सद्गुगुरु नमन अलका देशमुख
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 21 September 2022
जात्यावरील ओवी
: जात्यावरील ओवी
शाळेचे शिक्षक श्री सखाराम कदम यांची संकल्पना
ओवी बोलणारे...संगीता दबडे ( आजी)
आनंदी नेमाने (आजी)
: रायगड जिल्हा परिषद शाळा. कडा पे ,तालुका माणगाव ,जिल्हा रायगड
आली आली नवरात्र, मातेचा आदर करा
आली आली नवरात्र. मातेचा आदर करा .*नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचे धर्मशास्त्रात कुठेही नमूद नाही आणि तो मार्केटिंक कंपन्यांनी आणलेला बीभत्सपणा आहे ते खालीलप्रमाणे...*
१) ४ वेद ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ, असे जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा, असे दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा (स्वच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम) असे दिले आहे. तुमच्यापाशी जे अलंकार असतील ते घाला. मॅचिंग हवेच असे नाही. मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरून हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बीभत्सपणा आला आहे.
आता याची पुढची आवृत्ती म्हणजे ‘नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घाला’, अशी विज्ञापने झळकू लागली आहेत.
नवरात्र यांचा लाभ उठवत ड्रेस विक्रेते अन् व्यावसायिक यांनी गल्ला भरण्यासाठी ९ रंगांच्या ड्रेस ची संकल्पना विज्ञापनांमधून मांडली आहे. ९ रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घालणे उपासनेच्या दृष्टीने निरर्थक आहे.
२) इव्हेंट मँनेजमेंट कंपन्यांची लुडबूड! थांबवा.लक्ष्मीची पाऊले platic नाही तर कुकुवा ने काढा. फुलांची रांगोळी का ढा,chainess लायटिंग chya ऐवजी पणत्या लावा. तेजोमय रहा.
प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. महाराष्ट्रात घटस्थापना ही प्रधान असते. त्याचसमवेत अखंड नंदादीप, काही जणांकडे त्रिकाळ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी कुमारिका पूजन आणि भोजन, तसेच माळा बांधणे, अशा पद्धतीने नवरात्र होते. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होमहवन, सरस्वती आवाहन-पूजन, असेही धार्मिक विधी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत असतात. कर्नाटकात दसरा मोठा असतो, कच्छ, सौराष्ट्र, गुजरात या प्रांतात देवीच्या प्रतिमेचे पूजन करून रात्री जागरण, गरबा, तसेच होमहवन वगैरे पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात, सरमिसळ करतात आणि नवीनच पद्धती निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो आणि त्यात देवीची उपासना हा सर्वांत मुख्य भागच नसतो. ज्यामधे पैशांची उधळण होते. लक्ष्मी संचय हा उदेश्य सार्थकी ठरत नाही.
३) नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे न कळल्यास पुढील पिढीला विस्मरणीय होईल.
प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट्य असते, परंपरा असतात. त्या जपल्याच पाहिजेत अन्यथा काही वर्षांनी आपली मुले, नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा, दांडिया खेळणे एवढाच घेतील. नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे त्यांना कळणारच नाही. मी हिंदु आहे, माझे आचार-विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा त्यांना एकदा विसर पडला मात्र नेमकी हीच नस या इव्हेंट आणि मार्केटिंग आस्थापनांनी जाणली आहे.
४डे संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा गिफ्ट वस्तूंच्या कंपन्या आणि ग्रिटिंग कार्ड (शुभेच्छापत्रे) करणार्या कंपन्या आपल्या देशात आल्या, तेव्हापासून हे डेचे खूळ डोक्यात शिरले. या दिवसांत कोट्यवधींची उलाढाल या कंपन्या करत आहेत. आज अशी अवस्था आहे की, मुलांना श्रीगणेश चतुर्थी, गोकुळाष्टमी कधी आहे, हे सांगावे लागते, तर डे मात्र ते लक्षात ठेवतात. किमान आईचा उत्सव (नवरात्रोत्सव) असा होता कामा नये, असे वाटते.
