सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 14 October 2022
औष्या है
🍀🍀🌷🌷🌷🌷🌷🍀🍀
*"आयुष्य" तसं खुप शांत असतं.., पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या.., निर्माण झालेल्या "गरजा" आणि "अपेक्षा" मात्र दंगल घडवित असतात...!!!*
🌺🌺 *सुप्रभात* 🌺🌺
जिंदगी
*आपण शब्दांना*
*स्पर्श करु शकत नाही.*
*पण*
*मनाला*
*स्पर्श करण्याची ताकद*
*असणारे शब्द वापरुन इतरांना आपलंस नक्कीच करु शकतो.....!!!*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
Thursday, 13 October 2022
बेरोजगारांना रोजगार
राज्यात सप्टेंबरमध्ये १३ हजार बेरोजगारांना रोजगार
- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये १३ हजार ०२४ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महास्वयं वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९८ हजार ४०७ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, माहे सप्टेंबर २०२२ मध्ये विभागाकडे ३६ हजार ६३४ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ४ हजार ५६८, नाशिक विभागात ४ हजार ४०६, पुणे विभागात १५ हजार ५९०, औरंगाबाद विभागात ७ हजार ६४५, अमरावती विभागात २ हजार ०२८ तर नागपूर विभागात २ हजार ३९७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ०२४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार ३४६, नाशिक विभागात १ हजार ४७४, पुणे विभागात ३ हजार ७१३, औरंगाबाद विभागात सर्वाधिक ३ हजार ७३३, अमरावती विभागात ९८० तर नागपूर विभागात ७७८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित महारोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.
कोविडमुळे अनाथ विद्यार्थी
कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या
“पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश
मुंबई दि. 13 : कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
विद्यार्थी हीत लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
0000
सेवेच्या ठायीं तत्पर
दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा बसेस
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती
मुंबई, दि. 13 : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत दि.२९ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. चन्ने यांनी केले आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चन्ने यांनी केले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, असे श्री. चन्ने यांनी सांगितले. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असेही श्री. चन्ने यांनी सांगितले.
0000
दिलखुलास
दिलखुलास’ कार्यक्रमात संजय आवटे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात लेखक, संपादक संजय आवटे यांची वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर, शनिवार दि. 15 ऑक्टोबर आणि रविवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीत लेखक संजय आवटे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात वाचन संस्कृतीबाबत विस्तृत मांडणी केली आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी पोषक वातावरण महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
