सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 26 September 2022
लोक सहभाग
राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानात
नागरिक, स्वयंसेवी संस्था व पर्यटन प्रेमींनी सहभागी व्हावे
-पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि.25 : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गेट-वे ऑफ इंडिया येथे उद्या दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 3.00 ते सायं.6.00 या वेळेत होणाऱ्या स्वच्छता अभियानात नागरिक, स्वयंसेवी संस्था व पर्यटनप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
27 सप्टेंबर, 2022 या दिवशी जागतिक पर्यटन दिन जगभरात साजरा केला जातो. पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन मंत्री, मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुप्रसिद्ध असणाऱ्या मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन विभाग व दिव्याज फाऊंडेशन यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे.
या अभियानात श्रीमती अमृता फडणवीस, दिव्याज फाउंडेशनचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
00000
Sunday, 25 September 2022
बदल गरजेचा आहे.
🌀🌀🌀🌀💥🌀🏵🌀💥🌀🌀🌀🌀
*🔸तृप्त पितर...!🔸*
*"हॅलो बाबा.. विकास बोलतोय.. आज रात्री ८ वाजता तुम्ही आणि आई तयार राहा.. आपण बाहेर जातोय आज जेवायला. मी ऑफिस मधून निघताना तुम्हाला कॉल करतो.. दोघेही तयार राहा.."-विकासने फोन ठेवला.*
*पण विकासाच्या बाबांच्या लक्षात येईना की, आज अचानक हा बाहेर जेवायला जायचा बेत विकासने काय म्हणून ठरवला असेल ? विकासचे आई बाबा दोघेही त्यांनी सांगितलेल्या वेळेला तयार होतेच. विकासने त्या दोघांनाही पिक-अप केलं, आणि एका आलिशान हॉटेल मध्ये घेऊन गेला.*
*"आई.. बाबा.. आज तुम्ही तुमच्या आवडीचं जे काही हवं ते मागवायचं.. आणि हो.. किमतीचा "कॉलम" अजिबात बघायचा नाही.. एवढे वर्ष खूप मन मारलंत.. आज मात्र तसं अजिबात चालणार नाही.. बिन्धास तुम्हाला जे हवं ते मागवा... आई तू पण ग.." विकास बोलत होता..*
*"अरे पण काय झालंय काय अचानक... काय प्रमोशन वगैरे झालंय का ? आज राजा एवढा उदार का बरं झालाय ?" - विकासाच्या आईला देखील कळेना आज नक्की काय झालंय काय.*
*"ते नंतर सांगतो.. घरी गेल्यावर.. आता फक्त जेवण.. तुमच्या आवडीचं .. नंतर बाबाना आवडतं ते खास कोकोनट आईस्क्रीम.." विकास भलताच खुशीत होता हे उघड होतं.. जेवणं झाली... आईस्क्रीम झालं.. मंडळी घरी आली.. हात पाय तोंड धुवून तिघेही एकत्र बसले.. विकास आता त्याच्या खुशीत असण्याचं नेमकं कारण सांगणार होता.*
*"आई बाबा.. आता सांगतो की, मी तुम्हाला आज बाहेर का घेऊन गेलो ते.. त्याचं झालं असं की, मागच्या महिन्यात, ऐन गणपती यायच्या आधी, माझ्या एका मित्राचे वडील गेले.. हार्ट अटॅक ने.. हा माझा मित्र त्याच्या वडिलांशी तसं फार काही चांगले संबंध ठेवून नव्हता.. आता मला म्हणतो कसा.. की, 'वडील गेले.. आता पितृ पक्ष चालू झालाय.. वडिलांच्या नावचं 'पान' ठेवतो..'*
*तेव्हा माझ्या मनात आलं, वडील जिवंत असताना कधी हा माझा मित्र त्यांच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलला नाही.. त्यांना काय हवं नको कधी विचारलं नाही.. कधी प्रेमाने त्यांची चौकशी केली नाही.. आज बाप मेल्यावर त्यांच्या नावाने हा पान वाढायचा फार्स कशासाठी मग ?*
*त्यांच्या नावाने आता देवळं-मंदिरांमध्ये देणग्या देत फिरतोय.. तुम्हाला माहित आहे की, मला ह्या असल्या कुठल्याही गोष्टी कधीच पटल्या नाहीत.. कावळ्याने चोच लावल्यावर आत्मा तृप्त झाला म्हणे.. आपल्या पोराने आपल्याशी चार प्रेमाचे शब्द बोलावेत ह्यासाठी जो बाप आसुसत होता.. तो आता कावळ्याच्या एका चोच लावल्याने तृप्त कसा काय होणारे ?*
*आज मला हे जाणवलं की, घरात आई-वडील दोघेही ठणठणीत असणं हीच मुळात किती आनंदाची गोष्ट आहे.. आई.. बाबा.. तुम्ही जोपर्यंत आहात माझ्या आयुष्यात तो पर्यंत सगळी मजा आहे हो.. तुमच्या पश्चात मी कावळ्याला पान वाढणं वगैरे हे असले काहीही प्रकार करणार नाहीये.. पण आज तुम्ही दोघेही ठणठणीत आहात.. तुम्हाला खाण्या-पिण्याचं कसलंही बंधन सुदैवाने नाहीये.. म्हणून आज तुम्हाला मी जेवायला घेऊन गेलो.. आई-वडील दोघेही त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवतात हाच माझ्यासाठी "पितृपक्ष" आहे..."*
*विकास बोलायचा थांबला.. तो कमालीचा गहिवरला होता.. अर्थात विकासाचे आई-बाबांना सुद्धा कमालीचं भरून आलं होतं..*
*विकासने आई-बाबांना घट्ट मिठी मारली... आपला मुलगा आता खऱ्या अर्थाने मोठा झाला, ह्याचा आनंद आई-बाबांसाठी काही वेगळाच असतो नाही ? विकासाचे सगळे पितर मात्र, आज खऱ्या अर्थाने तृप्त झाले होते.*
🌀🌀🌀🌀💥🌀🏵🌀💥🌀🌀🌀🌀
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...









