Saturday, 15 October 2022

निळवंडे कालबा

 अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

       मुंबईदि. १४: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

        निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडेमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेअहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

        मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डिसेंबर अखेरपर्यंत या दोन्ही कालव्याचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सुमारे ८३ गावातील नागरिकांना पाण्याचा लाभ होणार असल्याचे खासदार श्री. लोखंडे यांनी सांगितले.

        अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात पाहणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनी बाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली.

००००


चारो तरफ गोपीया


 

फरक पहा आणि सांगा



 

सुप्रभात

 




विदर्भात खनिजावर आधारित उद्योगधंद्य

 विदर्भात खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची बांधणी करणारे धोरण आखणार

- दादाजी भुसे

'मिनकॉन2022 परिषदेचे उदघाटन

            नागपूर दि. १४ : महाराष्ट्रामध्ये  विदर्भा एवढे खनिज व खाणी कुठेच नाहीत. त्यामुळे राज्याचे नवीन खनिज धोरण ठरवताना विदर्भामध्ये खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची बांधणी करण्याला प्राधान्य देण्यात येईलअसे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

            सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस पार्क येथे आयोजित मिनकॉन 2022’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. भुसे बोलत होते. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. केंद्रीय कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशीराज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारमहाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे अध्यक्ष आमदार आशिष जयस्वालउद्योग व खाण विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळेविदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे (वेद) अध्यक्ष देवेंद्र पारेखराहुल उपगल्नावारशिवकुमार राव यावेळी उपस्थित होते.

            विदर्भात मोठ्या प्रमणात खनिज साठे सापडत असताना त्यावर आधारित उद्योग मात्र अन्य ठिकाणी आहेत. विदर्भासारख्या मागासलेल्या भागात खनिजावर आधारित उद्योग व्यवसाय उभे रहावेत. स्थानिकांना रोजगार मिळावायासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले. खनिजामध्ये असणारे धातू व त्यावर असणारे प्रक्रिया उद्योगत्याचे परीक्षणसंशोधन या संदर्भातील सर्व कार्यालये संस्था विदर्भात उभी राहिली पाहिजेअसा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात नवीन खनिज धोरण राज्य सरकार आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणालेभूगर्भातील खनिज साठा हजारो वर्षाच्या प्रक्रियेनंतर तयार होतो. त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात झाला पाहिजे. ज्या भागातून हा काढला जात आहे. त्या भागाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे विदर्भात उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल होणे आवश्यक आहे.  खाणीचे प्रदूषणपर्यावरणाचा ऱ्हास विदर्भ सहन करतोत्यामुळे येथील उद्योग उभारणीला गती मिळायला हवी. या संदर्भातील सर्व कार्यालयेप्रक्रिया उद्योग विदर्भात उभे होण्यासाठी प्रयत्न करावेत.

            तीन दिवसीय मिनकॉन 2022’ परिषदेतून देशाच्या खानखनिज व त्यावर आधारित व्यवस्थापनाला नवी दिशा देणारे प्रस्ताव सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना पुढे आल्या पाहिजे. त्यावर आपण गांभीर्याने विचार करूअसे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या खनिज व पर्यावरणाविषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातीलअसे श्री. जोशी यावेळी म्हणाले. तसेच विदर्भात उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी ज्यावेळी या ठिकाणीच्या खाणींचा लिलाव होतोत्यावेळी उद्योगाची अट टाकण्यात यावीअशी सूचना त्यांनी यावेळी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता म्हणून पुढे येण्यासाठी आपले मार्गक्रमण असून त्यामध्ये खनिकर्म विभागाने आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारताला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर खनिकर्म क्षेत्रांसाठी आवश्यक परवानग्या घेताना होणारी दिरंगाई हद्दपार करावी लागेल. भूगर्भात मोठ्या प्रमाणात खनिज उपलब्ध असतानाही या दिरंगाईमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात खनिज आयात करावे लागते. शासकीय यंत्रणेतील दोष दूर करून आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. याअनुषंगाने तीन दिवसीय परिषदेत चर्चा व्हावी. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मिनकॉनसारख्या परिषदेमध्ये धोरणांची पायाभरणी होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

तत्पूर्वी खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. या परिषदेत होणाऱ्या चर्चेच्या मसुद्यावरून नवीन धोरण तयार करण्यात मदत होईलअशी अपेक्षा त्यांनी केली.

            राज्यातील खाणखनिज आणि धातूंची उपलब्धता आणि उपयोगिता यावर प्रकाश टाकणाऱ्या 'मिनकॉन 2022 ' या तीन दिवशीय परिषदेचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रदर्शनपरिषदव्यापार बैठकाआणि व्हेंडर विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलएम.ए. अॅक्टिव्ह आणि महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाच्यावतीने राज्य सरकार व केंद्रीय सूक्ष्मलघू व मध्यम उद्योग विकास मंत्रालयामार्फत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

पुढील तीन दिवस ही परिषद सुरू असणार आहे. उद्या15 ऑक्टोबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतआमदार आशिष जायस्वाल आणि 16 रोजी समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.

*****


सप्तरंगी


 

चर्नी रोड स्थानक

 चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाची

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली पाहणी

 

            मुंबईदि.14 :- पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारीरेल्वेमुंबई महानगरपालिका आदी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            चर्नी रोड स्थानकातील उत्तर बाजूचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर उतरणारा पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. येथे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या परिसराची मंत्री श्री. केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीमुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरसहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.वर्मामहानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

            पाहणी केल्यानंतर श्री केसरकर म्हणालेप्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. याबरोबरच सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल पडल्यानंतर मुंबईतील धोकादायक असलेले पूल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात येऊन पाडण्यात आले. चर्नी रोड हा मूळ मुंबईतील मुख्य भाग आहे. येथे प्रवाशांची संख्या लक्षात घेता तातडीची उपाययोजना म्हणून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

डोंगरीभायखळा पोलीस वसाहतीची पाहणी

            डोंगरी तसेच भायखळा भागातील सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या पोलीस वसाहतींची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी वसाहतीतील पोलीस कुटुंबियांशी संवाद साधून इमारतींच्या दुरूस्तीचे काम येत्या दोन महिन्यात सुरू करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

            या इमारतींच्या नूतनीकरण आणि दुरूस्तीचे काम दर्जेदार व्हावेप्रत्येकाला त्यांच्या घरात शौचालय मिळावेआता असलेल्या एकत्रित शौचालयाच्या जागी जिमयोगा करता येतील अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यातअसे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार अमीन पटेलडोंगरी येथे पोलीस उपायुक्त हरी बालाजीभायखळा येथे पोलीस उपायुक्त योगेश कुमारसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील, उपअभियंता एन.सी.पाटील आदी उपस्थित होते.

०००००


Featured post

Lakshvedhi