सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 7 October 2022
दिव्यांग कल्याण ध्वजनिधी
राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी
संकलन मोहिमेचा शुभारंभ
मुंबई, दि. 7 : ‘नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित, बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत आहे. ‘नॅब’ संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.
‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' (नॅब ) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित दिव्यांग कल्याण ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.7) राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
‘नॅब’ संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या विद्यार्थीनी वसतिगृहातील दृष्टीबाधित विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी शासनाकडून मिळत असलेले योगदान संस्थेतील सर्व मुलींना मिळावे तसेच संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या बी. एड. अभ्यासक्रमाला पुनश्च विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळावी, अशी अपेक्षा नॅब महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला नॅब महाराष्ट्रचे मानद सचिव गोपी मयूर, कोषाध्यक्ष विनोद जाजू, दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया, नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते.
००००
Governor launches Flag Fund Collection Drive for Divyang welfare
Mumbai, 7th Oct : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari launched the Flag Day Fund Collection Drive for the welfare of Visually Impaired Divyangs at Raj Bhavan Mumbai on Friday (7 Oct).
The Flag Day programme was organised by the Maharashtra Chapter of the National Association for the Blind, an organisation working for the education, training and rehabilitation of the visually impaired Divyang persons and children.
Applauding the good work done by NAB Maharashtra, the Governor assured that he will take up all pending issues of NAB with the government.
President of NAB Maharashtra Rameshwar Kalantri briefed the Governor about the various problems faced by NAB for the education of visually impaired girls and the training of persons with multiple disabilities.
Honorary General Secretary of NAB Gopi Mayur, treasurer CA Vinod Jaju, Joint Secretary and Divyang entrepreneur Bhavesh Bhatia, Mukteshwar Munshettiwar, Mangala Kalantri and others were present.
0000वन्यजीव सप्ताह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह
प्रदर्शनास भेट
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने ‘वन्यजीव सप्ताह २०२२’ निमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.
वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे तसेच प्रतिकृती (मॉडेल्स)चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी छायाचित्रे आणि त्यातील वन्यजीवांबाबत माहिती घेतली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वन विभागातर्फे 'वन्यप्राण्यांचे संवर्धन हेच पर्यावरणाचे संरक्षण' असा संदेश देणारे वन्यजीव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जंगलातील छोटे शिलेदार वाघांइतकेच महत्त्वाचे’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात छोटे पशू-पक्षी, सरपटणारे वन्यजीव तसेच निसर्गाची विविध रुपं उलगडून दाखवणाऱ्या छायाचित्रांचा तसेच सांबर, चितळ, भेकर, साळींदर अशा वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. त्रिमूर्ती प्रांगणात ताडोबामधील वाघाची कायमस्वरुपी प्रतिकृती आहे. प्रदर्शनातील वाघांसह इतर प्रतिकृतीही मंत्रालय भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
0000
परिणाम
आकाशातील ग्रहांचा आपल्यावर किती परिणाम होतो माहीत नाही..
पण एकमेकांबद्दल करून घेतलेल्या ग्रहांचा आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम होतो..
🙏🌹
संजय गांधी निराधार योजना
संजय गांधी निराधार योजनेसाठी ६२५ कोटी, श्रावणबाळसेवा राज्य निवृत्तीवेतनसाठी
१ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी
सर्व जिल्ह्यांना वितरण
मुंबई, दि.६ : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १ हजार १९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु, पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा रु. १,०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.
माहे सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.५९५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०५३ कोटी निधी खर्च झालेला आहे. या दोन्हीही योजनांमधून लाभार्थींना दरमहा नियमित अनुदान देता यावे, ही बाब विचारात घेऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.६२५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १ हजार १९४ कोटी निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...







