Tuesday, 15 November 2022

बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती राज्यभर वाढविणार

 बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती राज्यभर वाढविणार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 14 : सध्या मुंबईत होत असलेल्या बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती येत्या वर्षापासून राज्यभरात वाढविण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली.


            मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबईच्या वतीने आयोजित विविध सहशालेय स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, बालभवनचे संचालक आर. एस. नाईकवाडी, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यामुळेच मुंबईतील बालभवनला त्यांचे नाव दिले गेले. यापुढे बालभवनचे उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येतील. मुंबईतील बालभवन इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने विविध उपक्रमांसाठी संस्थेला जोगेश्वरी येथील शिक्षण विभागाची जागा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.


व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांतही सहभाग घ्यावा


            विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांमध्येही सक्रीय सहभाग घ्यावा, यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.


            विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने एचसीएल आणि टीआयएसएस या संस्थांसोबत करार केले असून आरोग्य चांगले राहण्यासाठी आजच ‘इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रीक’ सोबत करार करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


            सचिव श्री. देओल यांनी तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देताना विद्यार्थ्यांनी त्यापासून होणारे लाभ स्वीकारावेत, असे सांगितले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळ आणि विविध स्पर्धांमध्येही सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी बालभवनने अधिकाधिक उपक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली.


            प्रास्ताविकात बालभवनचे संचालक श्री.नाईकवाडी यांनी बालभवनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Suprabhat

 



उत्तराखंड व महाराष्ट्र येथील उद्योग संघटनांमध्ये उद्योग वाढीसाठी करार

 उत्तराखंड व महाराष्ट्र येथील उद्योग संघटनांमध्ये उद्योग वाढीसाठी करार.

राज्यपाल कोश्यारी व उत्तराखंडच्या उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या.

महाराष्ट्र चेंबर व सिडकुल उत्पादक संस्था उत्तराखंड यांच्यात कराराचे आदानप्रदान.

            मुंबई, दि. 14 : उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर तसेच उत्तराखंड येथील सिडकुल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.


            यावेळी उत्तराखंडचे उद्योगमंत्री चंदन राम दास, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व सिडकुल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.


            उत्तराखंड येथे माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, नैसर्गिक उत्पादने या क्षेत्रात फार मोठा वाव आहे. धार्मिक पर्यटनाशिवाय उत्तराखंड येथे साहसी पर्यटनासाठी महाराष्ट्रातून अनेक पर्यटक जातात. महाराष्ट्रातील उद्योजकांनी अधिक यशस्वी व्हावे व उत्तराखंडलादेखील औद्योगिकदृष्ट्या पुढे येण्यास सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.


            सामंजस्य करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उत्तराखंडचे मंत्री चंदनराम दास म्हणाले की, उत्तराखंड राज्याने उद्योग व्यापारासाठी एक खिडकी योजना लागू केली असून उद्योग वाढीसाठी लँड बँक तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उद्योगांनी उत्तराखंडच्या पहाडी भागात उद्योग सुरु केले तर तेथील लोकांचे स्थलांतर कमी होवून त्यांना रोजगार मिळेल असे त्यांनी सांगितले.


            उत्तराखंड येथे पर्यटन, वेलनेस, प्राकृतिक उत्पादने, औषधी निर्माण, आदरातिथ्य या क्षेत्रात विशेष संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.


            महाराष्ट्र चेंबर लवकरच उत्तराखंड येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करेल. तसेच चेंबरतर्फे आयोजित मुंबई येथील व्यापार प्रदर्शनाला उत्तराखंड येथील उद्योगांना निमंत्रित करेल, असे चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.


            महाराष्ट्र चेंबर ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, राज अरोरा, शैलेश अजमेरा, चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष संगीता पाटील, टॉम थॉमस, खुबीलाल राठोड, अविक्षित रमण आदी उपस्थित होते.


००००


 

वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी

 वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी

नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 14 : ​सन-2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम 2017 पारित केले आहेत. यानियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केला असून वैद्यकीय उपकरणांची “अ”, “ब”, “क” “ड” अशी वर्गवारी केली आहे. “अ” आणि “ब” याप्रवर्गातील उपकारणांच्या उत्पादनावर राज्याचे नियंत्रण आहे तसेच “क” आणि “ड” वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनावर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे. 


