शासनामध्ये होणार नवनवीन संकल्पनांचा वापर राज्य शासनाच्या विविध विभागात नवनवीन संकल्पनांचा वापर करण्याच्या अनुषंगाने नुकताच स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. यामध्ये देशभरातील स्टार्टअप्सना सहभागी झाले होते. यामधील निवडक उत्कृष्ट स्टार्टअप्सना आज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विजेत्यांना शासनाच्या विविध विभागात काम करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येतील. यामध्ये कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी श्रीनिवास सुब्रमण्यम (अरिती बिझनेस सोल्युशन्स), डॉ. रीचा पवार-नायर (खेतीबडी ॲग्रीटेक), आशिष आनंद (व्हर्ल फिनटेक सोल्युशन्स), शिक्षण आणि कौशल्यविषयक स्टार्टअपसाठी मनु कोहली (कॉगनिबल इंटरनॅशनल), नेहा चौहान (ॲव्हिओट्रॉन एअरोस्पेस), हेमाली तुराखीया (स्यात एंटरप्रायजेस), गव्हर्नन्स क्षेत्रातीस स्टार्टअपसाठी अमन संघवी (एजरक्राफ्ट सोल्युशन्स), जागृती दबस (आर्म्स फॉर एआय), पुनम गुप्ता (ड्रोनामॅप्स), आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सेंथीलकुमार मुरुगसन (सेव्ह मॉम), निशांत काठपाल (अयाती डिव्हायसेस), प्रतिक लोढा (निओ डॉक्स), साईप्रसाद पोयरेकर (पॅसिफाय मेडीकल टेक्नॉलॉजीज), इतर विविध क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सुनिल जलीहाल (इंडिक इन्स्पिरेशन्स), बिस्वजित सवाईन (कोराशिया टेक्नॉलॉजिज), नितीन देशपांडे (कॅटोनिक इंडिया), स्मार्ट इन्फ्रा आणि मोबिलीटी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी आशिष शर्मा (निओमोशन असिस्टीव्ह सोल्युशन्स), प्रबोध महाजन (लर्न अँड एम्पॉवर), रवी कौशिक (एअर्थ रिसर्च), डॉ. श्रीकांत सोला (डेव्हीक अर्थ), शाश्वतता क्षेत्रातील स्टार्टअपसाठी गिरीधरन सेनेगाई (स्मार्टटेरा अर्बन वॉटर मॅनेजमेंट), निता सोनी (औमसॅट टेक्नॉलॉजीज), डॉ. प्रेरणा गोराडीया (एक्स्पोजोम), सचिन पाटील (कार्बन क्राफ्ट) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टार्टअप यात्रेमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान याशिवाय कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नुकतीच महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा संपन्न झाली. यामधील उत्कृष्ठ स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी प्रशांत आखरे, आदित्य दिदवानिया, सरोजिनी फडतरे, शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअपसाठी योगेश बियानी, प्रबोध महाजन, सिद्धी सावंत, गव्हर्नन्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सारंग वाकोडीकर, यश दारोलकर, पर्यावरण क्षेत्रातील स्टार्टअपसाठी माधुरी कळंबते, ई-कॉमर्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी अमोल सोनार, रोबोटीक्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी मैथिली कांबळे, स्मार्ट इन्फ्रा आणि मोबिलीटी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी जयेश चौधरी, यश सावंत, काजल राजवैद्य, शाश्वतता क्षेत्रातील स्टार्टअपसाठी समिर बहलकर, पुष्यमित्र जोशी, प्रतिभा मुंडे, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपसाठी किशोरकुमार ठाकरे, डॉ. सुनिल साहुजी, सोहीली पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम विजेत्या तसेच सर्वोत्तम महिला स्टार्टअप्सना प्रत्येकी १ लाख रुपयांचे तर द्वीतीय विजेत्या स्टार्टअप्सना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
|
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 16 October 2022
नवनवीन संकल्पनांचा वापर
दिव्यां गाना मार्गदर्शनपर शिबिर
विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून मातृत्व अपंग सेवाभावी संस्था पेण यांच्या वतीने सदर संस्थेने दिव्यां गाना मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले होते.त्यामध्ये संस्थेने दिव्यांगाना स्वबळावर नोकरी प्राप्त करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.सदरची संस्था गेल्या ५ वर्षापासून दिव्यांगानसाठी अविरत पणे कोणतेही शुल्क न घेता प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र रजि नं.०६|२०१७दि.०६|०१|२०१७.सर्व दिव्यांगाना अहवान करण्यात येते की, ज्या दिव्यांग बांधवांना नोकरीची गरज आहे.त्यांनी तात्काळ कागदपत्रांसह सबंधित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन ह.गायकवाड.यांच्याशी दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपर्क साधावा.
शैक्षणिक पात्रता:१० वी पास.
वयोमर्यादा:१८ ते ४५ वर्ष .
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
१.दिव्यांग सर्टिफिकेट ४०% च्या वर असणे आवश्यक आहे.
२.आधारकार्ड
३.रेशनिंगकार्ड
४.शाळेचे सर्टिफिकेट.
५.अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत:३०|१०|२०२२.
पुढील भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.
१.सचिन गायकवाड:९९२३९६४२९९.
2.पूजा सुर्यवंशी:८१४९०९५४७४.
3.भक्ती राऊत:८०८७६८८२४१.
४.सिद्देश तांबेकर:८२६२०४७५४८.
अंधेरी पोटनिवडणूक विशेष
अंधेरी पोटनिवडणूक विशेष, दि. १५ ऑक्टो. २०२२
अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
मुंबई उपनगर, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने १६६ - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२-८८६-७१७ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५३६ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील.
पोलीस केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.कोया प्रवीण (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८३५५-८७३-९२६ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५७३ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत जनतेला भेटतील.
त्याचप्रमाणे निवडणूक खर्च केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.सत्यजित मंडल (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५९१-३८३-९१५ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५६१ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे.
येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अंधेरी पूर्व या विधानसभा मतदार संघात मतदान होत असून या भागातील सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आणि लोकशाही सुदृढ करावी, असे आवाहनही श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट' ला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुंबई महानगराचा संपूर्ण कायापालट करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई दि.१५ : मुंबई महानगर क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांची विकासात्मक कामे प्रगतीपथावर आहेत. 'स्वच्छ मुंबई-सुंदर मुंबई' तसेच 'खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई' करुन संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट करण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट – २०२२ चे आज वरळी येथे आयोजन करण्यात आले होते, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या परिषदेस खासदार राहुल शेवाळे आणि डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, कन्स्ट्रक्शन टाईम्सचे राममूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, ज्या देशातील रस्ते चांगले असतील त्या देशाची वेगळी ओळख निर्माण होते, तेथील विकासाची गती अधिक असते. यामुळे उद्योगधंद्यांना अधिक चालना मिळते. दळणवळण सुलभ झाले तरच सर्वागीण विकास होण्यास मदत होते, त्यासाठी मुंबई शहरातील ४५० कि.मी. रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्याचे काम नामांकिंत कंपन्यांना देण्यात येणार असून कालमर्यादेपूर्वी आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांना कामे दिली जातील. उर्वरित ४५० कि.मी.च्या कामांची निविदा येत्या मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे. अशाप्रकारे मुंबईतील १०० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आज आयोजित समिटमधून आलेल्या सूचनांचा शासन सकारात्मक विचार करुन या माध्यमातून विकासाची कामे करण्यात येतील. असे सांगून सध्या ३३७ कि.मी.मेट्रोचे कामे सुरु असून ही संपूर्ण कामे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामे झाल्यानंतर १९ लाख प्रवासी मेट्रोमधून प्रवास करतील, यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक सुरळीत होऊन इंधनाच्या बचती बरोबरच पर्यावरणात काही प्रमाणात सुधारणा होईल आणि प्रवासी वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करू शकतील, असेही श्री. शिंदे म्हणाले.
मुंबई महानगरातील कोळी बांधवांसाठी पुनर्विकासाचे कामे करत असताना मुंबईतील १४३ कोळीवाड्यातील नागरिकांच्या सल्ल्याने विकासाचे कामे करण्यात येणार आहेत. कोळी बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगारासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
धारावी झोपडपट्टी पुनर्विकासात आलेल्या समस्या काही प्रमाणात सोडवण्यात आल्या आहेत. धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या ठिकाणी साधारणत: 8 लाख नागरिक राहतात. विविध व्यवसाय करतात. त्यांचेही जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. धारावी पुनर्विकासासाठी विविध तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून विकास करण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुंबई- गोवा मार्गाची कामे सुरू आहेत, आता मुंबई -सिंधुदुर्ग रस्त्याचे कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कोकण पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेने समन्वयाने विकासाचे कामे करण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्व विकासात्मक कामे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच शहराच्या विकासात अनेक बांधकाम उद्योजकांचे मोठे योगदान आहे. या उद्योगांना विविध सवलती देण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरातील नागरिक स्थलांतर होऊ नये, यासाठी मुंबई शहरातच बांधकाम उद्योजकांनी नागरिकांना कमी किमतीत घरे देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
