Friday, 23 September 2022

Stree जन्मा तुझी कहाणी

 *स्त्रीबद्दल मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट पोस्टपैकी ही एक. कृपया पूर्ण वाचा. अतिशय मौल्यवान आहे.*

   *स्त्री*.  .  .  .  .  .  .  .  .

जेव्हा विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार स्त्री निर्माण करावयास घेतली, तेव्हा त्याने निगुतीने, शांतपणे काम करायला सुरूवात केली.

ब्रह्मदेवाने विचारले,"स्त्री निर्मितीसाठी एवढा वेळ कां लागतो आहे?"

विश्वकर्म्याने उत्तर दिले.  "तिची रचना करण्यासाठी मला पूर्ण करावे लागणारे सर्व तपशील तुम्हाला निवेदन करतो."

   ● तिने सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये कार्य केले पाहिजे.

   ● ती एकाच वेळी अनेक मुले सांभाळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

    ● तिने आलिंगन दिले कीं दुखापत झालेल्या गुडघ्यापासून तुटलेल्या हृदयापर्यंत काहीही बरे करू व्हायला पाहिजे.

    ● तिने हे सर्व फक्त दोन हातांनी केले पाहिजे.

   ● ती आजारी असताना स्वत:चे स्वतःला बरे करू शकली पाहिजे. तसेच दिवसाचे १८ तास काम करू शकली पाहिजे.

   ब्रह्मदेव प्रभावित झाले. "फक्त दोन हातांनी हे सर्व करणे ...अशक्य आहे !

   ब्रह्मदेवानी जवळ जाऊन त्या स्त्रीला स्पर्श केला.

 " तू तिला खूप मऊ केले आहेस."

   विश्वकर्मा वदले "ती मऊ आहे, पण मी तिला मजबूत बनवले आहे.  ती काय सहन करू शकते आणि त्यावर कशी मात करू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही"

   "ती विचार करू शकते का?"  देवाने विचारले...

   विश्वकर्मा  उत्तरले "ती नुसता विचार करू शकत नाही, तर ती तर्क करू शकते आणि वाटाघाटीही करू शकते."

   देवाने तिच्या गालाला स्पर्श केला....

   "हा भाग गळतोय असं वाटतंय! तू या भागावर खूप ओझं टाकलं आहेस."

"ती गळत नाहीये...

ते डोळ्यातील अश्रू आहेत."  

विश्वकर्माने देवाला सांगितले ...

"ते अश्रू आणि कशासाठी?" 

देवाने विचारले......

विश्वकर्मा म्हणाले

"अश्रू हे, तिचे दु:ख, तिच्या शंका, तिचं प्रेम, तिचा आनंद, तिचं एकटेपण आणि तिचा अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे."  ...

त्याचा देवावर चांगलाच प्रभाव पडला,

"विश्वकर्मा, तू अतिशय प्रतिभावान आहेस. तू सर्व गोष्टींचा विचार केला आहेस.*खरोखर अद्भुत घडण आहे ही एक स्त्री."*

   ■ तिच्यात पुरुषाला चकित करण्याची ताकद आहे.

   ■ ती संकटे हाताळू शकते आणि जड भार वाहून नेऊ शकते.

   ■ तिला आनंद, प्रेम आणि मते आहेत.

   ■ जेव्हा तिला किंचाळावेसे वाटते तेव्हा ती हसते.

   ■ जेव्हा तिला रडावेसे वाटते, तेव्हा ती गाते, जेव्हा ती आनंदी असते तेव्हा रडते आणि जेव्हा ती घाबरते तेव्हा हसते.

   ■ ती ज्यावर विश्वास ठेवते त्यासाठी ती लढते.

   ■ तिचे प्रेम बिनशर्त आहे.

   ■ "एखादा नातेवाईक किंवा परिचित मरण पावल्यावर तिचे हृदय तुटते, परंतु तिला जगण्याची ताकदही मिळते."

   देवाने विचारले: 

"तर मग ती एक परिपूर्ण प्राणी आहे?"

