Tuesday, 27 September 2022

कालिदास उवाच

 *कालिदासांना* ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक *वृद्ध स्त्री* विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली. 


कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे. 


वृद्ध स्त्री म्हणाली *प्रवासी तर फक्त दोनच आहेत* एक चंद्र 🌕आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात. 


कालिदास म्हणाले मी  *अतिथी* आहे. पाणी मिळेल ? 


वृद्ध स्त्री म्हणाली अरे *अतिथी तर फक्त दोनच* आहेत एक *धन* आणि दुसर *तारुण्य* ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ? 


कालिदास म्हणाले मी *सहनशील* आहे. आता तरी पाणी मिळेल ? 


वृद्ध स्त्री म्हणाली, 'अरे सहनशील तर तर *फक्त दोनच* आहेत ! एक *धरती* 🌍आणि दुसरं *झाडं* 🌵धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील *ओझं* घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती *मधुर फळच* देतात.


*कालिदास आता हतबल झाले,*      


कालिदास म्हणाले *मी हट्टी आहे.* 


वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, *हट्टी तर फक्त दोनच* आहेत *एक नख*💅🏻ं आणि *दुसरे केस*, कितीही *कापले* तरी परत वाढतातच. 


कालिदास आता कंटाळले  आणि  


*कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे*. 


वृद्ध स्त्री म्हणाली *मूर्ख तर  फक्त दोनच* आहेत एक *राजा* ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा *दरबारातील पंडित* जो त्या राजाला रिझवण्यासाठी *चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.* 


कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. 


वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एेकून कालिदासांनी वर पाहिलं तर त्या *स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी* उभी होती, कालिदास आता *नतमस्तक*🙏👏👏 झाले. 


सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, *शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही.* 


*शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला.* तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 


*तात्पर्य:* विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. वाचनात आलेला हा एक सुंदर लेख ! लिहिणाऱ्याचे आभार.🙏🙏


*एक सत्य*

 😊😊😊


    *८४ लाख जीवांमध्ये फक्त*  *माणूस पैसे कमावतो* *पण कुठलाच जीव उपाशी रहात* *नाही आणि माणुस पॆसे* कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही

निवडनूक लोकजागर

 लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धेत सहभागी व्हाबक्षिसे मिळवा

                  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

            मुंबईदि. 27 : लोकगितांमधून समाजाला आवाहन करण्याची ताकद लक्षात घेऊन लोकशाहीमताधिकार यात त्याचा पुरेपूर वापर व्हावायासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यातील नागरिकांनी एकल किंवा समूह गटाने सहभागी व्हावेअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

            ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.  या  स्पर्धेत मतदार यादीत नाव नोंदवणे आणि मताधिकार बजावणेमतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणेमृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणेविविध घटकांना (दिव्यांगतृतीयपंथीज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधाहे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावतानाजातधर्मपंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणेपैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणेयांसारख्या विषयांवर गीतरचना करून लोकशाहीसंबधी जागृती करता येईल.

            स्त्रियांच्या गीतात सासर-माहेरचे उल्लेख असतात. लोकगीतांमधले माहेर गोड असतेजिथे खायाला मिळते तर सासर द्वाड असतेजे कोंडून मारते. सासर-माहेरच्या जागी लोकशाही-हुकूमशाही यांची प्रतिकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. लोकगीतांच्या अंगभूत लवचीक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचे मानस गुंफणेही सहज शक्य आहे. आणि हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसे व्हावेहे सांगता येईल. लोकगीतांतील स्त्रीपेक्षा आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहेनिर्णयक्षम आहेहे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयानेलोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावाअसे लोकगीतातून आवाहन करता येईल.

            समूह आणि एकल गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक रकमांची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. समूह गटासाठी प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपयेद्वितीय क्रमांक अकरा हजार रुपयेतृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. तर एकल गटासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपयेद्वितीय क्रमांक पाच हजार रुपयेतृतीय क्रमांक तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. स्पर्धेची अधिक माहिती व नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/LokshahiJagar-Rules-2022.pdf  या लिंकवर उपलब्ध आहे.

निळवंडे प्रकल्प

 निळवंडे प्रकल्पाला लवकरचसुधारित प्रशासकीय मान्यता देणार.

                              - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

 

            मुंबईदि. 27: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईलअसे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे सांगितले.

             उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज निळवंडेकुकडी सिंचन प्रकल्प आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी  या सूचना दिल्या.

            बैठकीस खासदार सुजय विखे पाटीलखासदार सदाशिव लोखंडेआमदार बबनराव पाचपुतेआमदार शिवाजीराव कर्डिले जलसंपदा विभागाचे (लाक्षेवि) सचिव राजन शहासचिव ( प्रकल्प समन्वय) विलास राजपूत आदी उपस्थित होते.

            निळवंडे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावाअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या.

            निळवंडे प्रकल्पाचा प्रस्तावित सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी तांत्रिक समितीकडे सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरात लवकर मान्यता दिली जाईलअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            निळवंडे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील वितरण प्रणालीचे काम बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे प्रस्तावित आहे. मात्र राहुरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहेअसे बैठकीत सांगण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली जाईलअसे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            गोदावरी कालवा प्रकल्पांच्या उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी, कुकडी सिंचन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता द्यावी. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी समावेश करण्यात यावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

            बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोलेनाशिक विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरेपुणे विभाग मुख्य अभियंता हणमंत धुमाळ उपस्थित होते.

 

तक्रार कशी करायची

 RB-एकत्रित लोकपाल योजनेच्या अंतर्गत https://cms.rbi.org.in वर  कोणत्याही बँक, एनबीएफसी किंवा पेमेंट व्यवस्थेच्या सहभागींविरुद्ध तक्रार नोंदवा.  अधिक माहितीसाठी 14440 वर कॉल करा तक्रार नोडणावा

जय हो




 

सूकन्या


 दिलीप सलावकर नात यदनी 

वो man see


 

Featured post

Lakshvedhi