Sunday, 2 October 2022

लावा खोबरेल तेल आरोग्यासाठी

 *हाता-पायाच्या तळव्यावरखो (कोकोनट) तेल लावा आणि अनेक रोगांपासून मुक्त व्हा*


१. एका सौ.शेट्टी या महिलेने लिहिले की, माझ्या आजोबांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, त्याना पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही ना दात दुःखी नाही. 

माझे आजोबा सांगायचे,ते मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याचा सल्ला दिला होता. आणि हाच तेंव्हापासून आजोबांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत होता. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.


२. मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की, लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती.  जेव्हापासून तो हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याची ही प्रक्रिया सुरू ठेवली, तेव्हा १ महिन्यानंतर माझ्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे नियमित झाला. 


३.  उडुपी येथील एक व्यापारी गृहस्थ श्री. कामथ सुट्टीसाठी केरळला गेले असता, तिथल्या हॉटेलमध्ये ते झोपू शकले नाही. म्हणून बाहेर चालू लागले.   तेव्हा रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकऱ्याने विचारले, "काय झाले आहे, असे का भटकता?" 

ते म्हणाले "मला झोप येत नाही!"  

तो हसला आणि म्हणाला, "तुमचा कडे नारळ तेल आहे का?"  

मी म्हणालो "हो". 

तो म्हणाला, "मग त्याने आपल्या हाता-पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा, शांत झोप येईल." 

आता श्री कामथ स्वस्थ आणि सामान्य आहेत.


४. रात्री झोपण्यापूर्वी हाता-पायाना नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .


५. पोटाचा त्रास- हाता-पायाच्या तळांवर नारळाच्या तेलाने मालिश केल्यानंतर पोटाचा त्रास 2 दिवसात बरे होते.


६. लहान मुलांच्या पायाच्या तळव्यांवर नारळ तेलाने मालिश देखील केल्यास, त्यांना खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.


७. पाय दुखणे/मुंग्या येणे- रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांची मालिश करण्यास सुरवात करावे.  या प्रक्रियेमुळे पायांच्या दुखण्यापासून व मुंग्या येणे यापासून बराच आराम मिळातो.


८. पाय नेहमी सुजलेले आणि चालत असताना थकवा येत असेल, तर,  रात्री झोपायला जाण्यापूर्वी पायांच्या तळांवर नारळ तेलाने मालिशची ही प्रक्रिया सुरू करावी. फक्त दोन दिवसातच, पायांची सूज अदृश्य होते.


९. पायाला जळजळ होत असल्यास आपल्या  हाता-पायाचा तळव्यांवर नारळाचे तेल लावायला सुरुवात करा. आठव्या दिवसापासून वेदना कमी होतील आणि परत जळजळ कधीच होणार नाही.


१०. थायरॉईड रोगाने पाय सर्व वेळ दुखत असल्यास झोपायच्या आधी पायाच्या तळांवर नारळ तेलाची मालिश करा आणि स्वस्थ व्हा.


११. पायाला फोड असल्यास रात्री झोपायच्या आधी चार दिवस नारळ तेलाने पायातील तळांची मालिश करावे. बराच मोठा फरक दिसेल.


१२. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने झोपेत घोरणे प्रतिबंधित करते.


१३. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने गुडघ्यात वेदना कमी होतात.  


१४. रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेलाची हाता-पायाचा तळव्यावरील मालिश  या पद्धतीने पाठीचा, मणक्याचा त्रास कमी होतो.


दक्षिण भारतीय रहस्य खालीलप्रमाणे आहेः


एकमात्र रहस्य आणि प्रत्येकासाठी खूप सोपे, आहे.

झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.


प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.

ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात. याला - *फूट रिफ्लेक्सोलॉजी*

असं म्हणतात.  ही फुट मालिश थेरपी संपूर्ण जगभरात वापरली जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक* 

*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*


(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)


*संजीवनी आर्टलाईफ वेलनेस सेंटरला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 


https://sanjeevani-artlife-wellness.business.site

आरोग्य शिबिर

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्विवि धान भवनात अभिवादन

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचा शुभारंभ

 

 

         मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आलीयाप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राह नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार  गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवतउप सचिव विलास आठवलेसंचालकवि..पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारीनिलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी  कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

            भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यांचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधानमंडळ सचिवालयात आरोग्य तपासणी  मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेविधानसभा अध्यक्ष यांनी दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन केलेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी  कर्मचारी कल्याण केंद्रामार्फत स्माआरोग्य हेल्थकेअर संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहेयावेळी प्रधान सचिवराजेंन्द्र भागवतकल्याण केंद्राचे सरचिटणीसमनिष पाटीलराजपत्रित अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्षअजय अग्रवालस्माआरोग्याचे संचालक अरुण रामचंद्रडॉ.सुजाता अरुण यावेळी उपस्थित होतेउपसचिव विलास आठवले.वि.यांनी प्रथम तपासणी केलीविधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांनी सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि "उत्तम कार्यक्षमतेसाठी उत्तम आरोग्याची उपासना करावी," असे आवाहन केले.

 

सायकल रॅली




 

पर्यावरण जागृती सायकल

 गांधी जयंती : मुंबई - देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

 

            मुंबई दि.2 'प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे' ('प्रगति से प्रकृति तक') या मुंबई ते देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी राजभवन मुंबई येथून झेंडी दाखवून रवाना केले. 