विश्वकर्माने उत्तर दिले: 

*"नाही. यात फक्त एकच त्रुटी आहे. तिचे महत्व किती आणि ती किती मौल्यवान आहे हे ती अनेकदा विसरते."*

   तुम्ही ज्या महिलांचा आदर करता त्यांना पाठवा आणि त्या सर्व पुरुषांना जे स्त्रीचा आदर करतात 

   *स्त्री अनमोल आहे* 💃

*तिला स्वतःचा अभिमान वाटावा यासाठी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला हे कळू द्या.*

विकास कर्ज

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2030 अंतर्गत

2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

 

            मुंबईदि. 22  :  राज्य शासनाने 8 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

        रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय राज्यघटनेनुसार सदरील कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी घेण्यात आली आहे.

            दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येतील. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                      

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 27 सप्टेंबर2022 रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 27 सप्टेंबर2022 रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्युशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत.

            अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 28 सप्टेंबर2022 रोजी करण्यात येईल.

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 28 सप्टेंबर2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी 8 वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी हा दि. 28 सप्टेंबर, 2022 पासून सुरु होईल. दि. 28 सप्टेंबर2030 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या प्रतिवर्षी दिनांक 28 मार्च आणि 28 सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाच्या 22 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

००००

विक्रीकर अभय

 विक्रीकराची अभययोजना अंतिम टप्यातः

राज्यभरातून लाभला अभूतपूर्व प्रतिसाद

 

            मुंबई, दि. 23 : शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या विक्रीकराची अभय योजना 2022 ला संपूर्ण राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत आहे. 22 सप्टेंबर 2022 ला विभागाकडे थकबाकी प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांपैकी जवळपास 50%म्हणजे 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना या अभय योजनेचा लाभ झाला आहे.

            1 एप्रिल 2022 पासून ही योजना सुरु झाली असून जीएसटी पूर्व कायद्यांच्या थकबाकीतून कायमचे बाहेर पडण्याची शेवटची नामी संधी, असे या योजनेचे वर्णन केले जात आहे. आतापर्यंतच्या प्रतिसादावरून ही योजना सर्वात आकर्षक आणि व्यापारी वर्गासाठी सर्वात जास्त फायदेशीर अभय योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छोट्या व्यापाऱ्यांकरिता आकर्षक सवलती

            या योजनेत छोटे व्यापारी विशेषतः ज्यांची थकबाकी दहा हजारापर्यंत आहे, त्यांना अर्ज देखील दाखल न करता पूर्ण थकबाकी माफ करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेची वैशिष्ठ्य ठरलेली व कमालीची लाभलेली वर्गवारी म्हणजे दहा हजार ते दहा लाखापर्यंतची प्रलंबित थकबाकी. या वर्गवारीतच विभागाकडे सर्वाधिक प्रलंबित प्रकरणेदेखील आहेत. या वर्गवारीत एकरकमी फक्त वीस टक्के थकबाकी भरून ऐंशी टक्के थकबाकी सरसकट माफ केली जात असल्यानेअधिकाधिक व्यापाऱ्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन प्रलंबित थकबाकीतून कायमची मुक्तता मिळवलेली आहे.

            मोठ्या म्हणजेच 50 लाखांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी हप्तेसवलती सारखा सोयीचा पर्याय उपलब्ध असल्यानेअशा मोठ्या प्रलंबित थकबाकीकरिता देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

व्यापारातील अनेक प्रश्नांना एकच उत्तर: अभय योजना 2022

            अपिलातील प्रलंबित थकबाकीचा पाठपुरावा करण्यात सर्वसामान्य व्यावसायिकाचा व्यवसायातील बहुमूल्य वेळ व पैसा नाहक खर्च होत असतो. थकबाकीला स्थगिती नसेल तर स्थावर व जंगम मालमत्ता लिलावात निघण्याची टांगती तलवार सतत डोक्यावर असते. तशातच कोरोना टाळेबंदीमुळे व्यापारावरील अनिष्ट परिणाम व ढासळलेले अर्थगणित. त्यामुळे व्यापारी वर्गाने या नामी संधीचे जोरदार स्वागत केले आहे.

            त्यामुळे अपिलात होणारा वेळेचा व पैशाचा अपव्यय तसेच विभागाकडून होणारी वसुलीची कार्यवाही टाळण्यासाठी अभय योजनेत सहभागी होऊन जीएसटी कारकिर्दीत व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यावर अनेकांनी भर दिल्याचे या योजनेच्या प्रतिसादावरून दिसून आले आहे.

