सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 14 October 2022
पोलीस पदके प्रदान.
राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान
पदक अलंकरण समारंभ उत्साहात
मुंबई दि. 13 : पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन २०२० आणि २०२१ या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके, गुणवत्तापूर्ण सेवा पदके आणि पोलीस शौर्य पदके आज राजभवन येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.
राजभवनातील दरबार हॉल येथे आयोजित पोलीस अलंकरण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
राज्य पोलीस दलातील नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, २७ जणांना पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ७७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.
'राष्ट्रपती पोलीस पदक' २०२०
१) रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, २) संजीव कुमार सिंघल, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, ३) सुषमा शैलेंद्र चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर, ४) विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर ५) गणेश जगन्नाथ म्हेत्रस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सातारा.
'राष्ट्रपती पोलीस पदक' २०२१
१. प्रभात कुमार, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई, २) डॉ. सुखविंदर सिंह, अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई, ३) निवृत्ती तुकाराम कदम, से.नि सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ४) विलास बाळकू गंगावणे, से.नि सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
'पोलीस शौर्य पदक’ 2020
१) राजेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस निरीक्षक २) मनीष पुंडलिक गोरले, पोलीस हवालदार ३) गोवर्धन जनार्दन वाढई, पोलीस नाईक, ४) कैलास काशीराम उसेंडी पोलीस नाईक ५) कुमारशाहा वासुदेव किरंगे, पोलीस नाईक., ६) शिवलाल रुपसिंग हिडको, पोलीस शिपाई ., ७)राकेश रामसू हिचामी, सहायक पोलीस उप निरीक्षक ८) वसंत नानका तडवी, पोलीस शिपाई ९) सुभाष पांडुरंग उसेंडी, पोलीस शिपाई १०) रमेश वेंकन्ना कोमीरे, पोलीस शिपाई ११) सुरेश दुर्गूजी कोवासे, सहायक पोलीस उप निरीक्षक १२)रतिराम रघुराम पोरेटी, सहायक पोलीस उप निरीक्षक.,१३) प्रदीपकुमार रायभान गेडाम, पोलीस हवालदार १४) राकेश महादेव नरोटे, पोलीस हवालदार
'पोलीस शौर्य पदक’ 2021
1) आर. राजा पोलीस उपायुक्त. 2) नागनाथ गुरुसिद्ध पाटील, सहायक पोलीस निरीक्षक. 3) महादेव मारोती मडावी, पोलीस हवालदार. 4) कमलेश अशोक अर्का, पोलीस नाईक. 5) अमुल श्रीराम जगताप, पोलीस नाईक, 6) वेल्ला कोरके आत्राम, पोलीस नाईक, 7) हेमंत कोरके मडावी, पोलीस शिपाई, 8) सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस शिपाई, 9) बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस शिपाई, 10) हरि बालाजी एन., पोलीस उप आयुक्त, 11) निलेश मारोती ढुमणे, पोलीस हवालदार, 12) गिरीश मारोती ढेकले, पोलीस शिपाई, 13) गजानन दत्तात्रय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.
पोलीस पदक धारकांची यादी सोबत जोडली आहे.
००००
मनीषा पिंगळे/विसंअ/13.10.22
Governor presents President’s Police Medals to 114 Police Officers, Personnel
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari presented the President’s Police Medals for Gallantry, President’s Police Medals for Meritorious Service and Police Medals for Meritorious Service to 114 Police Officers and Police personnel at an Investiture Ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Thursday (13th Oct).
The police medals announced on the Independence Day in 2020 and the Republic Day in 2021 were given away.
Chief Minister Eknath Shinde, DGP Rajnish Seth, Commissioner of Police Brihanmumbai Vivek Phansalkar, ACS (Home) Anand Limaye, senior police officers, retired police officers, decorated police officers and police personnel and family members of the awardees were present.
Twenty seven police officers and police personnel were awarded the Police Medals for Gallantry, while President's Police Medals were presented to 9 police officials. Seventy eight police officers and police personnel were given the Police Medals for Meritorious service on the occasion.
0000
पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर.
