Saturday, 8 October 2022

मुंबईतील कोळीवाडे

 मुंबईतील कोळीवाड्यांसाठी सर्वंकष असे विकास मॉडेल तयार करा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिमांकनविकास नियंत्रण नियमावलीसाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याचे निर्देश

कोस्टल रोड – वरळी सी-लींक कनेक्टरबाबत मच्छिमारांसह गोव्याच्या एनआयओची समिती

 

            मुंबईदि. ७ :- कोळी बांधव हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या परंपरागत व्यवसायाची वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणी प्रलंबित राहता कामा नयेत. यासाठी कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकासआणि परंपरागत व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार करावे लागेल. त्यासाठी या कोळीवाड्याचे सर्वंकष असे विकास मॉडेल तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांचे सिमांकन आणि विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) साठी स्थानिकांना विश्वासात घ्या. या दोन्हींसाठी स्वतंत्र समित्या करूनत्यामध्ये स्थानिक तसेच तज्ज्ञांचा समावेश कराअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            कोस्टल रोड रस्ता प्रकल्पात वरळी सी-लींक कनेक्टर संदर्भात कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या ठिकाणी दोन खांबामधील अंतराबाबत गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांची आणि संबंधित तीन मच्छिमार संघटनेच्या अध्यक्षांची संयुक्त समिती नियुक्त करण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. ही समिती त्रयस्थपणे स्थळ पाहणीसर्वेक्षण करून या समस्येचा अभ्यास करूनत्याबाबत तोडगा सुचवणार आहे.

            कोस्टल रोड प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. तरच लाखो लोकांची वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. पण त्याचवेळी कोळी बांधवांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

            मुंबई शहर व उपनगर परिसरातील मूळ गावठाण आणि कोळीवाड्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाखासदार राहुल शेवाळेआमदार सदा सरवणकरमाजी आमदार किरण पावसकरनगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहलअतिरिक्त आयुक्त  अश्विनी भिडेएमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासएमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारपशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैनझोपडपट्टी पुनर्सवन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडेमुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह कोळीवाडा गावठाण सेवा समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहू नयेतअसे प्रयत्न केले जातील. सिमांकन सर्वेक्षण आणि त्याबाबतची अधिसूचना तसेच निवासी - नागरी सुविधांबाबतची विकास नियंत्रण नियमावली याबाबत स्थानिकांना विश्वासात घेतले जावे. प्रत्येक कोळीवाड्याची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे एकच निकष सर्व ठिकाणी लावता येणार नाही. यासाठी स्थानिकांच्या सूचनाशिफारशी विचारात घेतल्या जाव्यात. सिमांकन आणि विकास नियंत्रण नियमावली अभावी अनेक नागरी समस्यांवर उपाय योजना करताना अडचणी येतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींसाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाही केली जावी. सिमांकन सर्वेक्षण निश्चितीसाठी महसूल विभागाने तर विकास नियंत्रण नियमावलीसाठी नगरविकास विभागाने स्थानिकांचा सहभाग घ्यावा. कोळीवाड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय पर्यटन सक्षम असा आहे. जगभरात अनेक ठिकाणी कोळीवाडेमच्छिमारी संदर्भात असे पर्यटन उपक्रम आहेत. त्याच धर्तीवर आपल्या कोळीवाड्यांचा विकास करता येईल. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून पर्यटकांनाही कोळीवाडे पाहण्यासाठी आकर्षित करता येईल, असे पर्यटन धोरण तयार करण्यासाठी सूचना मागवण्यात येतील.

            खासदार श्री. शेवाळे आणि आमदार श्री. सरवणकरतसेच उपस्थित प्रतिनिधींनीही समस्या मांडल्या. यातील काही मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. त्यामध्ये कोळीवाड्यातील कम्युनिटी हॉलकरिता महापालिकेने निवासी दराने कर आकारणी करावी. महापालिकेने मासळी बाजारांचा विकास करताना मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांच्या दृष्टीने त्यांच्या सुविधांबाबत लक्ष पुरवण्याकडे लक्ष द्यावे. बाजार म्हणून निश्चित केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील अन्य ठिकाणीही मासे विक्रीसाठी सुविधा देण्याबाबत धोरण तयार करावे. त्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्यदायी अशा सुविधा उपलब्ध करून देणारे नाविन्यपूर्ण असे मॉडेल तयार करावे. महाराष्ट्र ट्रान्सहार्बर लींक प्रकल्पामुळे बाधित शिवडी येथील कोळी बांधवांच्या नुकसान भरपाईबाबत आणि त्यांच्या व्यवसायाबाबत एमएमआरडीएने स्थानिकांशी समन्वय साधून मार्ग काढावा. मच्छिमारीशी निगडीत अशा सामुदायिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्राच्या विविध योजनांशी सांगड घालावी. पावसाळ्यात मच्छिमारी बंद असते. त्यासाठी अन्य मच्छिमारी चालत असलेल्या राज्यातील  सानुग्रह अनुदान किंवा खावटी अर्थसहाय्य देण्याबाबत योजनेचा अभ्यास करूनतसा प्रस्ताव तयार करावा. वरळी सी-लींक आणि कोस्टल रोड कनेक्टर प्रकल्पातील समस्यांचा अभ्यास करूनआतापासूनच बांद्रा- वर्सोवा सी-लींक प्रकल्पाशी निगडीत पाच कोळीवाड्यातील स्थानिकांशी समन्वय आणि सुसंवाद ठेवावाअसेही निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

