Tuesday, 11 October 2022

कृषी औद्योगिक पार्क

 सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्क उभारणार

- उदय सामंत.

            मुंबई दि. 11 :- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी) मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

            सिल्लोड येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला. एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात सिल्लोडचे आमदार तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. उद्योगमंत्र्यांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरु करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

            उद्योगमंत्री श्री सामंत म्हणाले, सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरु करायची आहे. या प्रस्तावित एमआयडीसीच्या निम्म्या क्षेत्रात कृषी औद्योगिक पार्क (ॲग्रो इंडस्ट्री पार्क) उभारल्यास कृषी अन्न प्रकिया उद्योगांना चालना मिळेल. तसेच उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वापरल्यास औद्योगिक समतोल राखता येईल. औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग उभारणीसंदर्भात पालकमंत्री यांच्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल. या बैठकीत जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि उद्योगांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकामधील प्रस्तावांचा देखील आढावा घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी सिल्लोड येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री श्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

            कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्यात रोजगारासाठी उद्योग उभारणे आणि त्यांना चालना देण्याची गरज आहे. सिल्लोड परिसर हा डोंगरी भाग असून रस्ते, मुबलक पाणी अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. सिल्लोड हा तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी असल्याने वाहतूक व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे. येत्या काळात कृषी प्रक्रिया उद्योजक आणि इतर कंपन्यांना उद्योग उभारण्याबाबत आवाहन करणार असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

            या बैठकीला एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगांवकर, अवर सचिव किरण जाधव, औरंगाबादचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.

 ऊर्जा विभागाचा लिक्वीड नॅचरल गॅस निर्मिती


संदर्भात किंग्स गॅस कंपनी सोबत सामंजस्य करा.

             मुंबई, दि. 11 : लिक्वीड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला.

         सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराच्या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, डॉ. पी. अनबलगन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, किंग्स गॅस प्रा.लि.चे व्यवस्थापक मोहंमद कुरेशी, समीर वहाबे, समीर हमीदे उपस्थित होते.


          लिक्वीड नॅचरल गॅस हा जीवाश्म इंधनाला एक उत्तम पर्याय असून येत्या काळात हा गॅस अधिक उपयुक्त आणि पर्यावरण पूरक ठरणार आहे. किंग्स गॅस प्रा.लि. हे राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यात लिक्वीड नॅचरल गॅसची निर्मिती, उपलब्धता आणि वापर वाढवण्यासाठी काम करणार आहे. दळणवळण, औद्योगिक क्षेत्रासाठी, सदृढ आर्थिक विकासासोबतच इतर इंधन वापरामुळे निर्माण होणाऱ्या कार्बनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी देखील लिक्वीड नॅचरल गॅस सहाय्यक आहे.त्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभागाने हा सामंजस्य करार केला आहे.

भवताल

 भवताल कट्टा ५२

विषय :

सडे-पठारांच्या फुलण्याची गोष्ट !

एरवी वैराण-ओसाड वाटणारे, पण पावसाळ्यात कमालीचे फुलणारे भूभाग म्हणजे सडे किंवा पठारे! हे खरे तर महाराष्ट्राला लाभलेले वैभवच. सड्यांवर भरणारा जीवांचा उत्सव, त्यातील विविधतेची उधळण, या जीवांचे जगावेगळे जगणे-वागणे, तिथली खडतर परिस्थिती, पाणी अशा ज्ञान-अज्ञात गोष्टींवर लख्ख प्रकाश टाकणारा कट्टा...

सहभाग :

महाराष्ट्रातील सड्यांचे विविध अभ्यासक

शुक्रवार, १४ ऑक्टोबर २०२२

सायं. ७ ते ८.३०

सहभागासाठी :

झूम लिंक :  

https://bit.ly/3rQlGSo

Meeting ID: 891 4243 2891

Passcode: 339479

किंवा

(भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह)

पेजची लिंक :

https://facebook.com/bhavatal/


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


कन्या लाडाची


 

प्रेरणा

 ✍️

*जीवनात आपला कोणीही कितीही तिरस्कार केला तरी, आपण आपला प्रामाणिकपणा व उत्तम विचार सोडू नये,*

*कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं.*

        *🙏😊 🌹🙏*

बायको च कायको


 

अध्यापकांचे मानधन

 राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. 11 : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल  घेऊन दिवाळीपूर्वी  दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकीत मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी  मिळेल याकडे लक्ष द्यावेअसेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi