Friday, 23 September 2022

जीवन गौरव पुरस्कार

 नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी आणि संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

          मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2020-21 व 2021-22 या वर्षांसाठीचे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

          सन 2020 - 21 साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर 2021 - 22 साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला आहे.

          सन 2020 - 21 साठीचा संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दिप्ती भोगले यांना तर 2021 - 22 साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान

 राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना

एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान

 

            मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे 'नवभारत टाइम्स 'यंग स्कॉलर्स'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापकप्राचार्य तसेच पालक उपस्थित होते.

            आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. विद्यापीठ दीक्षांत समारंभांमध्ये अधिकांश सुवर्ण पदक विद्यार्थिनी मिळवतात. भारतीय नागरी सेवेतील प्रथम तीन क्रमांक मुलींनी प्राप्त केले व यंग स्कॉलर्स पुरस्कार मिळविणाऱ्या अधिकांश विद्यार्थिनी आहेत तसेच अनेक शाळांचे प्राचार्य व शिक्षक देखील महिला आहेतहा बदल सकारात्मक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

            शिक्षक व प्राचार्यांनी मेधावी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे परंतु अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष द्यावे अशी सूचना राज्यपालांनी केली.

            राज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमीडीजी खेतान इंटरनॅशनल स्कूलउत्पल संघवी ग्लोबल स्कुलबिलबॉन्ग हाय इंटरनॅशनल स्कुलअपिजे स्कुल खारघरडी ए व्ही स्कूल ऐरोलीरायन इंटरनॅशनल कांदिवलीसोमय्या स्कूलबॉम्बे स्कॉटिशसुलोचनादेवी सिंघानिया स्कूल यांसह २४ शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळा प्रमुखांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

*****

Governor Koshyari presents Nav Bharat Times

Young Scholar Awards to students and Principals

     

      Mumbai, 22nd Sept : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Nav Bharat Times Young Scholar Awards to top scoring students and principals from 24 schools in and around Mumbai at a function held at Raj Bhavan Mumbai on Thursday (22 Sept). 

      Resident Editor of Nav Bharat Times Capt. Sunder Chand Thakur and Principals and Heads of various schools and parents of students were present.

      The Governor presented the NBT Young Scholar Awards to representatives of Aditya Birla World Academy, DG Khetan International School, Utpal Shanghvi Global School, Billabong High International School, Apeejay School Kharghar, DAV Public School Airoli, Kendriya Vidyalaya IIT Powai, RYan International, Somaiya School, Bombay Scottish, Smt Sulochanadevi Singhania School and others.

*****


सांस्कृतिक पुरस्कार

 सन 2019 आणि 2020 चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

 

 

            मुंबईदि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

            राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे. किर्तनासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शाहिरीसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अवधूत विभूते यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे. नृत्यासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  जयश्री राजगोपालन यांना जाहीर करण्यात आला आहे. कलादानासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  देवेंद्र दोडके यांना जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.तमाशासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  सुरेश काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलेसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कमलाबाई शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजनसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.


मन उडू उडू लागले


 

उद्योग विस्तार

 जेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक

-.                                         उद्योगमंत्री उदय सामंत

जेएसडब्लू सोबत उद्योग विभाग लवकरच करणार सामंजस्य करार

पेण येथे होणार ९६० मेगावॅट'चा पीएसपी प्रकल्प.

            मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती असून जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.


            आज पेण (रायगड) येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात आयोजित मंत्रालयातील बैठकीत मंत्री श्री. सामंत बोलत होते. पेण येथे ९६० मे.वॅ. चा पीएसपी प्रकल्प होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट सुमारे ४५० तरूणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे. तरुणांना जास्तीत - जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.


            श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा मानस असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत आहे.


            यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व सर्व संबंधित उपस्थित होते.


