Friday, 7 October 2022

कटू सत्य


 

Motiveaional


 

कसा काय पाटील बर हाय नवं


 

माझ्या गुलाब चा फुला


 

सुप्रभात

 



मातंग समाजाच्या प्रगती

 मातंग समाजाच्या प्रगतीतून आणखी महापुरुष निर्माण होतील

 - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. 6 : सामाजिकआर्थिकदृष्ट्या विकासात मागे राहिलेले अनेक समाज घटक आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मातंग समाजात देखील मोठे परिवर्तन होत असून समाजातून अनेक साहित्यिक व कलासंपन्न लोक पुढे येत आहेत. या समाजाची अशीच प्रगती झाल्यास त्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्यांचे साहित्य जगभर वाचले जाते असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांसारखे महापुरुष निर्माण होतीलअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            मातंग साहित्य परिषदेच्या वतीने राजभवनमुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते साहित्यलोककला व समाजसेवा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना 'मातंग समाजमित्र', 'मातंग समाजरत्नव 'विशेष सन्मानप्रदान करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.

            गेल्या काही वर्षांमध्ये समाजातील मागास घटकांच्या विकासासाठी देशात कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक घरी वीजशौचालय व नळाचे पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मातंग समाजासह सर्व मागास समाज घटकांचा विकास होऊन त्यातून सक्षम नेतृत्व पुढे येईल, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी हभप भगवान बाबा आनंदगडकर व भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांना मातंग समाजमित्र पुरस्कार देण्यात आले. तर साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांना विशेष कार्याकरिता मातंग समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्याबद्दल प्रा. अरुण आंधळेराजन लाखेडॉ.अशोक कांबळेप्रा. ईश्वर नंदापुरेसुनील वारेडॉ. संजय देशपांडेशाहीर नंदेश उमपलोकगायिका राधिका खुडे आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

            यावेळी मंचावर हभप शिवाजीराव मोरेडॉ. रमेश पांडवडॉ. अंबादास सगट व मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे उपस्थित होते.

००००

 


 

Governor Koshyari presents Matang Samaj Ratna Awards, Samaj Mitra Awards

 

      Mumbai Dated 6 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Matang Samaj Ratna, Matang Samaj Mitra and other special mention awards to eminent personalities from the fields of social work, literature and art at Raj Bhavan Mumbai on Thursday (6 Oct). The awards function was organised by the Matang Sahitya Parishad.

Kirtankar Bhagwan Baba Anandgadkar and Chairman of National Commission of Denotified Nomadic Tribal Development Board Dada Idate were given the Matang Samaj Mitra awards, while well known writer Chandrakant Wankhede was presented the Matang Samaj Ratna Award at the hands of the Governor.

The Governor also felicitated Prof Arun Andhale, Rajan Lakhe, Dr Ashok Kamble, Prof Ishwar Nandapure, Sunil Ware, Dr Sanjay Deshpande, Aditya Subhash Kelkar and folk singer Shahir Nandesh Umap, Lok Gayak Chandan Kamble, Radha Khude and others.

Descendent of Sant Tukaram Shivajirao More, Dr Ramesh Pandav, Dr Ambadas Sagat and Chairman of Matang Sahitya Parishad Dr Dhanajay Bhise were present on the dais.

००००


मा tuzhe सलाम

                 शुरा मी वंदिले.                                                          हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एक हाती यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे।


दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात।

आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे। संजूक्ताची आई त्याला सांभाळते।

संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये।

आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वानीच मानाचा मुजरा करायला हवा...... 

Featured post

Lakshvedhi