंटिंग, गोंड पेंटिंग, टसर रेशीम पासून बनवलेल्या साड्या, वूलन जॅकेट, खादी, लिनेन कुर्ता, धातू वरील नक्षीकाम, ज्यूटच्या वस्तू, बांबू उत्पादने तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत युनिव्हर्सल ट्राईब संस्थेने वारली पेंटिंग, वारली कलाकुसर यातून होणारे भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन पाहुण्यांना भावले.
महिला बचत गटांच्या उत्पादने, हस्त निर्मित साबण, बांबूच्या ज्वेलरी याशिवाय ज्वारी, बाजरी, नाचणी निर्मित खाद्य पदार्थांनी परदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. हे पदार्थ आरोग्यास पोषक असल्यामुळे त्यांना जगभरात मागणी वाढत असून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
अनुभवले भविष्यातील सुंदर नदीकिनारे
पुणे महानगरपालिकेने मुळा, मुठा नदी सुधार प्रकल्प, जायका अर्थसहाय्यित प्रकल्पाची व्हर्चुअल रियालिटी हेड सेटच्या माध्यमातून आभासी सादरीकरण केले. हा हेडसेट परिधान करून प्रत्यक्ष भविष्यातील सुशोभित नदी किनाऱ्यावर संचार करण्याचा अनुभव घेता येत होता. ही माहितीही प्रतिनिधींनी जाणून घेतली.
००००
दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार
दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार
जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा.
दावोस, १७ :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.
अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्यूशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार), ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजुरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टिम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प (रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरिंग व बडवे इंजिनियरिंगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ऑटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा
जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत, त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.
------०------
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...