०००

धान्य खरेदी



 धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता

राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी

अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

 

            मुंबईदि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असूनराज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 - 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी संदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारेमार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर फेलेपालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडकेसहसचिव सुधीर तुंगारउपायुक्त पुरवठा व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. चव्हाण म्हणालेशेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान व भरडधान्यांचे चुकारे कोणत्याही परिस्थितीत विहीत वेळेत अदा करावेत. क्षेत्रीय अधिकारी यांनी जनजागृती करून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये याची खबरदारी घ्यावीखरीप पणन हंगाम 2022 - 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन धान खरेदी पोर्टलवर नोंदणी सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांबाबत खबरदारी घ्यावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचाही अवलंब करण्यात यावा. कृषी विभागामार्फत धान व भरडधान्य यांचे लागवड क्षेत्रउत्पादन व उत्पादकता याबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन  घेण्यात यावी. पणन हंगाम 2022 - 23 मध्ये खरेदी होणाऱ्या धान व भरडधान्य साठवणूकीसाठी गोदामांचे तसेच गुणवत्ता नियंत्रणाचे व्यवस्थापन करण्यात येवून धान व भरडधान्य खरेदीकरिता बारदाना खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन याबाबत विभागाने काटेकोरपणे कार्यवाही करावीअसे निर्देशही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

            केंद्र सरकारने खरीप पणन हंगाम 2022 - 23  करीता जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे. धान साधारण दर्जा 2040 रु. प्रति क्विंटल तर अ दर्जाच्या धानाकरीता 2060 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. संकरित ज्वारीसाठी 2970 रु. तर मालदांडीसाठी 2990 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. बाजरी 2350, रागी 3578, मका 1962 रु. अशा किंमती निर्धारित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

 मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीष महाजन

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

 

पुणे दि. 22: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेअसे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी  केले.

गुजरात येथे सुरू झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र  ऑलिम्पिक असोसिएशन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगेक्रीडा संचालक सुहास दिवसेमहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकरखजिनदार धनंजय भोसलेक्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते

 

श्री. महाजन म्हणालेप्रशिक्षकसंघटकव्यवस्थापक आणि खेळाडूंनी मित्रत्वाच्या भावनेने एकत्रीतपणे उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावे. खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. खेळाडूंनी शास्त्रोक्त पद्धतीने सराव करून चांगली कामगिरी करावी. शासनातर्फे खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.

 

खेळाडूंचा भोजन भत्ता वाढवून २०० ऐवजी ४८० करण्यात आला आहे. गावपातळीवर चांगल्या सुविधा असाव्यात यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि व्यसनापासून दूर राहावेअसे आवाहन त्यांनी केले.

 

श्री. दिवसे म्हणालेबालेवाडी येथे १५ क्रीडा प्रकारांचे सर्व शिबीर सुरू असून राज्यात इतरत्रही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात क्रीडा विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून शासनास सादर करण्यात येईल. प्रत्येक खेळाडूंची माहिती डिजिटल स्वरूपात ठेवण्यात येईल. खेळाडूंनी गुजरात येथील स्पर्धेत खिळाडूवृत्तीने सहभाग घेऊन सुवर्ण कामगिरी करावीअशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 

प्रास्ताविकात श्री. शिरगावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेविषयी माहिती दिली. खेळाडूंना शासनातर्फे उत्तम सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

34 क्रीडाप्रकारात खेळाडू पदकासाठी लढणार

श्री.महाजन यांनी बालेवाडी येथील सराव शिबिरात सहभागी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पदक विजेत्या महाराष्ट्र टेबल टेनिस संघांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

 

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  34 क्रीडा  प्रकारात महाराष्ट्राचे 700 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ध्यानचंद पुरस्कारार्थी प्रदीप गंधे हे पथकाचे नेतृत्व करत असून बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि कबड्डी खेळाडू सोनाली शिंगटे यांच्या ध्वजधारक संचलनात पथकाच्या अग्रभागी असतील.

 

            स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यापासून खेळाडू या स्पर्धेसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.

 

            स्पर्धेचे औपचारिक उदघाटन 29 सप्टेंबर रोजी होणार असून तिरंदाजीकनॉइंग कयाकिंगफुटबॉलकबड्डीखो खोलॉन टेनिसनेमबाजीरोईंगरब्बी ट्रायथालन मल्लखांबसॉफ्ट टेनिसरोलर स्केटिंगयोगासन अथलेटिक्सबॉक्सिंगतलवारबाजीज्युडोवेटलिफ्टिंगकुस्तीवुशूसायकलिंगसॉफ्ट बॉलस्क्वशबॅडमिंटनटेबल टेनिसहॉलीबॉल,  जिम्नॅस्टिकहॉकी आणि जलतरण या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा सहभाग आहे.

 

या स्पर्धेतील काही स्पर्धांना उद्घाटनापूर्वीच सुरुवात झाली आहे. यामध्ये टेबल टेनिसचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पदके मिळवली आहेत. महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य तर पुरुष संघाला कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

0000

 


Featured post

Lakshvedhi