*चालून- चालून थकल्यावर समजले की, "प्रश्न" प्रवासाचा नाही, तर "सोबतीचा" होता.... सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात, यावरच बराचसा प्रवास अवलंबुन असतो मग प्रवास "रस्त्यावरचा" असो की, "आयुष्याचा"....!*
🕉🔱 *शुभ सकाळ* 🔱🕉
🚩🚩 *जय महाराष्ट्र* 🚩🚩
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*चालून- चालून थकल्यावर समजले की, "प्रश्न" प्रवासाचा नाही, तर "सोबतीचा" होता.... सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात, यावरच बराचसा प्रवास अवलंबुन असतो मग प्रवास "रस्त्यावरचा" असो की, "आयुष्याचा"....!*
🕉🔱 *शुभ सकाळ* 🔱🕉
🚩🚩 *जय महाराष्ट्र* 🚩🚩
मुंबई, दि. 11- राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन करताना त्याठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या प्रकल्पग्रस्तांना गट क संवर्गात विद्यापीठाने सामावून घेतले. तसेच उर्वरित प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठाचा पदांचा आकृतीबंध तयार झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या 5 टक्के मर्यादेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला दिले.
यासंदर्भात मंत्रालयात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मंत्री श्री. सत्तार यांची राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह कृषी विद्यापीठाचे अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त कृती समिती सदस्य उपस्थित होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील रिक्त पदे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी असणारे समांतर आरक्षण याबाबतची तपशीलवार माहिती मंत्री श्री. विखे-पाटील व श्री. सत्तार यांनी जाणून घेतली. विद्यापीठाचा मंजूर पदांच्या आकृतीबंधानंतर ही कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आत्मा’अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आता ‘ग्रुप इन्शुरन्स’ योजना
- कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 11- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत विविध पदांच्या समायोजनाबाबत इतर राज्यात काय कार्यवाही करण्यात आली आहे, हंगामी पदावर कार्यरत असताना त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राबविण्यात आलेल्या कार्यप्रणालीची माहिती घेऊन त्याप्रमाणे राज्यातील आत्मा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेता येईल का, हे तपासावे, असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला दिले. आत्मा अंतर्गत या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स योजना राबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यासंदर्भात मंत्रालयात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत आत्मा अंतर्गत कार्यरत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, संगणक आज्ञावली रुपरेषक यांच्या समायोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, आत्माचे प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
केंद्रपुरस्कृत कृषि विस्तार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी आत्मा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी कंत्राटी पदावर विविध पदांची भरती करण्यात आली. सध्या राज्यात 1 हजार 582 मंजूर पदे होती. त्यापैकी केवळ 574 पदे सध्या भरली गेली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वतीने मानधन वाढविण्याची आणि समायोजन करण्याची मागणी होती. मात्र, थेट सेवाभरती नियम आणि अटी लक्षात घेता ही कार्यवाही करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याबाबत इतर राज्यांनी काय कार्यवाही केली आहे, ते लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या लगतच्या मध्यप्रदेश, कर्नाटक यासह इतर राज्यात याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान यावेळी या हंगामी कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुविधांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यावर या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स योजना लागू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
*****