Tuesday, 18 October 2022

फुलराणी


 

हायड्रोजन ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी महाप्रित आणि स्टेनबीस

 हायड्रोजन ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी

महाप्रित आणि स्टेनबीस यांच्यात सामंजस्य करार

 

            मुंबईदि. 17 : महाराष्ट्रात इंडो - जर्मन हायड्रोजन ऊर्जा उद्योग आणि तंत्रज्ञान विकास साधण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) कंपनीद्वारे स्टेनबीस सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंडिया (2E नॉलेज व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​एक युनिट) यांच्यात हैदराबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला.

            यावेळीमहाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महाप्रितचे (प्रशासन) कार्यकारी संचालक, धनंजय कमलाकरप्रशांत गेडाममहाप्रितचे कार्यकारी संचालक (संचालन) सुनील जी पोटेमुख्य महाव्यवस्थापक - इमर्जिंग टेक्नोलॉजी उमाकांत धामणकरव्यवस्थापकीय संचालकांचे तांत्रिक सल्लगार विजय माहुलकरस्टेनबीस सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनीतकुमार गोयल आणि गिरीश अरलीकट्टी उपस्थित होते.

            या करारामुळे भारतीय आणि जर्मन उद्योगांमध्ये हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकासहस्तांतरणप्रशिक्षण आणि कौशल्य निर्मितीची प्रक्रिया सुलभ होईल. ग्रीन हायड्रोजनचा वापर अधिक प्रचलित व सुलभ व्हावा यासाठी राज्याला भारत व जर्मनीमधील स्टार्टअप्ससंशोधन आणि विकास संस्था यासह तज्ज्ञांचे सहकार्य मिळावे, हे महाप्रितचे मुख्य उद्दिष्ट आहे.

            शाश्वत विकासासाठी एक स्वच्छ ऊर्जास्रोत म्हणून ग्रीन हायड्रोजन महत्त्वाची भूमिका बजावतो. ऊर्जा साठवण आणि शाश्वत वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनाला गती देण्यासाठी हायड्रोजन अतिशय महत्त्वाचा घटक आहे. एक अक्षय ऊर्जास्रोतझिरो एमिशन वाहनांसाठी इंधन आणि उद्योगांसाठी आधारभूत सामग्री म्हणून हायड्रोजनचा वापर महत्त्वाचा आहे.

            "महाप्रीतद्वारे विविध हरित हायड्रोजन प्रकल्पांचे नियोजन केले जात असून त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानप्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे सहकार्य या सामंजस्य करारामुळे मिळणार आहे. स्टेनबीस कंपनीचा हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रातील अनुभव आणि जर्मन तंत्रज्ञानाच्या मदतीने हरित हायड्रोजनची निर्मितीत्याची साठवणूक आणि वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. येत्या काळात महाप्रितद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या या हरित हायड्रोजन प्रकल्पांमुळे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या लाभार्थींसाठी रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील." असे श्री. श्रीमाळी यांनी यावेळी सांगितले.

            "महाप्रितच्या सहकार्याने इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानहायड्रोजन तंत्रज्ञानाशी निगडित गतिज ऊर्जा पर्यायबायोमेथेन/मिथेनॉल यांचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरघनकचरा प्रक्रियेतून सिंथेसिस गॅसची निर्मितीवर लक्ष केंद्रित करू. महाराष्ट्रात हायड्रोजन क्लस्टरचा विकास हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.

०००

पेन्शन तुमच्या दारी' सह विविध उपक्रम

 प्रधान महालेखापाल कार्यालयाचे निवृत्तीधारकांसाठी

'पेन्शन तुमच्या दारीसह विविध उपक्रम

 

            प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या द्वारे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात (पुणेनाशिक आणि कोकण विभाग कार्यक्षेत्रात) नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करण्याता आली. या उपक्रमांचा उद्देशज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतनधारकांना वास्तविक वेळेत (रिअल टाइम) व्यावहारिक सहकार्य देण्यासाठी सध्यादररोजच्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यांचा उपयोग करुन प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या हितसंबंधितांच्या सहभागाला आणि सार्वजनिक सेवा वितरणाच्या प्रसाराला बळकटी देणे हा आहे


अंधेरी (पू) पोटनिवडणूक

 अंधेरी (पू) पोटनिवडणूकीसाठी ७ अर्ज

१४ पैकी ७ उमेदवारांची उमेदवारी मागे

मतदान करण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन

 

            मुंबई उपनगरदि. १७ :  महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक  होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. आज दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आज दुपारी ३ वाजेपर्यंत सदर १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेतअशी माहिती '१६६ अंधेरी पूर्वविधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :

१. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

 २. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. श्री. साकिब जफर ईमाम  मल्लिक (अपक्ष)

४. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

५. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

६. श्री. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

७. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

अंतिम लढतीसाठीचे उमेदवार :

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)

३. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

६. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

७. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

            मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी 'अंधेरी पूर्वविधानसभा मतदार संघाच्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

==

मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळ

 मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळाने

घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

 

            मुंबईदि. 17 : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषीअन्न प्रक्रियावैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यासुकाटा फुकाहोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळेमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी तंत्रज्ञानअन्न प्रक्रियावैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधानागरीविकास आदी विविध विषयांवर शिष्टमंडळाशी चर्चा केली. 

            या शिष्टमंडळात आर्थिक विषयातील तज्ज्ञ श्रीमती मोरी रेईकोराजकीय सल्लागार श्रीमती शिमाडा मेगुमी तसेच कुणाल चोणकरविवेक कुलकर्णी या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

००००            



आंबट गोड

 हसता तितक्याच हक्कानं

रुसता आलं पाहिजे...

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी

 अलगद पुसता आलं पाहिजे.


मान-अपमान नात्यात काहीच

 नसतं.

आपल्याला फक्त

समोरच्याच्या हृदयात घुसता

       आलं पाहिजे..!!!


      *🌹शुभ सकाळ🌹*

उठि उठि

 


Featured post

Lakshvedhi