Friday, 23 September 2022

सांस्कृतिक पुरस्कार

 सन 2019 आणि 2020 चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

 

 

            मुंबईदि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

            राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे. किर्तनासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शाहिरीसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अवधूत विभूते यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे. नृत्यासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  जयश्री राजगोपालन यांना जाहीर करण्यात आला आहे. कलादानासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  देवेंद्र दोडके यांना जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.तमाशासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  सुरेश काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलेसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कमलाबाई शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजनसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.


मन उडू उडू लागले


 

उद्योग विस्तार

 जेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक

-.                                         उद्योगमंत्री उदय सामंत

जेएसडब्लू सोबत उद्योग विभाग लवकरच करणार सामंजस्य करार

पेण येथे होणार ९६० मेगावॅट'चा पीएसपी प्रकल्प.

            मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती असून जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.


            आज पेण (रायगड) येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात आयोजित मंत्रालयातील बैठकीत मंत्री श्री. सामंत बोलत होते. पेण येथे ९६० मे.वॅ. चा पीएसपी प्रकल्प होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट सुमारे ४५० तरूणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे. तरुणांना जास्तीत - जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.


            श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा मानस असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत आहे.


            यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व सर्व संबंधित उपस्थित होते.


०००

धान्य खरेदी



 धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता

राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी

अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

 

            मुंबईदि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असूनराज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 - 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी संदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारेमार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर फेलेपालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडकेसहसचिव सुधीर तुंगारउपायुक्त पुरवठा व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. चव्हाण म्हणालेशेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान व भरडधान्यांचे चुकारे कोणत्याही परिस्थितीत विहीत वेळेत अदा करावेत. क्षेत्रीय अधिकारी यांनी जनजागृती करून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये याची खबरदारी घ्यावीखरीप पणन हंगाम 2022 - 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन धान खरेदी पोर्टलवर नोंदणी सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांबाबत खबरदारी घ्यावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचाही अवलंब करण्यात यावा. कृषी विभागामार्फत धान व भरडधान्य यांचे लागवड क्षेत्रउत्पादन व उत्पादकता याबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन  घेण्यात यावी. पणन हंगाम 2022 - 23 मध्ये खरेदी होणाऱ्या धान व भरडधान्य साठवणूकीसाठी गोदामांचे तसेच गुणवत्ता नियंत्रणाचे व्यवस्थापन करण्यात येवून धान व भरडधान्य खरेदीकरिता बारदाना खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन याबाबत विभागाने काटेकोरपणे कार्यवाही करावीअसे निर्देशही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

            केंद्र सरकारने खरीप पणन हंगाम 2022 - 23  करीता जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे. धान साधारण दर्जा 2040 रु. प्रति क्विंटल तर अ दर्जाच्या धानाकरीता 2060 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. संकरित ज्वारीसाठी 2970 रु. तर मालदांडीसाठी 2990 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. बाजरी 2350, रागी 3578, मका 1962 रु. अशा किंमती निर्धारित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

 मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीष महाजन

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

 

पुणे दि. 22: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेअसे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी  केले.

गुजरात येथे सुरू झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र  ऑलिम्पिक असोसिएशन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगेक्रीडा संचालक सुहास दिवसेमहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकरखजिनदार धनंजय भोसलेक्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते

 

श्री. महाजन म्हणालेप्रशिक्षकसंघटकव्यवस्थापक आणि खेळाडूंनी मित्रत्वाच्या भावनेने एकत्रीतपणे उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावे. खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. खेळाडूंनी शास्त्रोक्त पद्धतीने सराव करून चांगली कामगिरी करावी. शासनातर्फे खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.

 

खेळाडूंचा भोजन भत्ता वाढवून २०० ऐवजी ४८० करण्यात आला आहे. गावपातळीवर चांगल्या सुविधा असाव्यात यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि व्यसनापासून दूर राहावेअसे आवाहन त्यांनी केले.