५) नवरात्र काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची उपासना करावी! कुमारिका,विधवा, जेष्ठ,गरीब, सुवासिनी, महिलांची ची पूजा करा.त्यांनाच माता माना.जुन्या अनिष्ट प्रथा रूढी यांना तिलांजली द्या. आदर्श निर्माण करा.
चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारून त्यांचा उत्पात शमन करून जगदंबेने जी विश्रांती घेतली तो काळ म्हणजे हा नवरात्र आहे. या युद्धाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले, असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युद्ध करतच नाही केवळ नाचतो.) या काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची सेवा करणे, आपल्या परंपरेनुसार नंदादीप, माळ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडून सरस्वतीदेवीची उपासना ही विद्या आणि बुद्धी यांकरिता करून घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरिता महालक्ष्मीची उपासना करावी आणि शत्रूसंहार सामर्थ्यप्राप्तीकरिता महाकालीची उपासना करावी.
६) तरुण मुलींनी महाकाली पराक्रमी होण्यासाठी प्रयत्न करावेत!
मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळवून उत्तम मार्गाने धन जोडणे आणि छेडछाड करणार्या गुंडांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे, याकरिता देवीचे माहात्म्य अन् पराक्रम वाचावेत ही आज काळाची आवश्यकता आहे. नट्यांसारखे नाचण्यापेक्षा महाकालीसारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरची चेन्नमा, जिजाबाईं यांच्यासारखा पराक्रम दाखवण्याची ही वेळ आहे आणि आवश्यकताही त्याचीच आहे. नाचणारे खूप झाले आहेत; पण पराक्रमी मात्र अल्प होत आहेत.
७) मुलामुलींना धोक्यांची जाणीव करून देणे हे कर्तव्य!
या दांडिया आणि गरब्याच्या काळात संततीनियमन साधनांची विक्री दुप्पट होते आणि नंतर शालेय अन् महाविद्यालयीन तरूणींच्या गर्भपाताचे प्रमाणही वाढत आहे. लव्ह फee वर याच काळात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुलामुलींना या धोक्यांची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हा या मार्केटिंग आणि इव्हेंट फंड्यांना बळी न पडता सात्त्विकरित्या, आनंदाने, आपल्या परिस्थितीनुरूप जगदंबेची सेवा करा आणि देवीची कृपा संपादन करा, ही विनंती.
यापुढे शुभेच्छा देताना तरी सर्व हिंदूनी असे म्हणा, दस-याच्या, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हिंदू धर्मियांनी आपल्या परंपरा आणि आपल्या देवीची उपासना करणे हे परम कर्तव्य आहे🙏
संस्कृती जतन करणे आवश्यक आहे नाहीतर संस्कृतीचा नाश होईल🙏
🙏🚩 जय भारत 🚩🙏
Tuesday, 20 September 2022
राजभाषा पुरस्कार'
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते 30 वे 'आशीर्वाद राजभाषा पुरस्कार' प्रदान
विविध शासकीय निमशासकीय उपक्रमांच्या उत्कृष्ट गृहपत्रिकांना पुरस्कार
हिंदीच नव्हे; सर्वच भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 20 : केवळ हिंदीच नव्हे, तर देशात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भारतीय भाषा या राष्ट्रीय आहेत. सर्वच भाषा या भारतमातेच्या कन्या आहेत. त्यामुळे सर्व भाषांचा सन्मान केला तर तो हिंदी भाषेचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
'आशीर्वाद' या हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणाऱ्या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे '30 वे आशीर्वाद राजभाषा पुरस्कार' तसेच उकृष्ट गृहपत्रिका पुरस्कार राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कुलपती या नात्याने आपण प्रत्येक विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सूत्रसंचलन इंग्रजी भाषेत न करता मराठी भाषेत करण्याबद्दल आग्रही राहिलो. मराठी भाषा शिकण्यास देखील सोपी आहे, असे आपण स्वतः अनुभवले. हिंदी भाषा अनायासेच वाढत आहे व परदेशात गेल्यावर तर भारतातील सर्व राज्यातले लोक हिंदीतच संवाद साधतात, असे राज्यपालांनी सांगितले.
