Friday, 14 October 2022

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या

 अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य

 

            मुंबई, दि. 13 : जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांनी जारी केला आहे.

            या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करुन जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी 69 लाख 43 हजार रुपयांच्या निधीचे औरंगाबादअमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे  शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

            एकूण ७५५ कोटी रु. पैकी औरंगाबाद विभागास 59754.03 लाखअमरावती विभाग 5113.31 लाखपुणे विभागास 10702.09  लाख इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मंजूर करण्यात आला आहे.

            जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकांसाठी १३,६०० रूपयेबागायत पिकांसाठी २७,००० रूपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ३६,००० रूपये निधी वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

००००

श्रद्धा मेश्राम/उपसंपादक/13.10.22


 

जीवन ऐसे नाव





 

जिंदगी





 

Food craft


 

पोलीस पदके प्रदान.

 राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान

पदक अलंकरण समारंभ उत्साहात

 

            मुंबई दि. 13 : पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन २०२० आणि २०२१ या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदकेगुणवत्तापूर्ण सेवा पदके आणि पोलीस शौर्य पदके आज राजभवन येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

            राजभवनातील दरबार हॉल येथे आयोजित पोलीस अलंकरण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमयेपोलीस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारीसेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

            राज्य पोलीस दलातील नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक२७ जणांना पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ७७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

'राष्ट्रपती पोलीस पदक२०२०

            १) रितेश कुमारअपर पोलीस महासंचालकगुन्हे अन्वेषण विभागपुणे२) संजीव कुमार सिंघलअपर पोलीस महासंचालक (आस्थापना)पोलीस महासंचालक कार्यालयमहाराष्ट्र राज्य मुंबई३) सुषमा शैलेंद्र चव्हाणसहायक पोलीस आयुक्तपुणे शहर४) विजय पोपटराव लोंढेपोलीस उपनिरीक्षकनाशिक शहर ५) गणेश जगन्नाथ म्हेत्रससहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसातारा.

'राष्ट्रपती पोलीस पदक२०२१

            १. प्रभात कुमारअपर पोलीस महासंचालकलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई२) डॉ. सुखविंदर सिंहअपर पोलीस महासंचालकफोर्स वनमुंबई३) निवृत्ती तुकाराम कदमसे.नि सहायक पोलीस आयुक्तठाणे शहर४) विलास बाळकू गंगावणे,  से.नि सहायक पोलीस आयुक्तबृहन्मुंबई.

'पोलीस शौर्य पदक’ 2020

            १) राजेश ज्ञानोबा खांडवेपोलीस निरीक्षक २) मनीष पुंडलिक गोरलेपोलीस हवालदार ३) गोवर्धन जनार्दन वाढईपोलीस नाईक४) कैलास काशीराम उसेंडी पोलीस नाईक  ५) कुमारशाहा वासुदेव किरंगेपोलीस नाईक.६) शिवलाल रुपसिंग हिडकोपोलीस शिपाई .७)राकेश रामसू हिचामीसहायक पोलीस उप निरीक्षक ८) वसंत नानका तडवीपोलीस शिपाई ९) सुभाष पांडुरंग उसेंडीपोलीस शिपाई १०) रमेश वेंकन्ना कोमीरेपोलीस शिपाई ११) सुरेश दुर्गूजी कोवासेसहायक पोलीस उप निरीक्षक १२)रतिराम रघुराम पोरेटीसहायक पोलीस उप निरीक्षक.,१३) प्रदीपकुमार रायभान गेडामपोलीस हवालदार १४) राकेश महादेव नरोटेपोलीस हवालदार

'पोलीस शौर्य पदक’ 2021

            1) आर. राजा पोलीस उपायुक्त. 2) नागनाथ गुरुसिद्ध पाटीलसहायक पोलीस निरीक्षक. 3) महादेव मारोती मडावीपोलीस हवालदार. 4) कमलेश अशोक अर्कापोलीस नाईक. 5) अमुल श्रीराम जगतापपोलीस नाईक, 6) वेल्ला कोरके आत्रामपोलीस नाईक, 7) हेमंत कोरके मडावीपोलीस शिपाई, 8) सुधाकर मलय्या मोगलीवारपोलीस शिपाई, 9) बियेश्वर विष्णू गेडामपोलीस शिपाई, 10) हरि बालाजी एन.पोलीस उप आयुक्त, 11) निलेश मारोती ढुमणेपोलीस हवालदार, 12) गिरीश मारोती ढेकलेपोलीस शिपाई, 13) गजानन दत्तात्रय पवारवरिष्ठ पोलीस निरीक्षक.

            पोलीस पदक धारकांची यादी सोबत जोडली आहे.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ/13.10.22

Governor presents President’s Police Medals to 114  Police Officers, Personnel

 

       The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari presented the President’s Police Medals for Gallantry, President’s Police Medals for Meritorious Service and Police Medals for Meritorious Service to 114 Police Officers and Police personnel at an Investiture Ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Thursday (13th Oct). 

      The police medals announced on the Independence Day in 2020 and the Republic Day in 2021 were given away.