            अगदी 1970 सालापासूनच्या सुद्धा प्रलंबित थकबाकीसाठी या योजनेत अर्ज सादर केले गेले आहेत, हे विशेष. त्याचप्रमाणे विक्रीकर न्यायाधिकरण अथवा उच्च न्यायालयातील देखील प्रलंबित दावे मागे घेत अनेकांनी या योजनेचा लाभ घेणे पसंत केले आहे. सर्व वर्गातून लाभत असलेल्या या प्रतिसादावरून ही योजना व्यापारीभिमुख आहे व या योजनेत यापूर्वीच्या सर्व अभय योजनांचे विक्रम मोडले जातील हे सुस्पष्ट आहे.

            सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे ही अभय योजना 30 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे योजनेच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित थकबाकीदारांपैकी अधिकाधिक व्यापारी बंधूनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीएसटी विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्राणी दिन

 जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर

विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबवावे

जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 23 : प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी दिल्या.

            मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची जागतिक प्राणी दिन साजरा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

            श्री. निवतकर म्हणालेकाही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी विविध कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. लहान - मोठ्यापाळीव - भटक्या अशा सर्व प्राणीमात्रांचा यामध्ये समावेश होतो. आपणही जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना चित्र स्वरूपात सादरीकरण करून जागृत करावे. सोसायटीच्या सर्व सदस्यांचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

            पोलीसपशुसंवर्धन विभाग तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती या सर्वांनी एकत्रित समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागात मार्गदर्शिका तयार करावी. यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा. तसेच याबाबत प्रशिक्षण घ्यावे. प्राणी लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            यावेळी विविध भाषेतील चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश पेठेमुंबई पशुवैद्यकीय महाव्यवस्थापक डॉ. क.अ.पठाणमुंबई शिक्षण विभागाचे राजेंद्र पाटील निसार खान विनोद कदम शुभांगी बेटे यांची यावेळी उपस्थिती होती.

Wine विक्री

 सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

            मुंबई दि.२३: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

            २२ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत काही माध्यम प्रतिनिधींनी सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाबाबत प्रश्न विचारला असता याबाबत मागील सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन केले होते. यामध्ये सदर निर्णयांच्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव हा राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनतेसमोर ठेवला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असे निवेदन केले होते. मात्र काही माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करून वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केट मधील वाईन धोरणांच्या बाजूने असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.असा कोणताही निर्णय झालेला नसून निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासांती निर्णय घेईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.



उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण..!!

 सोर्स #अजिंठा 

उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण..!!

खालील थ्रेड हा सत्य घटनांवर आधारित आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी 'इल्लूस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'च्या संपादकाला पुढील घटनांबद्दल सांगितलेले आहे.

दररोज सकाळी बिस्मिल्लाह खान यांचे मामा अली बक्ष हे शेजारी असलेल्या जडौ श्री बालाजी म्हणजेच महा-विष्णु मंदिरात जात होते. त्यावेळी त्यांना दिवसभर शहनाई वाजवल्यानंतर महिन्याला चार रुपये मिळायचे. बिस्मिल्लाह सुद्धा कधी-कधी सकाळी त्यांच्या मागे जायचे, त्यांचे संगीत ऐकायचे, मोहित व्हायचे आणि गोंधळून जायचे.

मामा आणि भाचे हे दोघे सकाळच्या सत्रातील काम पूर्ण झाल्यानंतर जडौ मंदिरातील बालाजी मंदिरात जायचे. तेथे अली बक्ष यांच्यासाठी एक खोली नेमून दिली होती. दिवसभर जवळपास पाच तास ते तिथे सराव करित असे आणि ज्यावेळी अली बक्ष यांचा सराव संपायचा त्यावेळी त्यांना दिसायचं की, बिस्मिल्लाह हे त्यांच्यासमोर बसलेले आहेत आणि एका भुकेल्यासारखे ऐकताहेत.

बिस्मिल्लाहनी कधीही आपल्या मामांना त्रास दिला नाही. परंतु बिस्मिल्लाह नेहमी गोंधळून जायचे की, त्यांचे मामा हे बालाजी मंदिराच्या खोलीत सराव करण्यासाठी का जातात? कारण तोच सराव ते घरी सुद्धा करू शकतात आणि त्यांना कोणीही त्रास सुद्धा देणार नाही. याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना नेहमीच असायची आणि एकेदिवशी न राहवून त्यांनी मामांना याबद्दल विचारले.