अनेक गृहपत्रिकांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत असून सार्वजनिक उपक्रम तसेच सरकारी संस्थांमध्ये अनेक प्रतिभावंत अधिकारी असल्याचे दिसून येते, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी हिंदी प्रचाराचे कार्य करणारे केंद्रीय कार्यालय - मध्य रेल्वे, रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (नौसेना), राष्ट्रीय औद्योगिक इंजिनियरी संस्थान (नीटी), राष्ट्रीयीकृत बँक - भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र, सार्वजनिक उपक्रम - भारतीय जीवन विमा निगम, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत पेट्रोलियम व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सर्वोत्तम राजभाषा कार्यान्वयन पुरस्कार नराकास, मुंबई उपक्रम, अध्यक्ष हिंदुस्थान पेट्रोलियम यांना देण्यात आला.
यंदापासून श्रेष्ठ मूळ साहित्यिक कृतीसाठी देण्यात येणारा स्वर्गीय डॉ.अनंत श्रीमाळी स्मृती पुरस्कार डॉ. सुलभा कोरे, सहायक महाप्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया यांना देण्यात आला.
दिनेश पारधी, भारतीय स्टेट बँक, पार्श्वगायिका कविता सेठ व सुप्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट अंकुर झवेरी यांना देखील आशीर्वाद राजभाषा गौरव पुरस्कार देण्यात आले.
अंबर (केंद्रीय कापूस प्राद्योगिकी संशोधन संस्था), युनियन सृजन (युनिन बँक ऑफ इंडिया), विकास प्रभा (आयडीबीआय बँक), रेल दर्पण (पश्चिम रेल्वे), जलतरंग (माझगाव डॉक), प्रयास (भारतीय स्टेट बँक) व प्रेरणा (द न्यू इंडिया अशुरन्स कंपनी) यांना उत्कृष्ट गृहपत्रिका पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाला आशीर्वाद संस्थेचे मानद अध्यक्ष बृजमोहन अग्रवाल, डॉ. उमाकांत बाजपेयी, नीता बाजपेयी, ज्युरी पत्रकार डॉ.वागीश सारस्वत, अध्यक्ष सुधा सिंह, उपाध्यक्ष डॉ. बनमली चतुर्वेदी, अरविंद राही, राजेश मिश्रा आदी उपस्थित होते.
००००
Governor Koshyari presents Ashirwad 'Raj Bhasha awards'
to central govt offices, banks, PSUs
Best House Magazine awards presented
Mumbai 20th Sept : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 30th Ashirwad Raj Bhasha Awards for 2022 at a function held at Raj Bhavan Mumbai on Tuesday (20th Sept).
The awards instituted by social, cultural and literary organisation Ashirwad were given away to selected Central Government offices, nationalized banks and Public Sector Undertakings for promoting Hindi through their work.
President of Ashirwad Brujmohan Agrawal, social worker Manju Lodha, Dr Umakant Bajpayi, Nita Bajpayi, Jury Dr Vageesh Saraswat, Sudha Singh, Dr Banmali Chaturvedi, Arvind Rahi and Rajesh Mishra were prominent among those present.
Central Railway, Principal Controller of Defence Accounts (Navy), National Institute of Industrial Engineering (Central offices category), SBI, Central bank of India, Union Bank of India and Bank of Maharashtra (Nationalized banks category), LIC, Nuclear Power Corporation of India, BPCL, Rashtriya Chemicals and Fertilizers (PSU category) and Hindustan Petroleum were given the Raj Bhasha Puraskars. Dr Sulabha Kore, AGM, Union Bank of India was given the late Dr Anant Shrimali memorial award)
House magazines Ambar, Union Srujan, Vikas Prabha, Rail Darpan, jaltarang, Prayas and Prerana were given the Best House Magazine awards.
