Thursday, 20 October 2022

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी

 अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणी दिवशीमुंबई उपनगरात मद्य विक्री नाही

 

            मुंबई उपनगरदि. २० : मुंबई उपनगरातील १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया तर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया खुल्यामुक्त व निर्भय वातावरणात पार पडाव्यायासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मतदानाच्या ४८ तासापूर्वी ते मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

            पूर्वेस मिठी नदी -१६८ चांदिवली पासून दक्षिणेस सहर रोडबाप नाला - १६७विलेपार्लेपर्यंत तसेच पश्चिमेच्या पश्चिम रेल्वे ट्रॅक -१६८ अंधेरी पश्चिम पासून उत्तरेस जत्वार नगर रोड नंबर ५जे.व्ही.एल.आर. रोड -१५८ या परिसरातील सर्व मद्य परवाने बंद असतील. हा बंद कालावधी मतदानाच्या ४८ तासांपूर्वी म्हणजेच दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा मतदान संपेपर्यंत असेल. त्याच प्रमाणेमतमोजणीच्या दिवशी म्हणजे दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण दिवस मद्यविक्री बंद असेल.

            सबब दिनांक १ नोव्हेंबर (सायंकाळी ६ पासून)२ नोव्हेंबर३ नोव्हेंबर (मतदान संपेपर्यंत) आणि ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मुंबई उपनगरातील नमूद परिक्षेत्रात मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून फौजदारी कारवाई केली जाईलअसे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.

000

पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे

 पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम युद्धपातळीवर करा

- रविंद्र चव्हाण.

            मुंबई, दि. 20 : पालघरच्या जिल्हा क्रीडा संकूल समितीची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत युद्धपातळीवर करण्यात यावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.


            पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलसंदर्भात स्थापन केलेल्या समितीची बैठक आज श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, महापालिका आयुक्त अनिल कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.जी.पालवे, पालघरचे जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, क्रीडा विभागाचे प्रभारी उपसंचालक स्नेहल साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, पालघरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, प्र.जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.


            पालघरमध्ये 16 एकरच्या प्रशस्त भूखंडावर जिल्हा क्रीडा संकूल प्रस्तावित करण्यात आले आहे. या संकूलाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर झालेला असून दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. संकूल उभारणीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया आठवड्याभरात सुरु करुन पुढील कार्यवाही तातडीने करण्याची सूचना श्री. चव्हाण यांनी दिली.


            श्री. चव्हाण यांनी प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांचा आढावा घेतला. या क्रीडा सुविधांमध्ये 400 मीटरचा ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, विविध खेळांची क्रीडांगणे, फीटनेस सेंटर, जलतरण तलाव, इनडोअर मॉल, मुलामुलींचे वसतिगृह, खेळाचे साहित्य आदी विविध बाबींचा समावेश आहे.

            प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने परिपूर्ण होतील व हे काम उत्कृष्टरित्या पार पडेल याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत संकुलाच्या उभारणीच्या कामात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग व त्यांच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.


****


संध्या गरवारे/विसंअ/

बेस्ट waishes


 

नारी तुझ्या कला लय भारी

 


किती वेळा सांगू, ठीक आग्रह आहे tar


 

लम्पीबाधित जनावर

 बहुतांश जिल्ह्यांत लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट

- सचिंद्र प्रताप सिंह

 

मुंबई, दि. 19 : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या  बैठकीमध्ये लम्पी आजाराचा राज्यातील सद्यस्थितीबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला.

 श्री. सिंह म्हणाले की, गत आठवडाभरातील पाऊस व त्यामुळे निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे कीटकांची वाढ, लम्पीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरत होती.  पावसाळी वातावरण व खालावलेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे दैनंदिन बाधित जनावरांची संख्या व मृत्यूमध्ये वाढ झाली होती. अनेक गावांमध्ये पशुपालकांनी गाभण गायींच्या लसीकरणास केलेला विरोध तसेच 4 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांना लसीकरण करणे निर्देशीत नसल्यामुळे वासरांमध्ये रोगप्रादुर्भाव अधिक होता. विभागाकडून सुरू असलेल्या औषधोपचारामुळे गेल्या 3-4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये रोजच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटक नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यभरात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात. पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 17 ऑक्टोबर2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार शिफारशींनुसार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांना औषधोपचार व लसीकरण करावेशासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जनावरांवरील उपचारासाठी सहकार्य करावेअसेही श्री. सिंह यांनी सांगितले.

राज्यात दि. 19 ऑक्टोबर2022 पर्यंत 7 हजार 394 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी आवश्यक खबरदारी घ्यावी. लम्पीचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळीच सुरू झाल्यास बहुतांश जनावरे उपचाराला चांगला प्रतिसाद देतात. सर्व पशुपालकांनी लम्पीच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

राज्यामध्ये दि. 19 ऑक्टोबर2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 820 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1 लाख 18 हजार 313 बाधित पशुधनापैकी एकूण 75 हजार 118 पशुधन उपचाराद्वारे रोगमुक्त झाले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.

 राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 133.12 लाख पशु


नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात

 नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात कार्यवाही सुरु

 

       मुंबईदि. 19 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात प्राप्त तक्रारीवरुन शासनाने समिती गठित केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील कार्यवाही आणि शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून पूढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

          यामध्ये एमकेसीएलला विना निविदा परिक्षेसंदर्भातील काम देणेपरीक्षा विलंबदेयके अदा करणे याबाबत व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष व प्रशासकीय प्रमुख म्हणून कुलगुरुनागपूर विद्यापीठ यांची मुख्य जबाबदारी असल्याने या मुद्याच्या कार्यवाहीबाबत आठ दिवसांत कुलगुरु नागपूर यांनी खुलासा सादर करावाअसे शासनाने कुलगुरु नागपूर यांना कळविले आहे.

          तसेच विद्यापीठातील विना निविदा काम देण्यात आले. या वित्तीय अनियमिततेबाबत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरविद्यापीठ अधिनियम लेखा संहितेनुसार अधिकची चौकशी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

000

Featured post

Lakshvedhi