Thursday, 22 September 2022

ओळखा माझ्या तोंडात काय भरलाय


 

दिलखुलास

 दिलखुलासकार्यक्रमात आरोग्य मंत्री

प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शुक्रवार  दि. 23 सप्टेंबर आणि शनिवार दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अधिक भक्कम करण्यासाठी केलेल्या उपाययोजनामाता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानआरोग्य विभागाची नोकर भरती याबाबत विस्तृत माहिती आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत  यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. नवरात्रोत्सवनिमित्त 'माता सुरक्षित तर घर सुरक्षितअभियान संपूर्ण राज्यात सुरु होणार आहे. या अभियानाचा सर्व माताभगिनींनी लाभ घ्यावाअसे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

000000

Kovid

 कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम यावा - मुख्यमंत्री

            कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम असावा यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत असे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            सध्या कोविड लसीकरण अमृत महोत्सवात राज्यभरात ४४ लाख ८० हजार २९३ प्रिकॉशन डोसेस देण्यात आले असून १० लाख ६० हजार ४७७ दुसरा डोस आणि ४ लाख ७२ हजार ३६ असा पहिला डोस असे मिळून ६० लाख १२ हजार ८०६ डोसेस देण्यात आले आहेत. एकूण १७ कोटी ६४ लाख ४७ हजार ८०० डोसेस आतापर्यंत देण्यात आले आहेत.

            सध्या राज्यात कोविडचे ४२०० सक्रीय रुग्ण आहेत. १०० पेक्षा जास्त रुग्ण असलेले ८ जिल्हे असून २८ जिल्ह्यात १०० पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.



पोलिस भरती

 पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी.

            ७५ हजार पोलीसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


000000




आपत्ती

 आपत्ती निवारणांसदर्भातमंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

 

            आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे संकटे येतात यासंदर्भात मदत पुनर्वसन तसेच इतर बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यामध्ये सुसूत्रता रहावी म्हणून मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-----०-----

Featured post

Lakshvedhi