      Chief Minister Eknath Shinde, DGP Rajnish Seth, Commissioner of Police Brihanmumbai Vivek Phansalkar, ACS (Home) Anand Limaye, senior police officers, retired police officers, decorated police officers and police personnel and family members of the awardees were present.

      Twenty seven police officers and police personnel were awarded the Police Medals for Gallantry, while President's Police Medals were presented to police officials.  Seventy eight police officers and police personnel were given the Police Medals for Meritorious service on the occasion.

0000

 

 

पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर.

 राज्यात वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार

            मुंबईदि. 13 : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार असून ते राबविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध संस्था व शासनाच्या समन्वयाने राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार असल्याची माहिती, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे  राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालय  'पर्यटन नवा विचार, नवी दिशाअंतर्गत आणि दै. मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे  सचिव सौरभ विजयमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन.पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, तरुण भारतचे संपादक किरण शेलार यासह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन उपक्रम राबवण्यासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची एक समिती नेमण्यात येईल. या समितीमार्फत राज्यभरात पर्यटन विषयक उपक्रम राबवण्यात येतील. महिलांना पर्यटन उद्योग क्षेत्रामध्ये संधी मिळावी यासाठी पर्यटन गाईड किंवा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवावेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातूनही पर्यटन विषयक कौशल्य वृद्धीसाठी आपल्या सर्वांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. आज पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून विविध पर्यटन विषयक उपक्रम राबवून रोजगार निर्माण करण्याचे नियोजन करता येईल. पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तसेच स्वयंसेवी  संस्थांनी देखील आपल्या सूचना मांडाव्यात. शासन व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. या संवादातून महाराष्ट्र पर्यटन क्षेत्र देशातच नव्हे तर राज्यातही आपले स्थान निर्माण करेल. छत्रपती शिवरायांची पावन भूमी असलेले महाराष्ट्राची माहिती पर्यटकांना होण्यासाठी विविध उपक्रम राबवता येतील. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर  महाराष्ट्रातही रायगड किल्ला येथे महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे यासाठी सूचना कराव्यात. राज्यातील १५ महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शौचालय तसेच मुलभूत सोयी देखील करण्यात येतील असे मंत्री श्री. लोढा म्हणाले.

             या कार्यक्रमात शिल्पा बोरकर यांनी पर्यटन विषयक शैक्षणिक संस्थाओंकार ओक याने साहसी पर्यटनमिलिंद चाळके यांनी कृषी पर्यटनकॅरॅव्हन पर्यटन सचिन पांचाळऐतिहासिक पर्यटन अस्लम सय्यदशाश्वत पर्यटन महेश म्हणगोरेट्रेल संस्था रिद्धी जोशीवेलनेस टुरिझम ऑपरेटर उमेश उणिकृष्णनमेडिकल टूरिझम मिहीर व्होरावाईल्ड लाईफ टुरिझम लोकेश तारदलकरटूरिझम असोसिएशन जय भाटियाटुरिझम कन्सल्टंट मकरंद केसरकरकंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकरअमोल जमदरेगिआयटी टूर ऑपरेटर अमर महाजन यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रातील अडचणीआव्हान आणि समस्या यावर सादरीकरण करून पर्यटन क्षेत्रात आवश्यक बदल याबाबत मते मांडली. राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात बाजी मारणाऱ्या महाराष्ट्रातील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दै.तरूण भारतचे संपादक श्री. शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

             या परिषदेत शैक्षणिक संस्था – विद्यापीठे आणि खाजगी महाविद्यालयेकारवान टूर ऑपरेटर., साहसी टूर ऑपरेटरकृषी टूर ऑपरेटर, वन्यजीव टूर ऑपरेटर, शाश्वत टूर ऑपरेटरहेरिटेज टूर ऑपरेटरपर्यटन संघटनाट्रॅव्हल स्टार्ट-अप, कंटेंट क्रिएटर्सट्रेल संयोजक (वारसा/वन्यजीव/पाकशास्त्र), सहायक सेवा प्रदाते, समूह समावेशी टूर ऑपरेटर यांनी सहभाग घेतला होता.

मतिमंद मुलीला मिळाला

 महिला व बालविकास विभागाच्या तत्परतेने

मतिमंद मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

फेसबुकवरील तक्रारीची तत्काळ दखल

 

            मुंबई, दि. 13 :महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ मतिमंद मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहेहे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली आहे.

            दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास पुण्यातील राहुल जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज केला. त्यात पुण्यातील एक वीस वर्षीय मतिमंद मुलगी रस्त्यावर राहत असून तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ करणारे कोणीही नसल्याचा उल्लेख केला. तसेच तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ही माहिती महिला व बाल विकास विभागाच्या समाज माध्यम प्रमुखांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वा. श्रीमती अग्रवाल यांना दिली. त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर. विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत श्रीमती विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या निवासाची व्यवस्था केली.

प्रतिक्रिया 1

            महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. विशेषतः काही तासांमध्ये विभागाने या मतिमंद मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महिला व बालविकास विभागाच्या समाज माध्यम टीम आणि सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

- राहुल जाधवपुणे.

प्रतिक्रिया 2

            एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे.

            - रुबल अग्रवालएकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक

Featured post

Lakshvedhi