सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 15 October 2022
चला जाणूया नदीला" अभियान
चला जाणूया नदीला" अभियान लोकसहभागातून वेग घेणार
नदी संवाद यात्रेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समिती
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती
मुंबई, दि.१५: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या "चला जाणूया नदीला " अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता राज्यभर वेग घेणार असून वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय तसेच जिल्हावार समित्यांची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राज्यस्तरीय समितीचे प्रमुख असतील. यासंदर्भातील शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. या अभियानाचे यश लोकसहभागात असून, प्रत्येक समितीने लोकसहभाग जास्तीत जास्त राहील यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. त्यावर उपाय म्हणून नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करणे हे या अभियानातून अभिप्रेत असून लोकसहभागातून हे अभियान निश्चित यशस्वी होईल व प्रत्येक समिती त्या दृष्टीने काम करेल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होते आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. येणाऱ्या काळात नद्यांचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी "चला जाणूया नदीला" अभियान राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे.
अभियानाची उद्दिष्ट्ये
या अभियानाचे उहिष्ट प्रामुख्याने जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरीकांच्या सहकार्याने नद्यांचा सर्वकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे असणार आहे. तसेच नदीला अमृत वाहिनी बनविण्यासाठी कार्यक्रमाचा मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह आणि परिसरातील जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्हयात प्रचार प्रसार याबाबत नियोजन करणे, नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पुर रेषा व पाणलोट क्षेत्रांचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी या बाबतची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे यावर भर असेल. याचबरोबर अभियानाबाबत जनजागृती करणे,अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे ही कामेही या समित्या करतील. नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागाचा सहभाग
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून वाहणाऱ्या निवडक नद्यांबाबतची माहिती, तिचा प्रचार-प्रसार आणि त्यानुषंगिक बाबींसाठी सहाय्य करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या जिल्हा समित्यांमधे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष असतील. याशिवाय विद्यापीठाचे निबंधक आणि महानगरपालिकेचे आयुक्त किंवा उपायुक्त या समितीत विशेष निमंत्रित सदस्य असतील. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,कार्यकारी अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा, आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महाविकास अधिकारी, प्रकल्प संचालक, विभागीय साक्षरता केंद्राचे संचालक,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी या समितीचे सदस्य असतील. तर जलसंपदा विभागातील सिंचन व्यवस्थापनाचे अधीक्षक अभियंता समितीत सहसदस्य सचिव असतील तर जिल्हा वनसंरक्षक सदस्य सचिव असतील. चला जाणूया नदीला अभियानाचे समन्वयक आणि नदी प्रहरी सदस्य यामध्ये सदस्य असतील.समितीचा महत्वाचा दुवा हे संबंधित जिल्हाधिकारी असतील.
यात्रे दरम्यान २ ऑक्टोबर, २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये राज्यभरातील किमान ७५ नद्यांपर्यंत यात्रा पोहोचणार आहे.३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत यात्रेचा / अभ्यासाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार असून १ डिसेंबर २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत यात्रेचा दुसरा टप्पा असेल. या अभ्यासावर आधारित लोक शिक्षणाचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम नियोजित होईल व १ जानेवारी २०२३ ते २० जानेवारी २०२३ या काळात अहवालास अंतिम स्वरूप दिले जाईल.
००००
दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांनाअग्रीम
दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांनाअग्रीम देण्यास मान्यता
मुंबई, दि. १४ : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे.
उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते
वास्तू म्हणते तथस्तू
*घराचे वास्तुशात्र*
जिथे आपण सर्वजण *एकत्र राहतो,* एकमेकांना *आधार* देतो, *सुखदुःखे* वाटून घेतो. *ती वास्तू* फक्त आनंदी नसावी तर *समाधानी* असावी. आनंद हा *भौतिक पातळीवर* असतो आणि समाधान *आत्मिक पातळीवर* असते.
😁 *साखर, लिंबू, मीठ* हे सारे पदार्थ *आपापल्या* आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते *एकमेकांत मिसळतात,* तेंव्हाच विलक्षण *मधुर चवीचे* सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला *कापून आणि पिळून* घ्यावे लागते तर *मीठ व साखरेला* पाण्यात *विरघळून* एकजीव व्हावे लागते.
☝️ *म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.* कारण *गृहमंदिरात* जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर *चवदार सरबत* नाही तर *मधुर-अमृत* तयार होईल.
✌आपले *आईबाबा* एकमेकांशी किती प्रेमाने *वागताहेत* हे बघून मुलांच्या *मनावर आणि शरीरावर* अत्यंत *शुभ परिणाम* होतो.अन्यथ: ती मनातल्या मनात *कुढत* राहतात.