मामांनी आपल्या कुलपावर शेवटचा हात मारला आणि उत्तर दिले, ''एकदिवस तुम्हाला ते नक्की कळेल.'' बिस्मिल्लाहने पटकन विचारले, ''पण मामू मी शहनाई कधी वाजवणार ?'' आणि मामू म्हणाले, ''कधी वाजवणार? ही काय विचारायची गोष्ट आहे का? तू आजपासूनच सुरुवात करीत आहेस."

लगेच मामा अली यांनी त्या संध्याकाळी बिस्मिल्लाह यांना जडौ महाविष्णू मंदिरात घेऊन गेले आणि त्यानंतर बालाजी मंदिराच्या 'त्या' खोलीत घेऊन गेले ज्या खोलीत त्यांनी रात्रीच्या शहनाई वादनानंतर जवळजवळ 18 वर्षे सराव केला होता. शेवटी मामू अली यांनी बिस्मिल्लाह खान यांना तिथे सराव करण्याची परवानगी दिली. ती परवानगी देत असताना मामू अली यांनी त्यांना एक 'ताकीद' दिली की, या मंदिरात जर तुला काही वेगळा अनुभव आला किंवा काही वेगळे दिसले? तर कोणाला काहीही सांगायचे नाही.

बिस्मिल्लाह खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्या खोलीत चार ते सहा तास सराव केला, चार भिंतीच्या बाहेर होणार्‍या बदलांकडे दुर्लक्ष करून त्यांनी संगीताच्या सुर-तालाची नवीन उंची आणि खोली शोधून काढली, आपले संगीत सुधारण्याच्या इच्छेने बिस्मिल्लाह यांना झपाटून टाकले होते.

एकेदिवशी बिस्मिल्लाह खान हे पहाटे चारच्या सुमारास बालाजी मंदिराच्या आवारात एकटेच होते आणि ते त्यांच्या शहनाईच्या सरावात मग्न होते. त्यावेळी अचानक त्यांना आपल्या शेजारी कोणीतरी बसले असल्याची जाणीव झाली आणि जेव्हा त्यांनी बघितले तर ते दुसरे कोणी नसून 'भगवान बालाजी' होते.

'भगवान बालाजी' आपल्या शेजारी बसलेले असलेले बघून बिस्मिल्लाह हे स्तब्ध झाले आणि अवाक राहिले. त्यांचा अवाकपणा बघून भगवान बालाजीनी हसत हसत म्हटले की, 'वाजवा'. परंतु बिस्मिल्लाह हे अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते आणि त्यामुळे भगवान बालाजी हसले आणि तिथून निघून गेले.

बिस्मिल्लाह खान हे त्यादिवशी लगेच आपले गुरु आणि मामा अली बक्ष यांच्याकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तो प्रसंग ऐकताच मामा अली यांनी बिस्मिल्ला यांच्या गालफडात लावली आणि त्यांना सांगितले की, तुला मी सांगितलं होतं की काहीही वेगळे दिसले किंवा अनुभव आला तर कोणाला काहीही बोलायचे नाही. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची व भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष भेट झालेली होती.

मुस्लीम श्रद्धा असूनही प्रसिद्ध उस्ताद बिस्मिल्ला खान हे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रचंड आदर बाळगतात. ज्यामुळे दयाळू असलेला परमेश्वर श्रीकृष्ण हा त्यांच्यासमोर स्वतः प्रकट झाला असावा.

वरील कथा ही उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मुलाखतीवर आधारित आहे. जी 'मल्याळम मनोरमा'मध्ये डॉक्टर मधु वासुदेवन यांनी प्रकाशित केली होती.

बर्‍याच वर्षापूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान एकदा 'जमशेदपूर ते वाराणसी' असा रेल्वेने प्रवास करीत होते. उस्ताद हे कोळशावर चालणार्‍या पॅसेंजर ट्रेन मध्ये थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करीत होते. एका मध्यम ग्रामीण रेल्वे स्थानकावरून ज्या बोगीत उस्ताद बसले होते त्याच बोगीत एक तरुण गोरक्षक आला. तो दिसायला सावळा आणि हडकुळा असलेला तरुण होता व तो बासुरी वाजवत होता.