            67- वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ अनिल प्रकाश जोशी या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहे. राज्यपालांच्या हस्ते रॅलीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले, तसेच सहभागी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.  

            सायकल यात्रेच्या आरंभ प्रसंगी अभिनेत्री हिमानी शिवपुरीअभिनेते हेमंत पांडेइंडियन आयडॉल विजेते गायक पवनदीप राजनउद्योजक अनंत सिंघानियाराज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अब्राहम मथाई आदी उपस्थित होते. 

            पर्यावरण तज्ज्ञांच्या मते आज जग ज्वालामुखीवर उभे आहे. भारतीय तत्वज्ञानात निसर्गाच्या पाच तत्वांचा समतोल साधण्यावर भर दिला आहे. प्रत्येक शांतीमंत्रांमध्ये पृथ्वीवनस्पती इत्यादी तत्वांच्या   शांतीचा विचार मांडला आहे. विकास साधताना पर्यावरणाचा समतोल साधला गेल्यास शाश्वत विकास साधता येईल असे राज्यपालांनी सांगितले. पर्यावरण तज्ज्ञ डॉ अनिल जोशी यांची यात्रा समुद्राकडून हिमालयाकडे अशी उन्नत मार्गाने जाणार असून त्यातून जनजागृती होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. 

            'प्रगतीकडून पर्यावरणाकडेया सायकल यात्रेचा आरंभ देशातील सर्वात प्रगतिशील शहर असलेल्या मुंबई येथे होत असून देशाची पर्यावरण राजधानी असलेल्या उत्तराखंड येथे तिचा समारोप होणार आहेअसे डॉ अनिल जोशी यांनी सांगितले. दरवर्षी जगात नवनवी विध्वंसक वादळे निर्माण होत आहेत. मनुष्याला विकास हवा आहेरस्ते देखील हवे आहेत. अश्यावेळी विकास साधताना पर्यावरणाकडे नव्या दृष्टीने पाहावे लागेल असे डॉ अनिल जोशी यांनी सांगितले. 

            कोविड सारख्या जागतिक आपत्तीच्या मुळाशी कोठेतरी निसर्गाप्रती माणसाचे चुकीचे वर्तन कारणीभूत आहे असे त्यांनी सांगितले.  भावी पिढ्यांसाठी आपण घरे  बांधीत आहोतआर्थिक तरतूद करीत आहोतपरंतु मूलभूत गरजा असलेल्या पाणीजमीनहवाजंगल याचा विचार करीत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.  भारतात पृथ्वीजलअग्नी यांची पूजा केली जाते त्यामुळे भारतच जगाला पर्यावरण रक्षणाचा विचार देऊ शकतो असे त्यांनी  सांगितले. सकल घरगुती उत्पन्न  (GDP) या ऐवजी सकल पर्यावरण उत्पन्न (GEP) या माध्यमातून विकास मोजला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

            सायकल यात्रेमध्ये 15 युवक युवती सहभागी झाले असून ही यात्रा ४० दिवसांमध्ये दहा हजार लोकांशी संपर्क साधेल व एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देत २००० किमी अंतर पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.  


अजबच

 दि 26.09 .022 ला पाथर्डी ता. तेल्हारा .जिल्हा अकोला येथे घट स्थापना करताना आरती चालू झाली असता.देवी माता रेणुका आई देवीची चूनारी व्यवस्थित बसलेली नव्हती ती व्यवस्थित करण्यासाठी खुद्द नागराज सर्व भक्त मंडळीच्या उपस्थितीत आले व देविमातेची चुनारी व्यवस्थित करून शांतपणे निघून गेले..या गोष्टीचे सर्व भक्त कौतुक करत आहे


बायको बायको,

 बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत , सर्व बायकांचे   डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!

😆 *लक्ष देऊन वाचा*😆

  भातात पाणी जास्त झाल्यास...

              *तांदूळ नवीन होता,*

  चपात्या कडक झाल्यास...

              *मेल्याने चांगले दळून दिले नाही,*

  चहा गोड झाल्यास...

               *साखर जाड होती*

  व तो पातळ झाल्यास...

               *दुधात पाणी जास्त होतं,*

  लग्नाला किंवा  फंक्शनला  जाताना...

    *-कुठली साडी नेसू?* 

               *मला चांगली साडीच नाही!*

  घरी लवकर आल्यास... 

               *आज लवकर कसा आलात?*

  उशीर झाल्यास.... 

               *इतका वेळ कुठे होतात?*

  एखादी वस्तू स्वस्त आणल्यास... 

               *तुम्हाला सगळे फसवतात...* 

  महाग आणल्यास... 

               *तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?* 

 *जेवणाचं कौतुक केल्यास...* 

                *मी दररोजच करते.*

  नावं ठेवल्यास...

 

                *तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं...*

  एखाद काम केल्यास... 

                *एक काम कधी धड करत नाही...*

  ते न केल्यास... 

              *तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...*

 आणि शेवटच 

*मी आहे म्हणून टिकले नाहीतर दूसरी असती तर पळून गेली असती* .🤭🤭

          स्वत: ची काळजी घ्या, 

 

          शांत रहाण्याचा प्रयत्न करा.🤫🤫

 

          *भिऊ नका*  


*बायको  तुमच्या पाठिशी आहे..*.🤣🤣🤣

काय पण नवरे बोलतात


 

Featured post

Lakshvedhi