राज्यात वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार
- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार
मुंबई, दि. 13 : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार असून ते राबविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध संस्था व शासनाच्या समन्वयाने राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार असल्याची माहिती, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालय 'पर्यटन नवा विचार, नवी दिशा' अंतर्गत आणि दै. मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन.पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, तरुण भारतचे संपादक किरण शेलार यासह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन उपक्रम राबवण्यासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची एक समिती नेमण्यात येईल. या समितीमार्फत राज्यभरात पर्यटन विषयक उपक्रम राबवण्यात येतील. महिलांना पर्यटन उद्योग क्षेत्रामध्ये संधी मिळावी यासाठी पर्यटन गाईड किंवा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवावेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातूनही पर्यटन विषयक कौशल्य वृद्धीसाठी आपल्या सर्वांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. आज पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून विविध पर्यटन विषयक उपक्रम राबवून रोजगार निर्माण करण्याचे नियोजन करता येईल. पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी देखील आपल्या सूचना मांडाव्यात. शासन व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. या संवादातून महाराष्ट्र पर्यटन क्षेत्र देशातच नव्हे तर राज्यातही आपले स्थान निर्माण करेल. छत्रपती शिवरायांची पावन भूमी असलेले महाराष्ट्राची माहिती पर्यटकांना होण्यासाठी विविध उपक्रम राबवता येतील. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही रायगड किल्ला येथे महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे यासाठी सूचना कराव्यात. राज्यातील १५ महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शौचालय तसेच मुलभूत सोयी देखील करण्यात येतील असे मंत्री श्री. लोढा म्हणाले.
या कार्यक्रमात शिल्पा बोरकर यांनी पर्यटन विषयक शैक्षणिक संस्था, ओंकार ओक याने साहसी पर्यटन, मिलिंद चाळके यांनी कृषी पर्यटन, कॅरॅव्हन पर्यटन सचिन पांचाळ, ऐतिहासिक पर्यटन अस्लम सय्यद, शाश्वत पर्यटन महेश म्हणगोरे, ट्रेल संस्था रिद्धी जोशी, वेलनेस टुरिझम ऑपरेटर उमेश उणिकृष्णन, मेडिकल टूरिझम मिहीर व्होरा, वाईल्ड लाईफ टुरिझम लोकेश तारदलकर, टूरिझम असोसिएशन जय भाटिया, टुरिझम कन्सल्टंट मकरंद केसरकर, कंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकर, अमोल जमदरे, गिआयटी टूर ऑपरेटर अमर महाजन यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रातील अडचणी, आव्हान आणि समस्या यावर सादरीकरण करून पर्यटन क्षेत्रात आवश्यक बदल याबाबत मते मांडली. राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात बाजी मारणाऱ्या महाराष्ट्रातील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दै.तरूण भारतचे संपादक श्री. शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
या परिषदेत शैक्षणिक संस्था – विद्यापीठे आणि खाजगी महाविद्यालये, कारवान टूर ऑपरेटर., साहसी टूर ऑपरेटर, कृषी टूर ऑपरेटर, वन्यजीव टूर ऑपरेटर, शाश्वत टूर ऑपरेटर, हेरिटेज टूर ऑपरेटर, पर्यटन संघटना, ट्रॅव्हल स्टार्ट-अप, कंटेंट क्रिएटर्स, ट्रेल संयोजक (वारसा/वन्यजीव/पाकशास्त्र), सहायक सेवा प्रदाते, समूह समावेशी टूर ऑपरेटर यांनी सहभाग घेतला होता.
मतिमंद मुलीला मिळाला
महिला व बालविकास विभागाच्या तत्परतेने
मतिमंद मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा
फेसबुकवरील तक्रारीची तत्काळ दखल
मुंबई, दि. 13 :- महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ मतिमंद मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली आहे.
दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास पुण्यातील राहुल जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज केला. त्यात पुण्यातील एक वीस वर्षीय मतिमंद मुलगी रस्त्यावर राहत असून तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ करणारे कोणीही नसल्याचा उल्लेख केला. तसेच तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ही माहिती महिला व बाल विकास विभागाच्या समाज माध्यम प्रमुखांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वा. श्रीमती अग्रवाल यांना दिली. त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर. विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत श्रीमती विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या निवासाची व्यवस्था केली.
प्रतिक्रिया 1
महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. विशेषतः काही तासांमध्ये विभागाने या मतिमंद मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महिला व बालविकास विभागाच्या समाज माध्यम टीम आणि सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
- राहुल जाधव, पुणे.
प्रतिक्रिया 2
एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे.
- रुबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक
औष्या है
🍀🍀🌷🌷🌷🌷🌷🍀🍀
*"आयुष्य" तसं खुप शांत असतं.., पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या.., निर्माण झालेल्या "गरजा" आणि "अपेक्षा" मात्र दंगल घडवित असतात...!!!*
🌺🌺 *सुप्रभात* 🌺🌺
जिंदगी
*आपण शब्दांना*
*स्पर्श करु शकत नाही.*
*पण*
*मनाला*
*स्पर्श करण्याची ताकद*
*असणारे शब्द वापरुन इतरांना आपलंस नक्कीच करु शकतो.....!!!*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
