Saturday, 8 October 2022

नाशिकच्या अपघातग्रस्त

 काळजी करू नका,घाबरू नकासर्वकाही ठीक होईल

                                      -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नाशिकच्या अपघातग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर आणि विश्वास

 

बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना लाख रुपये मदत

जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार

 

            दि.8,   (जिमाका नाशिक)काळजी करू नका, घाबरू नकासर्वकाही ठीक होईल,” अशा दिलासादायक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला.

            नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खाजगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर काही प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने  शासकीय रूग्णालयात दाखल प्रत्येक जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतलीत्याप्रसंगी  ते बोलत होते. 

            यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसेवैद्यकीय शिक्षण  व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनखासदार हेमंत गोडसे,  आमदार देवयानी फरांदेसुहास कांदेमुफ्ती मोहम्मदनाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटीलजिल्हाधिकारी गंगाथरन डी.नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवारनाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरातउपजिल्हाधिकारी वासंती माळीतहसीलदार रचना पवारवैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवारडॉ.आवेश पलोडआणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

             मुख्यमंत्री म्हणाले कीआज पहाटे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा परिस्थितीत शासन या अपघातग्रस्त प्रवासी व त्यांचे नातेवाईकांच्या सोबत आहे. जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या अपघातात मृत पावलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी केली .

 

ही टीम देतेय उपचार

 

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे यांच्यासह चार अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक. शल्य चिकित्सक डॉ.भामरे यांच्या नियंत्रणाखाली शल्य चिकित्सक डॉक्टरांचे पथकभूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार त्यांच्या नियंत्रणाखाली भूलतज्ज्ञ, 2 न्यायवैदिक तज्ज्ञ, 4 अपघात वैद्यकीय अधिकारी असे एकूण 19 वैद्यकीय पथकासह आपत्कालीन कक्षाच्या सर्व अधिकारीकक्षाच्या मेट्रन व वर्ग चार चे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून एका गंभीर  अवस्थेत असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे.

            या बस अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यूतर चार प्रवासी घरी सुखरुप पोहचले असून व्हिजन हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत. पंचवटीतील सिल्वर हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णसुविधा हॉस्पिटलमध्ये एकजिल्हा रुग्णालयात एकूण 31 जखमी प्रवासी उपचार घेत आहेत. 

००००

 


सर्व काही










 

नेत्र तज्ज्ञ

 जर तुम्ही तुमच्या बायकोला डोळे दाखवू शकत नसाल तर मग आम्हाला दाखवा आम्ही सुचवू 

नेत्र तज्ज्ञ .


😆😆😆😆😆😆

आतुरता


 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा

            पुणे, दि. 8- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट दिली. परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांसह केंद्राची त्यांनी पाहणी केली.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या संवर्गातील 800 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील 37 केंद्रांवर आज पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा प्रक्रियेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पुणे शहरातील डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाळेच्या केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.

            यापूर्वी देखील लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या वेळी अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना तसेच पुण्यातील काही परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली होती.

वडाची,आपट्या ची पाने,

 निर्जीव पान ची पूजा.  काल वडाने,आपट्याला विचारलं,

दुखतंय का रे जास्त..?

तुझ्याही फांद्या, तुझीही पानं,

माणसाने केली ना ध्वस्त...


वर्षातून एक दिवस,

म्हणे आपला असतो मान,

कुणी विचार करतो का,

आपल्यातही असतो प्राण...


त्यांचा उत्सव साजरा होतो,

आपली म्हणे होते पूजा,

त्यांना कुठे कळतेय मित्रा,

आपल्याला होणारी ईजा..


पूर्वी बांधायचे दोर वडाला,

आता फांद्या तोडून नेतात,

लचके तोडून त्याच वडाला,

काय तर म्हणे देव म्हणतात..


गरजेपेक्षा जास्त किती,

तोडतात फांद्या नी पाने,

निर्जीव झालेल्या पानांना,

मग म्हटलं जातं "सोने"


दुसऱ्याच दिवशी सोन्याचा,

फक्त पालापाचोळा होतो,

कालचा देव आज मात्र,

पायदळी तुडवला जातो...


कसली म्हणायची श्रद्धा ही,

कसली रे ही भक्ती,

स्वतःला नी निसर्गाला,

फसवायचीच ही युक्ती...


विरोध नाही आमचा कुठल्या,

चाली रीती प्रथांना,

पण बघवत नाही निसर्गाचा,

ऱ्हास उगा होताना


आपण कधी स्वतःला,

देव म्हणवून घेत नाही,

खूप आहेत दुःख आपली,

पण बोलता येत नाही...


आपण देतोय भरभरून,

त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं,

सण साजरे करावे पण,

आम्हालाही जगू द्यावं...


-एक वृक्ष

हमारी बेटी गाय है


 

Featured post

Lakshvedhi