      ​वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या सुगम पोर्टल या संगणक प्रणालीद्वारे “अ” आणि “ब” याप्रवर्गातील उपकरणांच्या उत्पादकांना राज्याद्वारे परवाने मंजूर करण्यात येत आहेत.


      ​सर्व वैद्यकीय उपकरणांच्या विक्रीसाठी औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमानुसार परवाने मंजूर करण्याची तरतूद आहे व त्यानुसार राज्यातील परवाना प्राधिकारी यापूर्वी पासून परवाने मंजूर करीत आहेत.


      ​केंद्र शासनाच्या दि. 30 सप्टेंबर 2022 च्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीसाठी परवान्या ऐवजी नोंदणी प्रमाणपत्र घेऊ शकण्याची तरतूद अंर्तभूत करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यांचे औषध नियंत्रक यांना परवाना नोंदणी प्रमाणपत्र मंजुरीसाठी परवाना प्राधिकारी नेमण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. यानुसार नोंदणी प्रमाणपत्र मंजुरी प्राधिकारी निश्चित करून, नोंदणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच पूर्ण करून, नोंदणी प्रमाणपत्रे लवकरात लवकर निर्गमित करण्यात येतील.


      ​वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणारे अर्जदार हे विहीत नमुन्यांत आवश्यक शुल्कासह ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करू शकतात, असे आवाहन सहआयुक्त (औषधे), मुख्यालय तथा नियंत्रण प्राधिकारी अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


००००



देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला

 देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार

पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांच प्रकाशन

 

            मुंबई, दि. 14 : भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सल राष्ट्रीय उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान मोठे आहे. आत्मनिर्भर भारताच्या मजबूत पायाभरणीसाठी आणि  देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन  संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

            मुंबई विद्यापीठ येथे तंत्रशिक्षण संचालनालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी निर्मित केलेल्या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांचा वितरण सोहळा संपन्न झाला.

            केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करण्यात आले.

            या कार्यक्रमास आमदार आशिष शेलारउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमारनॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन नवी दिल्ली अध्यक्ष प्रा. के. के. अग्रवाल, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदनवी दिल्ली उपाध्यक्ष प्रा. एम. पी. पुनीया, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघमहाराष्ट्रातील प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री.पाटील म्हणालेनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्राने पावले उचलली आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण असावे यावर लक्ष केंद्रित करून बहुभाषिकता आणि मातृभाषेची ताकद नवीन शिक्षण धोरणामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. नवीन शिक्षण धोरणामध्ये भाषांमध्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थांनी प्रादेशिक भाषेत शिकविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी धोरण विकसित करणे आवश्यक असल्याचे नमद केले आहे. तंत्र शिक्षण मातृभाषेतून मिळाले तर विद्यार्थ्यांना विषय लवकर समजेलनवीन कल्पकता सुचेल आणि ते संशोधनाकडे वाटचाल करतील. पेटंट मिळवतील आणि मातृभाषेतील ज्ञानामुळे आत्मविश्वास सुद्धा वाढण्यास मदत होईल.

            देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषेमध्येही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता यावे यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदनवी दिल्ली (एआयसीटीई) यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे. प्रादेशिक भाषेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईने मान्यतेची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२१- २२ पासून सुरु केलेली आहे. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे बारा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा एआयसीटीईने स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे.  मराठी भाषेमधील प्रथम वर्षाची अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची ०९ व पदविका अभ्यासक्रमांची ११ अशा एकूण २० पुस्तकांची निर्मिती एआयसीटीईकडून करण्यात आलेली आहेअसेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार

            उच्च व तंत्र शिक्षण व्यवस्थेमधील आव्हाने आणि बदल याचा अभ्यास करून  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. शिक्षण सर्वकष बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला समृद्ध आणि सुसंस्कृत वारसा लाभलेले अग्रेसर राज्य आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे मराठी भाषेत पुस्तक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी नक्कीच मदत होईल. विषय लवकर समजेल म्हणून  तंत्र शिक्षण आणि मेडिकल शिक्षण मातृभाषामध्ये देण्याचे प्रयत्न आहे त्यामुळे शिक्षणाच्या समतोला बरोबरच एकरेषीय बल प्रणाली तयार होईल.

0000

जिवन ऐसे नाव







 

बार बार देखो,ये देखनिकी चीज है

 


Featured post

Lakshvedhi