Tuesday, 18 October 2022

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

 दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा

मोफत एसटी प्रवास

ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची भावना

            मुंबई, दि. १८ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

            विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अधिवेशन कालावधीत २५ ऑगस्ट, २०२२ रोजी ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

            राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ या महिन्याभराच्या कालावधीत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. आता १६ ऑक्टोबरपर्यंत योजनेंतर्गत मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ एवढी झाली आहे. ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेमुळे जिल्ह्याच्या तसेच मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जाणे शक्य होत आहे. 

            योजनेद्वारे राज्यभरातून दिवसाला सरासरी २ लाख ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत आहे.

००००



राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतनमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता.

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतनमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता.

            मुंबई, दि. 18 : येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

            एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

            या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल.

            वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.



जिंदगी

 *Building a Successful Life...*

*If we want to walk Fast...we should walk Alone.*

*But*

*If we want to walk Far... we need to walk Together*.


मोती साबणाचा जन्म*

 🌷

*मोती साबणाचा जन्म*

_दिपावली 🪔निमित्ताने_


तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन..

म्हणजे *बेसनपीठ + दुध* याच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या.


अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला *नारळाची शेंडी* वापरत होते.

🫢


*साबण* म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते. वास्तविक १८७९ च्या काळात उत्तरेत 'मिरत' च्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही..


अंघोळीची अशी तऱ्हा होती. कपड्यांच्या साबणाचाही तर काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, *सनलाईट सोप* नावाचा. त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स..


हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही. लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.


या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला, वनस्पती तुप. आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.


आता साबणातही 'टाटा' उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता. 

*टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते.* टाटांना आव्हान द्यायचे असेल तर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत..

*१० रुपयांना १०० वड्या..* 


नावही ठरलं..*५०१..बार*


या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची ती झाली ब्रिटिश. टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.लिव्हरची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची आणि त्या साबणाच नाव होतं ५००. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले. मग आपल्या साबणाचे नाव ५०१.

कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, *त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.*


बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली. त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती. टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी *हमाम...* तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो. त्या *मोती साबणाची निर्मिती केली.* 


इतिहास विषय ना आवडीचा असला..

*तरी देशाभिमान महत्वाचा..* म्हणून दिवाळी निमित्त करून ही पोस्ट महत्त्वाची.


🪷🙏🏻🪷

जिन्दगी

 *"When you blame and criticize others, you are avoiding some truth about yourself."*

*Good days.😊*

6th best doctor's, नो फीस


 

माणसा परीस मेंढर बरी


 

Featured post

Lakshvedhi