Monday, 16 January 2023

Sunday, 15 January 2023

तिलाची बनवलेली घ्य..❤️

 पौषातील थंडीस पुरून उरण्याची ताकद पौष्टिक तीळ पासून बनवलेली घ्या .

सूर्याचे धनु राशीतून मकर राशीतील प्रवेशाचे संक्रमण निसर्गशिक्षणाने लाभदायक ठरो.

थंडी पासून रक्षण करा

 नैसर्गिक सवय सबंध जनांस जडो यासाठी हा सण


.. तुमच्या सह तुमच्या परिवारास मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा..❤️


तिलाची घ्या  njoy kara


..❤️

व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश

 व्हॉट्सअ‍ॅपट्विटरफेसबुकईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश.

एकत्रित प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

 

            पुणे दि. १४: प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅपट्विटरफेसबुकईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  करण्यात आले.

            राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असूनयातील सुमारे २.५० लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज १९ हजारावर कॉल्स स्वीकारले जाताततर २८०० तक्रारींचा निपटारा केला जातो. आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टलएसओएसफेसबुकई-मेलसिटिझन मोबाईल अ‍ॅपट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे.

            सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितापर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे. ११२ महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स असूनअन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपली तक्रार नोंदवू शकताततातडीची मदत पोलिसांना मागू शकतात. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची भर पडलेली आहे.

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवूनटाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात

 राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवूनटाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात.

            मुंबई दि 15 : 'टाटा मुंबई मॅरेथॉन 2023' शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

            टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत 'टाटा मुंबई मॅरेथॉन 2023' चे आयोजन करण्यात आले. यावर्षी 'हर दिल मुंबई' हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेत सुमारे 55 हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. इलाईट गटातील स्पर्धांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ड्रीम रन' ला सुरूवात झाली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुंबईकरांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.

            स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार झीशान सिद्धीकी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा कन्सल्टन्सीचे उज्वल माथुर, अनिल सिंह, विवेक सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            या मॅरेथॉन मध्ये इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल मेन, इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल वुमन, इलाईट ॲथेलिट इंडियन मेन, इलाईट ॲथेलिट इंडियन वुमन यासह पुर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. ड्रीम रन, सिनियन सिटीझन रन, चॅम्पीयन विथ डिसॲबिलीटी रन या प्रकारांचा समावेश करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

0 0 0



मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल ”

 शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,

शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला,

शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि

शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि

शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,

शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि

शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी…

“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि

जो मन जिंकेल तो जग जिंकेल ”


तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

*मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा*

Saturday, 14 January 2023

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक

 जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक

             -उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा फलदायी

            स्टुटगार्टः दि. १४ : राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी सष्ट करण्यात आले.


            जर्मनी दौऱ्यात श्री. सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी श्री. सामंत यांचे स्वागत केले. बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशीन्स आणि फोल्डिंग मशीन्सचे सादरिकरण केले. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या (EV) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशिन्स वापरल्या जात आहेत. या मशिन्ससाठी ट्रम्फ कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. यासाठी श्री. सामंत यांनी कंपनीला महाराष्ट्र भेटीचे निमंत्रिण दिले असून त्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळपाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनी सुमारे तीनशे कोटी रुपये गुंतवणूक करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लॅप केबल्स समुहाला भेट


         उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप काबेल समूहाला भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरिकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातुसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले.


            याचदरम्यान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि बार्डन वुर्टेमबर्ग यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अँड्रियास लॅप (बार्डन वुर्टेमबर्गचे भारताचे वाणिज्यदूत), थॉमस फुरमन ( स्टुटगार्ट शहराचे उपमहापौर), जोहान्स जंग (आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे विभाग प्रमुख), सिमोन गोहरिंग( सल्लागार. बार्डन वुर्टेमबर्ग राज्य मंत्रालय), थॉमस मॅथ्यू (मर्सिडीज बेंझ), बर्नहार्ड ग्रीब (स्टुटगार्ट शहराच्या आर्थिक विकासाचे प्रमुख), खैलाश भट्ट (जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूत), ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर, गेरहार्ड कुबलर( फ्रिट्झ कुब्लरच्या व्यवस्थापकीय संचालक) बार्बरा एफेनबर्गर (स्टटगार्टच्या कॉमर्स आणि इंडस्ट्री चेंबर) आणि जोएल मिटनाच्ट( भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रमुख) आदी उपस्थित होते.



FREE 15 Days Yoga Challenge*

 🧘🏻‍♀️ *FREE 15 Days Yoga Challenge* 

🔥 Burn Fat

😇 Be Calm

🙆🏻‍♀️ Become Flexible


*3.5 Lakh+ people have joined*


with *Saurabh Bothra* 👨🏼‍🏫

Govt Certified Yoga Teacher

IIT Grad | TEDx Speaker

10+ Years of Teaching


🗓️ Date: *16th - 22nd January*


Lets become Better Together🤝


*Click on the link below to know Batch timings & to get FREE access* 👇🏻 

https://habit.yoga/u/Smita_2996

Featured post

Lakshvedhi