Dinesh Parudhi, GM State Bank of India, Playback singer Kavita Sheth and Voice artist Ankur Chaudhari were given the Raj Bhasha Gaurav Puraskars.
0000
वृत्त क्र. 2638
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ठाणे मनपा
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची मुलाखत
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर बुधवार दि. 21 आणि गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर
यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले आहे. हा प्रकल्प राबविताना केलेल्या कामांची माहिती श्री. माळवी यांनी या कार्यक्रमातून दिली आहे. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देणारा हा प्रकल्प ठाणेकरांना दिलासा देणारा आहे. नागरिकांचा सहभाग घेऊन ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाची पायाभरणी केली. नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयामुळे प्रकल्पाला कशी गती देण्यात आली, याची माहिती श्री.माळवी यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
000000CM to chair working group of ministers for
implementation of National education policy
Mumbai, Sept. 20 – A working group of ministers under the chairmanship of Chief Minister Eknath Shinde has been formed to implement National education policy as per the recommendations made in the report of the task force appointed regarding the National education policy. There are six ministers including deputy chief minister Devendra Fadnavis as members of this working group.
This working group has been formed to concentrate on all educational aspects right from schools to skill development and higher and technical education as well as maintaining best quality along with autonomy in the field of education. This working group has been formed to coordinate and balance the investment and resources as per National education policy 2020 and ensure successful implementation of this policy at all levels including all educational institutions and departments at state level right from pre-primary to higher educational institutions.
This working group is chaired by chief minister while deputy chief minister is the member along with minister for higher and technical education, minister for skill development and entrepreneurship, minister for school education, revenue minister, minister for medical education, minister for agriculture. Principal secretary to the department of higher and technical education is the member-secretary of this working group.
This working group would work for effective monitoring of National education policy implementation. The working group has mandate of time to time review of various committees appointed on various subjects as per the recommendations of Dr Mashelkar committee, discuss changes made from time to time as per the new policy, review action taken by departments as per the recommendations by the subject committees and conduct policy level discussions on potential changes in higher education as per the new National education policy.
0000
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट.
मुंबई, दि. 20 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे.
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वायत्तता आणि उत्कृष्टता सक्षम करणे, शाळांपासून कौशल्य विकास तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षणापर्यंतच्या सर्व शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. राज्य स्तरावरील सर्व शिक्षण संस्था आणि विभागांना, पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षण संस्थांपर्यंत यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील दृष्टिकोनानुसार, गुंतवणूक आणि संसाधने यांचा मेळ घालण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.
या कार्यगटाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून सदस्यपदी उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, महसूल मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कृषी मंत्री तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव समितीचे सदस्य सचिव आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम सनियंत्रणासाठी म्हणून हा कार्यगट काम करेल. डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार विविध विषयांवर स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेणे व धोरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या नवनवीन बदलांबाबत चर्चा, विषय समित्यांच्या अहवालातील शिफारशींनुसार विभागामार्फत करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेणे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात करावयाचे बदल याविषयी धोरणात्मक चर्चा करणे अशी या कार्यगटाची कार्यकक्षा असणार आहे.
००००
सचिवालय जिमखाना
सचिवालय जिमखाना वार्षिक सर्वसाधारण सभा
28 सप्टेंबर रोजी
मुंबई, दि. 20 : सचिवालय जिमखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 28 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता सचिवालय जिमखाना, मुंबई येथे होणार असल्याचे सचिवालय जिमखाना व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबतची सूचना अहवालासह सचिवालय जिमखान्याच्या www.sachivalayagymkhana.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मतदानासाठी जिमखान्याचे सभासद/निवृत्त सभासद यांचेकडे जिमखाना / कार्यालय/ पॅन कार्ड अथवा आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे.
००००
शालांत शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर.
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठीची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची १८ ऑगस्ट, २०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल.
तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आयुक्त श्रीमती दराडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)