🙏मुले ही *अनुकरणप्रिय* असतात. आईचा *कडवट चेहरा,* वडिलांचा *आरडा-ओरडा* घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग *वास्तुतज्ज्ञ* या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त *अतार्किक, अशास्त्रीय* आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो. आणि आपण *निर्बुद्ध मंडळी* त्यावर हजारो रुपये खर्च करुन *पस्तावतो.*
🌞 अरे, *बाबांनो* कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर *पैसे घेऊन* तुमच्या घरात *"शांती"* आणणे शक्य आहे का.?!!!
*तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.*
🤺ज्येष्ठ नागरिकांनी *प्रकृती साथ* देत असेल तर, *अर्थार्जन* करून मुलांना हातभार लावावा.
*रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.* काहीही कारण नसताना सारखे *लोळत पडलेली* माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.
🏌️♂️मुलांनीही *जन्मभर कष्ट* केलेल्या *आई-वडिलांशी* खूप *नम्रतेने* वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. *सून* म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला *खूप प्रेम आणि आधार* द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली *आधुनिक मुलगी* आहे. आपणच *जनरेशन गॅप* कमी करावा. अर्थात *सुनेने सुद्धा* सासरी साऱ्यांना असा *लळा* लावावा, की सून माहेरी गेली की *सुनं-सुनं* वाटलं पाहिजे.
🍔घरात मेणबत्या *फुंकून* आणि *डोक्यावर कचरा* पाडून घेऊन वाढदिवसाचा *धांगडधिंगा* करण्यापेक्षा मुलाचे *निरांजन* ओवाळून *औक्षण* करावे. भोजनाचे वेळी *आनंदी वातावरण* ठेवावे. *पत्नी जेवली का* विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप *संयमाने* बोलावे.एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण *चिडला* तर दुसऱ्याने *शांत* बसावे.
🤓पहा ना,गवत नसलेल्या जागी *पडलेला अग्नी* जसा *आपोआप शांत* होतो, तसे *सारे शांत* होईल. चालतानाही *घरात पाय आपटू नयेत.* शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच *भांड्यांची* आदळ-आपट करु नये. *पुरुषांनीही* घरात *नीटनेटके* रहावे. सतत फक्त *बायकांनीच* सदाफुलीसारखे *टवटवीत* राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.
*⚘अशी राहते समाधानी वास्तु!*⚘
म्हणून म्हणतो, *तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ* आणि करा आपली *वास्तुदेवता प्रसन्न.* !!
👇🏻घरातील प्रत्येकाच्या *मोबाईलमध्ये* हा मॅसेज गेला, तर प्रत्येक घर *सुखी व समाधानी* होऊ शकेल.
*🙏🏻🙏🏻*🌸
गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प सर्वोत्तम,
देशातील पथदर्शी असा ठरावा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· प्रकल्पासाठी जलसंपदा, पर्यटन विभागाचा सहकार्य करार होणार
मुंबई, दि. १४ : - भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा, देशातील सर्वोत्तम आणि पथदर्शी असा जलपर्यटन प्रकल्प साकारण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात समिती सभागृहात जलपर्यटन प्रकल्पाबाबत बैठक आज झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ-एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांच्यासह, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, लाभ क्षेत्र विकास मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या जलपर्यटन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या जनतेला मोठी रोजगार संधी उपलब्ध होईल. तसेच परिसरात अनेकविध संधी निर्माण होतील. त्यासाठी या परिसराला जोडूनच अन्य स्थळांशी असे पर्यटन सर्कीट विकसित करता येईल. जलपर्यटन असल्याने कोणत्याही परिस्थितीत कुठलेच प्रदुषण होणार नाही, याची काळजी घ्या. चांगले आणि दर्जेदार काम करा. याठिकाणी सुविधा निर्मितीसाठी पीपीपी या तत्वावर अंमलबजावणी करा. पर्यटकांना स्वच्छता आणि दर्जेदार सेवा-सुविधा दिल्यास ते अशा पर्यटनस्थळांकडे आकर्षित होतील. रोजगार, महसूल आणि पर्यटकांसाठी आनंद-विरंगुळा यासाठी असे प्रकल्प महत्वाचे ठरतील. त्यादृष्टीने विविध विभागांनी समन्वयाने अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि पर्यटन विभागाचा परस्पर सहकार्य करार करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
एमटीडीसीच्या श्रीमती जोशी यांनी या जलपर्यटन प्रकल्पाविषयीचा आराखडा सादरीकरणाद्वारे मांडला. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोसीखुर्द प्रकल्पाचा हा जलाशय विविध पर्यटन संधी आणि त्यातील सुविधांसाठी उत्तम पर्याय आहे. त्याबाबतची प्रकल्प व्यवहार्यता आणि विकास संधी यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. जलाशयातील बेटाचाही पर्यटनासाठी वापर करता येणार आहे. या पर्यटनस्थळाच्या पन्नास ते १०० किलोमीटर्स परिघात ताडोबा, नागझिरा, उमरेड, करांढला व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य अशी पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ आहेत. या स्थळांना जोडून घेऊन एक उत्तम टुरिस्ट सर्कीट विकसित करता येणार आहे. नागपूर आणि भंडारा शहरांसह हे स्थळ अन्य ठिकाणांनाही रस्तेमार्गाने जोडलेले आहे. यामुळे लगतच्या राज्यांतूनही पर्यटकांना आकर्षित करता येणार आहे. याठिकाणी जलपर्यटनातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येणार आहेत. रात्रीची जलसफर, बोट हाऊस, भंडारा ते पवनीमधील पर्यटनस्थळे जोडण्यासाठी जेट्टी व्यवस्था, संगीत कारंजे, बोटींग, सर्फींग यासाठीच्या सुविधा, मरिना आणि रॅम्प, रॉकपूल, हो-हो बोट, बंम्पर राईड, फ्लाईंग फिश, जेटाव्हेटर, पॅरासेंलींग आदी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधांचा विकास केला जाईल. त्यासाठी सुमारे १०१ कोटी ३३ लाख रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.
