Thursday, 22 September 2022

वनराणी‘ धावणार

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी‘ सुरू करण्यात येणार

- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

रवीना टंडन राज्याच्या वन्यजीव सदिच्छा दूत

            मुंबई, दि. 21 : काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वानाच मोहित करणारी ‘वनराणी‘ ट्रेन कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर (मृगया चिन्ह केंद्र), वन्यजीव रुग्णालय आणि कॅट ओरीएंटेशन सेंटर (मार्जार वंशाची सर्व माहिती देणारे केंद्र), आदी बांधकामांचा लोकार्पण सोहळा आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

            या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे माजी कार्यकारी संचालक इ्ररिक सोलेम, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, अभिनेत्री रवीना टंडन यांच्यासह वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन बल प्रमुख डॉ. वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जुन, प्राध्यापक श्रीमती हरिप्रिया आदी उपस्थित होते.

            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येकाला अशा ट्रेनचे आकर्षण असते. ही ट्रेन सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत असल्याने या उद्यानात ट्रेन आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

टी फॉर टंडन, टायगर आणि ट्री

            अभिनेत्री रविना टंडन या राज्य शासनाच्या वन्यजीव सदिच्छादूत म्हणून काम करणार असून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांची मदत होणार आहे. जसे रविना टंडन यांना त्यांच्या सशक्त अभिनयासाठी ओळखले जाते तसेच महाराष्ट्र हा वाघांसाठी आणि वृक्ष लागवडसाठी सुद्धा ओळखला जातो. आपण वनमंत्री असताना राज्यातील वाघांची संख्या 190 वरून 312 करण्यासाठी आणि 50 कोटी वृक्ष लागवड हे प्रकल्प राबविल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

वन संवर्धनासाठी आराखडा

            ज्याप्रमाणे शहरांच्या विकासासाठी विकास आराखडा असतो त्याच प्रमाणे वन विभागामार्फत वन संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. आईच्या आणि वनराईच्या सेवेचे मूल्यांकन होऊ शकत नाही त्यामुळे वनांचे महत्त्व प्रत्येकाला पटवून देण्यासाठी काम करण्यात येईल. उद्याने आपली मुक्त विद्यापीठे असून आनंद आणि ऊर्जा देणारी असल्याने या वनराईचे महत्त्व प्रत्येकाला पटवून देऊ असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

            खासदार श्री. शेट्टी यांनी यावेळी उद्यानात येण्यासाठी काढण्यात येणारे तिकीट आणि त्याच्या दराकडे शिवाय उद्यानात आल्यावर पर्यटकांना आतमध्ये नाश्त्या सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लक्ष वेधले.

            आमदार श्री. दरेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली. हे वन ग्रंथालय वन्यजीवांविषयक माहिती देण्यासाठी तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना माहिती घेण्यासाठी उपयोगी पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            अनिनेत्री रविना टंडन म्हणाल्या, वन्यजीव सदिच्छादूत हे सन्मानाचे काम आहे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शासनाबरोबर काम करु.

8 वन्यजीव रुग्णवाहिका आजपासून कार्यान्वित

            राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आजपासून 8 वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून आज त्याचे लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ही सर्व वाहने अत्याधुनिक, सुसज्ज आणि गतिमान असणार आहेत.


००००

कौशल्य विकास

 कौशल्य विकासासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार

दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनवणार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 21 : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एचसीएल कंपनीसोबत करार झालेल्या मिलाप’ या कार्यक्रमाअंतर्गत 25 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने या दोन करारांद्वारे 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात झालेल्या या करार हस्तांतरण कार्यक्रमास शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओलसमग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारेसहसचिव इम्तियाज काझीटाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या प्रमुख प्राचार्य मधुश्री शेखरतानिया शॉविनीता कौशल आदी उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील उद्दिष्टांनुसार 2025 पर्यंत 50 टक्के शाळांपर्यंत व्यावसायिक शिक्षण पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत हा करार करण्यात आला आहे.

