सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 17 September 2022
Friday, 16 September 2022
जन सुनावणी
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जातसमुह नावात
दुरुस्तीसंदर्भात २७ सप्टेंबरला जनसुनावणी.
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २७ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे सकाळी ११ वाजता जातसमुहाचे नाव बदलाबाबत सुनावणी होणार आहे.
यावेळी तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरूस्ती करण्याबाबत, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया, गुरूडी, गरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरूड कापेवार, गुरूडा कापेवार इ. तसेच हलवाई या जातीसमुहाच्या नावात दुरुस्ती करण्यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कर्जरोखे
महाराष्ट्र शासन कर्जरोख्यांची 8.84 टक्के दराने 17 ऑक्टोबर रोजी परतफेड
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.84 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थो
सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.
तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.84 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.
भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.
रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव शैला ए यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
भरती कर्मचारी
सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारीपदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १६: कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने एक अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार असून, त्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी आहे.
या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक / आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य). शिक्षण - एस.एस.सी. उत्तीर्ण., एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण आणि टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य. वयोमर्यादा ३० ते ५० वर्ष, मानधन रू. १७ हजार ८२३ दरमहा. अर्जाचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर असून मुलाखत २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन मेजर जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यासाठी पत्रव्यवहार आणि संपर्काचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, एडब्लूडब्लूए डायमंड वसतीगृहाच्या पाठीमागे, कलीना मुंबई विद्यापीठ उत्तर गेट समोर, सांताक्रुझ पूर्व, मुंबई - ४०००५५ दूरध्वनी - ०२२-३५०८३७१७, ई-मेल zswo_mumbaiupnagar@
अर्जासोबत युध्द विधवा/विधवा/माजी सैनिक/आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