उस्ताद असलेले बिस्मिल्ला त्या तरुणाच्या उत्तम दर्जाच्या संगीताने थक्क झाले. कारण तो तरुण कोणता 'राग' वाजवित आहे? याची सुद्धा त्यांना कल्पना येत नव्हती. उस्ताद बिस्मिल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, ''हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात 'भगवान श्रीकृष्ण' होते जे स्वतः 'परमात्मा' आहेत."

तरुणाच्या (कृष्णाच्या) बासरीतून वाहू लागलेल्या या नाद-ब्रम्हातील (संगीताच्या रूपातील ब्रह्म) अमृततुल्यामुळे उस्तादांचे हृदय आनंदाने भरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

त्या तरुणाच्या (कृष्णाच्या) या अतुलनीय बासरीवादनानंतर उस्तादांनी त्या तरुणाला (कृष्णाला) जवळ बोलावले आणि त्याला आपल्याजवळ असलेल्या रोख रकमेतून एक चतुर्थांश भाग दिला व त्याला पुन्हा तोच 'राग' वाजवण्यास सांगितले. तो तरुण म्हणजे 'भगवान कृष्ण' बासुरीवादन करण्यास खुशीने तयार झाला आणि उस्ताद बिस्मिल्लाह यांच्याकडील सर्व रोख रक्कम संपेपर्यंत असेच चक्र सुरू राहिले आणि जेव्हा हे चक्र थांबले. त्याच्या पुढच्याच रेल्वे स्टेशन तो तरुण (कृष्ण) उतरला आणि गायब झाला.

खरं म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाह खान हे कुंभमेळ्याशी संबंधित एका संगीत मैफलीत भाग घेण्यासाठी जात होते. त्या मैफिलीत उस्ताद यांनी नवीन 'राग' जो त्यादिवशी त्यांनी कृष्णाकडून शिकला होता. तो शहनाईवर वाजवला. श्रोत्यांना त्यांचा हा नवीन सुरेल असा 'राग' इतका आवडला की उस्तादांना तो पुन्हा पुन्हा वादन करण्याची लोकांनी विनंती केली.

तिथे असलेल्या अनेक संगीत अभ्यासकांना त्या 'रागा'ला काय म्हणतात ? हे समजू शकले नाही म्हणून त्यांनी बिस्मिल्लाह खान यांना याबद्दल विचारले. उस्ताद यांच्या म्हणण्यानुसार या रागाचे नाव 'कान्हारीरा' होते.

दुसर्‍या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या या नवीन मधुर 'रागा'बद्दलच्या बातम्या छापल्या गेल्या.

ते वाचून प्रसिद्ध संगीतकार (बासरीवादक) हरिप्रसाद चौरसिया यांनी बिस्मिल्ला खाँ यांच्याकडे 'कान्हारीरा'  रागाच्या गुंतागुंतीबद्दल विचारपूस केली.

उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी त्यांच्याकडे 'सत्या'ची कबुली दिली आणि 'कान्हारीरा' राग गाऊन दाखवला. तो ऐकल्यानंतर जगातील सर्वात महान बासरीवादक हरिप्रकाश चौरसिया यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू निघाले. 

'कान्हारीरा' हा  भारतीय संगीतातील एक पवित्र 'राग' आहे. कारण ते 'श्री' कडून आलेले आहे. देवांचे देव कृष्णाच्या 'कमलरुपी' ओठांतून ते आलेले आहे.

जेव्हा त्यांच्या शिष्याचा सन्मान करण्याचा विचार भगवान श्रीकृष्णाच्या मनात येतो तेव्हा त्यांच्या सन्मानाच्या पद्धती या खूप रहस्यमय असतात. भगवान श्रीकृष्ण हे जात, पंथ किंवा धर्मावर आधारित भेदभाव करत नाहीत. फक्त आणि फक्त 'भक्ती' इतकीच एक अट त्यांची असते.

सर्वं श्रीकृष्णार्पणम्‌ !

- अनुवादित.

  मुळ इंग्रजी लेख सुरेश शेषाद्री.

साभार - सुरेखा सूर्यवंशी

सावधान इंडिया



 

Featured post

Lakshvedhi