            मंत्री श्री.केसरकर म्हणालेभविष्यातील पिढी सक्षम बनविण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम महाराष्ट्र घडविण्यात येणार असून पर्यायाने सक्षम भारत घडविण्याकडे वाटचाल करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे विविध प्रश्न देखील लवकरात लवकर सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणालेशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विषयांची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावीलहान विद्यार्थ्यांवर ताण येऊ नयेत्यांना पुरेशी झोप मिळावी यादृष्टीने शिक्षण पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार पौष्टिक असावा यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            सामंजस्य कराराबाबत माहिती देताना श्री.केसरकर म्हणालेविद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणतेही काम करताना उत्कृष्टता यावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यादृष्टीने त्यांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने आज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित संस्थेद्वारे पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याअंतर्गत कमवा व शिका या तत्वावर कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बारावीनंतर प्रवेश घेऊ शकणार आहेत. या संस्थेने अभ्यासक्रमाकरीता ताज ग्रुपएलआयसीटायटनटीसीएसमारूती सुझुकीफोर्टिसस्टार हेल्थ इन्शुरन्सलेन्सकार्टल्युपिन अशा विविध 3750 उद्योग कंपन्यांसोबत करार केला असून विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. यात प्रामुख्याने पारंपरिक अभ्यासक्रमासोबत टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीमाहिती तंत्रज्ञानमीडिया व एंटरटेनमेंटबँकींग व वित्तीय क्षेत्रातील संधीचा समावेश आहे. यासाठी राज्यात एकाच वेळी विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने यापूर्वी सुरू केलेल्या मिलाप’ या कार्यक्रमाद्वारे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एचसीएल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात आतापर्यंत 34 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे 25 हजार तरूणांना रोजगार उपलब्ध होईल तरआज झालेल्या कराराद्वारे सुमारे 15 हजार तरूणांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध होईलअशी माहिती श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/21.9.22


राष्ट्र प्रेम

 कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान

- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

'भगत सिंह कोश्यारी: ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ पुस्तक.

मुंबई, दि. 21 : साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील 'भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक होय, असे गौरवोद्गार भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे काढले.


राजभवन, दरबार हॉल येथे डॉ. तुषार कांती बॅनर्जी लिखीत ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, रामनाथ कोविंद यांच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुस्तकाचे लेखक डॉ. तुषार कांती बॅनर्जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


यावेळी श्री.कोविंद म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संविधानिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे श्री.कोश्यारी यांची सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल ही वाटचाल प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरणारी आहे. संसद भवनाच्या दोन्ही सभागृहाचा कामाचा अनुभव असलेले श्री. कोश्यारी यांनी उत्तराखंडच्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. देशातील सैनिकासाठी 'वन रँक वन पेन्शन' लागू करण्यामध्ये श्री. कोश्यारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अध्यात्मिक अधिष्ठान असलेले श्री. कोश्यारी यांच्या कामाचा आवाका, अहोरात्र काम करण्याची वृत्ती आणि निस्वार्थी भावना ही प्रत्येक व्यक्तीसाठी अनुकरणीय आहे.


 राजभवन लोकाभिमुख करण्याच्या वृत्तीतून कार्यरत असलेले श्री. कोश्यारी यांनी कोरोना संकटाच्या काळात देखील अहोरात्र काम करून संकट समयी एक आश्वासक नेतृत्व म्हणून दिलासा दिलेला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देत दुर्गम भाग, सीमा क्षेत्र, आदिवासी भाग या ठिकाणी भेटी देऊन जनसामान्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे श्री. कोविंद म्हणाले. बहुआयामी जीवन जगत असलेले श्री. कोश्यारी यांनी राष्ट्रीय एकात्मता तसेच भारताच्या सुरक्षेसाठी कायमच आवाज उठवला आहे अशा व्यक्तित्वाची ओळख करून देणारे हे पुस्तक निश्चितच वाचकांसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षाही श्री. कोविंद यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या अष्टपैलू व्यक्तित्व आणि व्यापक कार्याला साजेसे शीर्षक असलेले पुस्तक

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाला आणि व्यापक कार्याला साजेसे शीर्षक असलेले 'भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक वाचकांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारे आहे. समाज आणि राष्ट्राचा विचार करणारे देशभक्तीच्या संस्कारात आपले संपूर्ण जीवन अर्पण केलेले श्री. कोश्यारी यांनी या प्रदीर्घ वाटचालीत सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे आणि निष्ठेने पार पाडली आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल यामध्ये मुख्यमंत्री, संसद प्रतिनिधी चारी सदनांच्या कामांचा अनुभव या सर्व पदाची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली आहे. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आपली तीन वर्ष यशस्वीपणे पूर्ण करत असताना कोविड काळातही श्री.कोश्यारी यांचे काम सुरू होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी कार्यक्रम केले असून एकूण 1077 कार्यक्रमांना तर कुलपती म्हणून 48 दीक्षांत समारंभाना उपस्थिती लावली आहे. निश्चितच ही त्यांच्या कार्यक्षमतेची एक छोटीशी झलक आहे. ही कार्यपद्धती असल्यामुळेच श्री. कोश्यारी यांनी राजभवनला लोकभवन मध्ये परावर्तित केले आहे. जनसामान्यांसाठी राजभवन खुले करून त्यांनी लोकाभिमुख पद्धतीने यंत्रणेला काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्यासोबत अनेक चांगले गुण वैशिष्ट्ये आहेत. त्या सर्वांचा आढावा या पुस्तकाचे लेखकाने घेतला आहे. देशातील सैनिकांना 'वन रँक वन पेन्शन' ही सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्यपालांनी पंतप्रधानांना सादर केलेला प्रस्ताव महत्त्वाचा ठरला आहे. श्री कोश्यारी यांच्या व्यक्तित्वाला विविध पैलू असून त्यांचे काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पुस्तकासारखे अनेक खंड काढावे लागतील. इतके व्यापक काम श्री. कोश्यारी यांनी आजपर्यंतच्या वाटचालीत केलेले आहे. देशासाठी, समाजासाठी निस्वार्थपणे काम करण्याची वृत्तीही श्री. कोश्यारी यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. कोविड काळातही नियमितपणे काम करून त्यांनी एक आश्वासक नेतृत्व राज्याला दिले. खूप कमी काळात मराठी भाषा देखील शिकून घेतली, त्यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या नेतृत्वाचा लाभ आपल्याला व्हावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली.