०००००

कलाकारांच्याअर्थसहाय्

 कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांच्याअर्थसहाय्यास मुदतवाढ

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. ७ : कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणाऱ्या मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक / निर्माते यांनी एकरकमी विशेष अनुदान पॅकेज मिळविताना सादर करण्याच्या कागदपत्रे व निवड पद्धतीत बदल करण्यात आल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली. याशिवाय समूह लोकपथकांचे मालक / निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवडपद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे.

            पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत परिपत्रक काढले असून हे परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.


शुभ रात्री


अंगात आलाय, उतरवायाची?

 


Friday, 7 October 2022

सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीविषयक लाभ

 महापालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीविषयक लाभ तत्काळ द्या

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या दिवशी 269 अर्ज प्राप्त.

             मुंबई, दि. 7 : महापालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनविषयक लाभ सात दिवसात देण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या दारी' या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. या अभियानाचा प्रारंभ 6 ऑक्टोबरपासून झाला असून 4 नोव्हेंबर, 2022 पर्यंत हे अभियान चालू राहणार आहे.

             कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या दारी' या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            महापालिकेच्या शाळांतून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक दिवस शिक्षकांना सेवानिवृत्ती व इतर देय लाभ मिळत नसल्याची तक्रार आमदार श्री. भातखळकर यांनी मांडली. मंत्री श्री. लोढा यांनी अशी प्रकरणे असल्यास दिरंगाई न करता तत्काळ निकाली काढावीत असे निर्देश दिले. पाणी वेळेत न येणे, कमी दाबाने येणे, स्वच्छता, शौचालयासंबंधी प्रश्न, नादुरूस्त पथदिवे, झोपडपट्टी पुर्नविकास करणे अशा विविध 269 विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले. तर या तक्रारीपैकी 95 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. महापालिकेच्या मैदानावर भरणाऱ्या बचतगटांच्या बाजारांची सवलत तीन ऐवजी सहा दिवस वाढवावी अशी मागणी बचतगटांच्या महिलांकडून करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नी कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.

            दरम्यान सोमवार 10 ऑक्टोबर रोजी आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड - बोरीवली पश्चिम येथे पालकमंत्री श्री. लोढा भेट देणार आहेत. नागरिकांना आपल्या तक्रारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या : https://mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या : portal.mcgm.gov.in संकेतस्थळावरही ऑनलाइन तक्रारी दाखल करता येतील.


*****

दिलखुलास’

 दिलखुलास’ कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक डॉ. विनया जंगले यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 7: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासकपशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले  यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शनिवार दि. 8 ऑक्टोबर आणि सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

            वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासकपशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणअन्नसाखळी यासारख्या विविध विषयांवर दिलखुलास कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. प्राणी संग्रहालयराष्ट्रीय उद्यानअभयारण्ये, वन्यजीव आणि मानवाच्या सहजीवनाबद्दलही त्यांनी माहिती सांगितली आहे.  वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

लम्पी बाधित जनावराचा मृत्यू

 लम्पी बाधित जनावराचा मृत्यू झाल्याससर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

- सचिंद्र प्रताप सिंह

 

            मुंबई, दि. 7 : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा (जनावराचा) मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

            श्री. सिंह म्हणालेपशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी बाधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

            दुसरा निर्णय पशुपालकांना यापुर्वी लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जास्तीत जास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री. सिंह म्हणाले, लम्पी आजाराच्या विषाणूच्या जनुकीय परिक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी (Genome sequencing) आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (National Institute of Virology (NIV) येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती प्राप्त होणार आहे, तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणाकरणानंतरचे ७१४२१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बेंगलुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था (National Institute Of Veterinary Epidemiology And Disease Informatics (NIVEDI) येथे पाठविण्यात येत आहेत.

            शासन अधिसूचना दि. ३०.९.२०२२ अन्वये संक्रमित / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिली असल्याचे श्री.  सिंह यांनी सांगितले.

             राज्यामध्ये दि. ०७.१०.२०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार २६७ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ६३ हजार ०६४ बाधित पशुधनापैकी एकूण ३३ हजार ६७५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 115.18 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून अकोलाजळगांवकोल्हापूरसांगलीवाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्थासहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 82.32 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे. 

0000000

Featured post

Lakshvedhi