प्रकल्प सुरु झाल्यानंतर २ वर्षात पर्यटकांची संख्या दरवर्षी ७ लाखापर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवर हॉटेल, उपहारगृह आणि इतर पर्यटन निगडीत उद्योगात गुंतवणूक वाढेल. प्रकल्पामुळे सुरुवीताच्या २ वर्षात १५० स्थानिक युवकांना प्रत्यक्षपणे रोजगार तर पुढे ४ वर्षात पाच हजार रोजगार संधी निर्माण होतील आणि या क्षेत्रातील उलाढाल १०० कोटीवर पोहचेल असा अंदाज आहे.
००००
समृध्द मराठी भाषेचे महत्व
समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत
पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार
- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि.१४: महाराष्ट्राला थोर संत, विचारवंत, प्रबोधनकार, सामाजिक शास्त्रज्ञ यांची परंपरा लाभलेली आहे. यांच्या विचाराने महाराष्ट्र घडला आहे.'पुस्तकांचे गाव' या सारखे उत्तम उपक्रम शासनातर्फे राबविले जात आहेत. समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज 'वाचन प्रेरणा दिनाचे' आयोजन करण्यात आले होते, अभिवाचनाच्या कट्ट्याचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाषा संचालक विजया डोनीकर, भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी उपस्थित होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, साहित्याची आवड ही वाचनातूनच होत असते. त्यामुळे शाळांमध्ये वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.जे लोक वाचन करतात त्यांनाच वाचनाचे महत्व कळत असते त्यामुळे शासनही त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
वाचनाची परंपरा समृद्ध आहे : भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी
भाषासंवर्धक ग्रंथसखा श्री. श्यामसुंदर जोशी म्हणाले, पुस्तक वाचनातून समाज वाचन, स्वभाव वाचन, संस्कृती वाचन, लिपी वाचन करायला शिकता आले पाहिजे. वाचन संस्कृतीचा प्रवास भीमबेटकातील चित्रांपासून, शिलालेखांपासून तंजावुर मधील हस्तलिखित, दोलामुद्रितांपर्यंत असा आहे. वाचनाची ही परंपरा समृद्ध आहे. आपली वाटचाल पेपरलेस ग्रंथालयांकडे जरी होत असली तरी वाचन संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही.शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. साहित्याची आवड वाचनातूनच निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये प्रयत्न केल जात आहेत असेही ते म्हणाले.
वाचनानेच मी घडले : जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी. निधी चौधरी म्हणाल्या, वाचनानेच मी घडले सध्या मी इ-फॉर्म किंवा डिजीटल स्वरूपामध्ये वाचन करते. वर्षभरात ३६५ पुस्तकं वाचायची असा संकल्प करून गेल्या वर्षभरात मी ४१० पुस्तकं वाचली. सुप्रसिद्ध लेखक एस. एल. भैरप्पा यांचे उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले 'पर्व' हे पुस्तक मी ३ ते ४ वेळा वाचले आहे. टॉलस्टॉय, भैरप्पा वाचल्यावर दिवसभरात आलेला मानसिक थकवा जातो. आयुष्यात महाभारत मला खूप प्रेरक ठरले,असेही त्या म्हटल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवाचन कट्टयात सहभाग घेतला. एकूण २८ सहभागींना भाषा संचालनालयाकडून प्रमाणपत्र व पुस्तक भेट देण्यात आले भाषा संचालनालयाचे प्रकाशन असलेली भारताचे संविधानाची द्विभाषी प्रत देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