राष्ट्राप्रतीचा समर्पित भाव वृद्धींगत करुन प्रत्येकाने आपले सक्रिय योगदान राष्ट्रबांधणीत द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, गेल्या तीन वर्षात श्री. कोविंद यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळाले. पदाच्या प्रलोभनाला बळी न पडता देशसेवेचा भाव आपल्या कर्तृत्वाला अधिक उंची देतो. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने राष्ट्रउभारणीत योगदान दिल्यास देश निश्चितच उज्वल वाटचाल करेल. संत महात्म्यांचा वैभवशाली वारसा आपल्या राष्ट्राला लाभला आहे. त्यामुळे अनेक आक्रमणे, आव्हानानंतरही एक राष्ट्र म्हणून भारत सक्षमपणे उभा आहे. राष्ट्राप्रतीचा समर्पित भाव अधिक वृद्धीगंत करुन प्रत्येकाने आपले सक्रिय योगदान राष्ट्रबांधणीत दिले तर आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण राष्ट्राला अधीक बलशाली करु, अशी अपेक्षा श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली.

असनसोल येथे बंगाली भाषेचे प्राध्यापक असलेल्या डॉ. तुषार कांती बॅनर्जी यांनी लिहिलेल्या 270 पानांच्या इंग्रजी चरित्रात्मक पुस्तकामध्ये श्री. कोश्यारी यांचे बालपण, शिक्षण, राजकीय प्रवास, संसद सदस्य म्हणून केलेले वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच राज्यपाल म्हणून केलेले कार्य यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.

००००



Wednesday, 21 September 2022

यशस्वी पुरुष स्त्री मुळेच

 Behind every successful man, there is a woman.


एकच पक्ष.पितृ पक्ष

 

🍱🦅

वडीलांचं रूप घेऊन

कावळा घरी आला

ताटातील मेनू पाहून

बोलाव वाटलं त्याला

🍱🦅

बरं नव्हतं तेव्हा कधीच

आणली नाहीस गोळी, 

आज कशाला वाढतोस रे

ताटात पुरणाची पोळी! 

🍱🦅

विनाकारण भांडण होता

 दिसले खरे रूप, 

कशाला वाढतो मला

आता गावरान तूप! 

🍱🦅

चटणी वर तेलासाठी

 होत नव्हता राजी, 

कशाला वाढतो पात्रावर

वडे आणि भजी!! 

🍱🦅

प्रेम नाही,जिव्हाळा नव्हता

नाही दिलीस साथ,

आज कशाला वाढतो रे

पात्रावर वरण भात!!

🍱🦅

जबरदस्ती अंगठा घेऊन

केली घराची वाटणी,

कशाला वाढतो पात्रावर

आज लोणचं चटणी!! 

🍱🦅

हिस्सा वाटणीसाठी केली

 बहिणी संगे दूरी,

आता काय उपयोग वाढून

पात्रावरती पुरी!! 

🍱🦅

आयुष्याभर ठेवली रे

माझ्या बद्दल अढी, 

आता कोण पिणार ती

द्रोणामधली कढी!! 

🍱🦅

वेगळा राह्यलो तेव्हा नाही

दिलास मला धिर, 

आज कशाला वाढतो तू

पात्रावरती खिर!! 

🍱🦅

सणासुदीला आणलं नाही

मला नवं कापड, 

आता कशाला वाढतोय

कुरडई अन् पापड़!! 

🍱🦅

आजारी असताना तू

धुतली ना सतरंजी, 

आता कशाला वाढतो रे

पात्रावर करंजी!! 

🍱🦅

जिवंत असतांना पोरा

दिले असतेस लक्ष, 

तृप्त झाले असते पुर्वज

नसता  पितृपक्ष!! 

🍱🦅

पितरांचा मिळून तयार

होतो  पितृपक्ष, 

बऱ्याच घरात आज मात्र

झाला विरोधी पक्ष!! 

🍱🦅

सांगतोय तू रहा सदैव

जेष्ठांप्रती दक्ष, 

करावं तसं भरावं लागेल

इतिहास देईल साक्ष!! 

🍱🦅

🌸🌸 *मातृपितृ देवोभव्* 🌸🌸🙏🙏


कवी/कवयित्री माहीत नाही

साप्रवि'ची कार्यालये एकाच मजल्यावर

 मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत

 'साप्रवि'ची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. २१: मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन इमारतीच्या ६, ८, ९, १२ व १९ या मजल्यांवर कार्यरत असलेली सामान्य प्रशासन विभागाची कार्यालये याच इमारतीतील १९ व्या मजल्यावर एकत्रित आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे सामान्यांना एकाच ठिकाणी ही कार्यासने उपलब्ध होणार असल्याने त्यांना विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

            नवीन प्रशासन भवन इमारतीमधील सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यातील जागेच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर असलेल्या ऊर्जा विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या रोख शाखेस याच इमारतीतील बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजूकडील सामान्य प्रशासन विभागाची जागा देण्यात आली आहे.

            १९ व्या मजल्यावरील पूर्व बाजूस असलेल्या प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीस (कृषि व पदुम विभाग) नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या सामान्य प्रशासन विभागाच्या व त्याच्या बाजूला असलेल्या कृषि व पदुम विभागाच्या गोदामाची जागा वाटप करण्यात आली आहे.

            सामान्य प्रशासन विभागास बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजू व नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या जागेच्या बदल्यात १९ व्या मजल्यावर पश्चिम बाजूची ऊर्जा विभागाची व राज्य निवडणूक आयोगाची (रोखशाखा) व प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीची (कृषि व पदुम विभाग) पूर्व बाजूची जागा देण्यात आली आहे.

कर्म से ही पेहचान होती है

 !! *समाधानाची व्याख्या* !!

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .पुढचा एक जण  सहज तेथे बसू शकत होता ....

पण त्याने ती सीट मला दिली.  


पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा  आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा  घडला.बर हा माणूस अगदी सामान्य दिसत होता, म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावा ,आता शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. 

तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी  बोललो.  विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही  तुमची सीट  दुसऱ्या ला का देत होता ??  तेंव्हा त्याने दिलेले उत्तर हे असे •••••

*मी शिकलेला  नाही हो.  अशिक्षित आहे मी .एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो . आणि ,पण माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही. ज्ञान नाही , पैसा नाही.*

 *तेंव्हा मी हे अस रोजच करतो. हेच मी सहज‌ करू शकतो.*  


दिवसभर काम केल्यानंतर ‌ अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमत.

  मी तुम्हाला माझी जागा दिली. तुम्ही मला धन्यवाद म्हणाला  ना  त्यात मला खूप समाधान  मिळाले मी कोणाच्या  तरी कामी  आलो ना त्याचे .•••कोणाला कायतरी दिल्याच. असं मी रोज करतो   *••.माझा नियमच झाला आहे•••* आणि रोज मी आनंदाने घरी जातो.•••उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार. व समज  बघून याला  

अशिक्षित  म्हणायचे का? 

काय समजायचे ?

 कोणाकरिता काही तरी करायची त्याची  इच्छा ,

••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना . *•••मी कशा रीतीने मदत  करू शकतो??*

त्यावर शोधलेला  उपाय बघून  देव सुध्दा आपल्या या  निर्मीती वर खुष असेल 

.माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . 

असं दिमाखात सांगत असेल .••••••

        त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या  स्वतः ला हुषार शिक्षित समजणारा मी त्याच्या समोर  खाली मान घालून  स्वतः चे   परिक्षण करू लागलो. *किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली.* देव त्याला नक्कीच पावला असणार..

मदत ही खूप महाग  गोष्ट आहे  कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .•••••

सुंदर कपडे ,हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच  सुशिक्षत  का ? हीच माणसाची खरी ओळख का ?

 मोठं घर ,मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ?? 

 कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व  तुमची धुंदी उतरवेलं  सांगता येत नाही .•••

   या माणसाच्या   संगतीने माझे विचार स्वच्छ झाले. 

   म्हणतात ना •••

    *" कर्म से  पहचान होती है इंसानों की ।*

      वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में ।!!!

Featured post

Lakshvedhi