 

श्री. दिवसे म्हणालेबालेवाडी येथे १५ क्रीडा प्रकारांचे सर्व शिबीर सुरू असून राज्यात इतरत्रही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात क्रीडा विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून शासनास सादर करण्यात येईल. प्रत्येक खेळाडूंची माहिती डिजिटल स्वरूपात ठेवण्यात येईल. खेळाडूंनी गुजरात येथील स्पर्धेत खिळाडूवृत्तीने सहभाग घेऊन सुवर्ण कामगिरी करावीअशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 

प्रास्ताविकात श्री. शिरगावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेविषयी माहिती दिली. खेळाडूंना शासनातर्फे उत्तम सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

34 क्रीडाप्रकारात खेळाडू पदकासाठी लढणार

श्री.महाजन यांनी बालेवाडी येथील सराव शिबिरात सहभागी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पदक विजेत्या महाराष्ट्र टेबल टेनिस संघांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

 

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  34 क्रीडा  प्रकारात महाराष्ट्राचे 700 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ध्यानचंद पुरस्कारार्थी प्रदीप गंधे हे पथकाचे नेतृत्व करत असून बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि कबड्डी खेळाडू सोनाली शिंगटे यांच्या ध्वजधारक संचलनात पथकाच्या अग्रभागी असतील.

 

            स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यापासून खेळाडू या स्पर्धेसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.

 

            स्पर्धेचे औपचारिक उदघाटन 29 सप्टेंबर रोजी होणार असून तिरंदाजीकनॉइंग कयाकिंगफुटबॉलकबड्डीखो खोलॉन टेनिसनेमबाजीरोईंगरब्बी ट्रायथालन मल्लखांबसॉफ्ट टेनिसरोलर स्केटिंगयोगासन अथलेटिक्सबॉक्सिंगतलवारबाजीज्युडोवेटलिफ्टिंगकुस्तीवुशूसायकलिंगसॉफ्ट बॉलस्क्वशबॅडमिंटनटेबल टेनिसहॉलीबॉल,  जिम्नॅस्टिकहॉकी आणि जलतरण या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा सहभाग आहे.

 

या स्पर्धेतील काही स्पर्धांना उद्घाटनापूर्वीच सुरुवात झाली आहे. यामध्ये टेबल टेनिसचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पदके मिळवली आहेत. महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य तर पुरुष संघाला कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

0000

 


शास्वत विकास

 शाश्वत विकास संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा

         -गिरीष महाजन

         पुणे दि. 22 : शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

            चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत सरकारचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय व राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार, अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार, सह सचिव रेखा यादव, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.


            ग्राम विकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशात व राज्यात शाश्वत विकासांच्या ध्येयांची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राम पंचायतीमध्ये या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने नऊ संकल्पना निश्चित केल्या असून या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.


 


            शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच देशाच्या विकासात भर घालण्यासाठी गावाला स्वच्छ - सुंदर बनवावे लागेल. यासाठीच पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्त्वाचे अधिकारी देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना विकास काम तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी थेट निधी देण्यात येतो. गावात मूलभूत सुविधांसोबतच गाव स्वच्छ, सुंदर, पाणी, आरोग्य यासह गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे ते म्हणाले.


            राज्यात राळेगण सिद्धी व हिवरेबाजार या गावांनी ग्राम विकासात केलेले काम समोर ठेवून सरपंचांनी आपले गाव स्वच्छ, सुंदर व जलसमृद्ध करावे, असे आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले.


            केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, शहराप्रमाणे गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गावाला सुरक्षित व समृद्ध करण्यासोबतच गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संकल्प, स्वप्न, सामर्थ्य या तीन सूत्रांच्या आधारे सरपंच काम करतात. शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी सरपंचासोबतच गावातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.


            जलजीवन मिशनच्या माध्यमातून 'हर घर नल' संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. पाणी वाचविण्यासाठी गावात विचार होण्याची गरज आहे. स्वच्छ, सुंदर गावासोबत जलसमृद्ध गाव निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले.


            सचिव सुनिल कुमार म्हणाले, देशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गाव व शहर हा भेद दूर करण्यासाठी 17 उद्दिष्टांपैकी 9 उद्दिष्टे केंद्रीत करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.


            राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पना विचारात घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही आदर्श गावे आहेत. लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


            यावेळी जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव पुस्तिका तसेच नऊ उद्दिष्टांवर आधारीत पोस्टर पुस्तिका व 'ग्राम विकासाचा रोड मॅप' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महा ई ग्राम पोर्टलचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



शाश्वत विकास

 राष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाबाबत विविध पैलूंवर चर्चा

 

पुणे दि. 22 - भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वच्छ व हरित ग्रामव 'जलसमृद्ध गावया शाश्वत समान विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी जलशक्ती मंत्रालयाच्या पाणी पुरवठा विभागाच्या सचिव विनी महाजनपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजनआदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

 

सचिव श्रीमती महाजन म्हणाल्यागावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी स्वच्छता पंधरवड्यामध्ये आपल्या गावातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन विल्हेवाट लावावी. विकास कामे करतांना सामाजिक स्वयंसेवी संस्थातांत्रिक सल्लागारांची मदत घ्यावी. ग्रामीण भागातील शौचालयाचा वापरघनकचरा व्यवस्थापनप्लास्टिक निर्मूलनविविध शासकीय योजना याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

सहसचिव श्री. महाजन म्हणालेस्वच्छ व हरित ग्राम व जलसमृद्ध गाव या शाश्वत समान विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. 'स्वच्छता ही सेवामोहिमेत 50 हजार नागरिकांचा सहभाग घेतला आहे. येत्या 2 ऑक्टोबर स्वच्छता दिनी श्रमदानाच्या माध्यमातून 500 गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. माहितीशिक्षण आणि संवाद या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारीकर्मचारी गावपातळीवर संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेअसेही श्री. महाजन म्हणाले.

 

आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव  पवार म्हणालेस्वच्छहरीत व पाणीदार गावे तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये केवळ पाच वर्षांचा विचार न करता दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे. पाण्याच्या गुणवत्तेबरोबरच मातीच्या आरोग्याची दक्षता घेण्याची गरज आहे. यासाठी पुढच्या 25 वर्षाचे नियोजन आज हाती घ्यावे लागेल. हिवरेबाजारसारख्या प्रयोगातून आपण गावाकडील स्थलांतर थांबवू शकलो तर शहरे सुरक्षित ठेवता येतील.

 

यावेळी कार्यशाळेत उपस्थित सरपंचग्रामसेवककृषी अधिकारी आदींनी चर्चेत सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधला. कार्यशाळेत देशातील विविध गावातील यशकथा चित्रफीतीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या.

0000

 

शाश्वत विकास संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा

                      -गिरीष महाजन

 

         पुणे दि. 22 : शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

            चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत सरकारचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय  व राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलआदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवारकेंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार, अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार, सह सचिव रेखा यादवराज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारयशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

            ग्राम विकास मंत्री श्री. महाजन म्हणालेदेशात व राज्यात शाश्वत विकासांच्या ध्येयांची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राम पंचायतीमध्ये या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी  केंद्र सरकारने नऊ संकल्पना निश्चित केल्या असून या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

 

            शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच देशाच्या विकासात भर घालण्यासाठी गावाला स्वच्छ - सुंदर बनवावे लागेल. यासाठीच पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्त्वाचे अधिकारी देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना विकास काम तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी थेट निधी देण्यात येतो. गावात मूलभूत सुविधांसोबतच गाव स्वच्छसुंदरपाणीआरोग्य यासह गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे ते म्हणाले.

            राज्यात राळेगण सिद्धी व हिवरेबाजार या गावांनी ग्राम विकासात केलेले काम समोर ठेवून सरपंचांनी आपले गाव  स्वच्छसुंदर व जलसमृद्ध करावेअसे आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले.

            केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणालेशहराप्रमाणे गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गावाला सुरक्षित व समृद्ध करण्यासोबतच गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संकल्पस्वप्नसामर्थ्य या तीन सूत्रांच्या आधारे सरपंच काम करतात. शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी सरपंचासोबतच गावातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

            जलजीवन मिशनच्या माध्यमातून 'हर घर नलसंकल्पना पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. पाणी वाचविण्यासाठी गावात विचार होण्याची गरज आहे. स्वच्छसुंदर गावासोबत जलसमृद्ध गाव निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले.

            सचिव सुनिल कुमार म्हणालेदेशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गाव व शहर हा भेद दूर करण्यासाठी 17 उद्दिष्टांपैकी 9 उद्दिष्टे केंद्रीत करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

            राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणालेपंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पना विचारात घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धीहिवरेबाजारपाटोदा ही आदर्श गावे आहेत. लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी जलसमृद्ध गावस्वच्छ गाव पुस्तिका तसेच नऊ उद्दिष्टांवर आधारीत पोस्टर पुस्तिका व 'ग्राम विकासाचा रोड मॅपया पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महा ई ग्राम पोर्टलचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंचस्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi