Friday, 16 September 2022

व्यापार उद्यम

 





व्यापारउद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी ना. नारायण राणे 

राज्यातीलउद्योग क्षेत्राला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणार - ना उदय सामंत 

महाराष्ट्र चेंबरच्यापदाधिकाऱ्यांसमवेत ८ दिवसात बैठक घेण्याचेअध्यक्ष ललित गांधी यांना ना. उदय सामंत यांचे आश्वासन 

महाराष्ट्र राज्य भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपालाआलेले आहे. वैद्यकीय उत्पादनक्षेत्रात सर्वात पुढे आहे जीडीपी मध्ये पुढे आहे आत्मनिर्भर भारत बनवणे वमहासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातूनबघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिकरणामुळे उत्पादनवाढते,उत्पादनवाढले की नफा वाढत जातो. आधुनिकीकरण ही काळाची गरजअसून स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. निर्यात वाढवा, आयात कमी करा असे केंद्रीयसूक्ष्म लघुउद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले. तसेच महाराष्ट्र चेंबरनेराज्यामध्ये उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, सूक्ष्म लघु व मध्यमउद्योगांना मदत करावी, बंद व आजारी उद्योग व्यवस्थित सुरूहोण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व शासनाची मदत मिळवून देण्यास सहकार्य करावे. सूक्ष्म लघु व मध्यमविभागाकडून महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल असे आश्वासनमहाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना ना. नारायण राणे यांनी दिले. राज्यातील व्यापार उद्योग कृषी क्षेत्राच्या विकासासाठीमहाराष्ट्र चेंबर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचेकौतूक ना. नारायणराणे यांनी याप्रसंगी केले. राज्यस्तरीय उद्योगपरिषदेमध्ये मुख्य पाहुणे भारत सरकारचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नाम.नारायण राणे यांनी भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची प्रगती भारतीयअर्थव्यवस्थेचे इंजिन या विषयावर मार्गदर्शन केले.महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीराज्यातील उद्योगांना गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करतआहे. महाराष्ट्र चेंबर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उद्योजक वाढविण्याचे जे काम करतेते कौतुकास्पद आहे. व्यापार उद्योगाच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्वसहकार्य व उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील. राज्यातील व्यापारउद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ८दिवसात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री सामंत यांनी महाराष्ट्रचेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले. मोठी गुंतवणूक वामोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन उद्योजकांना जास्तीत जास्तसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे उद्योग महाराष्ट्रातआणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री सामंत यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफकॉमर्स,इंडस्ट्रीअँण्ड अग्रिकल्चर तर्फे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत मेक इन महाराष्ट्रमध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर उद्योग मंत्री सामंत यांनी मार्गदर्शन केले. एमआयडीसीचेमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनीही यावेळी विशेषमार्गदर्शन केले.केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेयांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या 94 व्या वार्षिक अहवालाचेअनावरण करण्यात आले. तसेच महिला उद्योजकता समितीचे धोरण व युथ विंग समिती वसूक्ष्म,लघुव मध्यम उद्योग समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ना. नारायणराणे व ना. उदय सामंत यांचा सत्कार केला व प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय उद्योगपरिषदेची सविस्तर माहिती दिली तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यांमध्ये महिलासमिती व युथ विंग आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग समिती यांच्यामार्फत महिला वतरुणांसाठी “उद्योगवृद्धीयात्रा” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यातील 36 जिल्ह्यात महिला क्लस्टर, कृषी क्लस्टर व उत्पादनआधारित क्लस्टर ची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले. भारत अमेरिकेदरम्यानव्यापार उद्योग वाढीसाठी इंडो यूएस डेव्हलपमेंट फोरमची स्थापना महाराष्ट्र चेंबरतर्फे करण्यात आली असून परत अमेरिकेत गुळ व आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणारअसल्याचे सांगितले. व्यापार उद्योगांच्या विविध अडचणींची माहितीयाप्रसंगी दिली व राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी ला स्थगिती देण्यात यावी अशी मागणीअध्यक्ष ललित गांधी यांनी केली.याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललितगांधी, मुख्य पाहुणे भारत सरकारचेसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रीनाम. श्री. नारायण राणे व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री नाम.श्री. उदय सामंत, महाराष्ट्र सरकारचे पर्यटनव कौशल्य विकास मंत्री नाम. श्री. मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेशदाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ. शुभांगीतिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखरपुनाळेकर ,उपाध्यक्ष तनसुख झांबड, वर्ल्ड ट्रेड सेंटरचेचेअरमन विजय कलंत्री महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगनउपस्थित होते.राज्यस्तरीय परिषदेत महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्यव राज्यभरातील व्यापारी उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते. 

भारत-इराण मैत्रीसंबंध

 भारत-इराण मैत्रीसंबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी

कायदेमंडळांनी पुढाकार घ्यावा...

इराणच्या महिला संसद सदस्यांचा विधिमंडळात

उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते सन्मान

 

            मुंबईदिनांक 15 : भारत आणि इराण या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये कृषीव्यापारसुक्ष्म तंत्रज्ञानऔषधनिर्मितीखनिकर्म या क्षेत्रामध्ये व्यापारवृध्दीसाठी अपार संधी आहेत. दोन्ही देशांच्या कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन हे संबंध आणखी दृढ करावेत अशी अपेक्षा इराण संसदेच्या सदस्या डॉ. फातेमा घसेमपूर आणि डॉ. मोसूमेह बहराम यांनी व्यक्त केली. इराण संसदेच्या शिष्टमंडळाने आज  विधानमंडळाला सदिच्छा भेट दिली.

             महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा पुष्पगुच्छभेटवस्तू आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा इंग्रजी भाषेतील चरित्रग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या महिला सदस्यांसमवेत इराणचे भारतातील राजदूत डॉ. अली चेगेनीमुंबईतील इराणचे उच्चायुक्त श्री. ए. एम. अलिखानीइराणचे मुंबईतील व्यापार व वाणिज्य विभागाचे उच्चायुक्त श्री. सय्यद मोहम्मद मिराई आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत हे देखील यावेळी उपस्थित होते.

            यावेळी उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली योगदानाची माहिती दिली. महिला सबलीकरण आणि विकासासंदर्भात महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या योजनास्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला प्रतिनिधींसाठी ठेवण्यात आलेले आरक्षणमहिलांचा राजकीय सहभागमहाराष्ट्राचा सामाजिकसांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांना उजाळा देत त्यांनी दोन्हीकडील लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या अभ्यासगटांच्या भेटी आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

            इराणमध्ये महिलांना आम्ही केवळ कुटुंबातील महत्वाचा नव्हे तर अर्थकारणातील महत्वाचा घटक मानत आहोत. व्यापारउदीमामध्ये इराणमध्ये महिलांनी मोठी आघाडी घेतली आहे. दोन्ही देशातील महिलांच्या यशोगाथा प्रत्यक्ष भेटीगाठीद्वारे तसेच समाजमाध्यमांद्वारे मांडल्या जाव्यात ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळेलदोन्हीकडील कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा असे मत इराणच्या महिला संसद सदस्या तसेच वाणिज्यदूतांनी यावेळी व्यक्त केले.

*****




सिंचन

 राधानगरी तालुक्यातील 9 सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राधानगरीतील जलसंपदा- जलसंधारण योजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.

            मुंबई, दि. 15 :- कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष भौगोलिक परिस्थिती पहाता ९ विविध योजनांच्या कामांसाठी ५८ कोटी रुपये खर्चास दिलेली स्थगिती उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

            मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राधानगरी विधानसभा मतदार संघातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. आमदार प्रकाश आबिटकर यांचेसह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, सचिव (लाभक्षेत्र विकास) विलास राजपूत आदी उपस्थित होते.

            महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सुमारे 58 कोटी रुपये किंमतीच्या 9 योजनांच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे 347 हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. पालबुद्रुक, नवरसवाडी, पंदीवरे, दुर्गमानवाड इत्यादी भागातील पाझरतलाव, साठवणतलाव, उपसासिंचन योजना, कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे बांधणे आदींसाठी सुमारे 58 कोटी रुपये खर्चावरील स्थगिती उठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            राधानगरी मतदार संघातील 15 उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षण कामांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. तसेच भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटल्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी 45 कोटी रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय उर्वरित 100 कोटींच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावावर सर्वेक्षण करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            कालवे आणि साठवण तलावांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन होणे काळाची गरज असून पिण्यासाठी आणि शेतीसाठी लाभ व्हावा याकरिता योग्यप्रकारे पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी जलसंपदा-जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना केले.

00000



उद्योग व रोजगार वाढवण्याकरिता

 उद्योग व रोजगार वाढवण्याकरिता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,

इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर या संस्थेचे मार्गदर्शन महत्त्वाचे

- केंद्रीय मंत्री नारायण राणे

            मुंबई, दि. 15 : राज्यात उद्योग व रोजगार वाढविण्याकरिता महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर या संस्थेचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

            वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि उद्योजक उपस्थित होते.

            केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर चे राज्याच्या औद्योगिकरणात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.

            महाराष्ट्र चेंबरची महिला उद्योजिका समिती व युवा उद्योजक समिती ने नवउद्योजक घडविण्यासाठी जे अभियान व धोरण निश्चित केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल व संयुक्तपणे कार्य करेल. महाराष्ट्र चेंबर महिलांसाठी व अन्य क्षेत्रांसाठी क्लस्टर्स उभारणी करत आहे ज्याचा राज्याच्या विकासात मोठा फायदा होईल. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

            देशाच्या विकासात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे बहुमोल योगदान आहे.शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून उद्योगाला पूरक असे धोरण केंद्र सरकार राबवित आहे. उद्योग क्षेत्राच्या विविध प्रस्ताव व समस्यांसंबंधी 'महाराष्ट्र चेंबर' च्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करू. महाराष्ट्रात नवीन गुंतवणुक व आधुनिक तंत्रज्ञान येण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत बिझनेस कॉन्फरन्स आयोजित केली ही बाब कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात मुंबई येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ट्रेड एक्सपो’ आयोजित केला आहे. यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असेही केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात मोठी गुंतवणूक व रोजगार उपलब्ध करणारे उद्योग आणणार.

 - उद्योग मंत्री उदय सामंत

            राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले,मोठी गुंतवणूक वा मोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संस्थेच्यावतीने ज्याप्रमाणे जिल्ह्यात जाऊन उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो, त्याप्रमाणे शासनही उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. संस्थेच्या उपक्रमासाठी शासनाकडून मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यामध्ये उद्योग आणि रोजगार वाढवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी प्रास्ताविक केले. विविध उद्योगात प्रगती करणाऱ्या उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000


हेटवणे धरण तुडुंब


 

सतर्क रहा

 हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले : नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

पेण दि.  ( प्रतिनीधी ) पेण तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हेटवणेे धरण 100% भरून ओव्हरफ्लो होत असल्याने या धरणाचे 6  दरवाजे एका फुटांनी उघडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकिनारी व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 पेण तालुक्यातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हेटवणे पूर्णतः भरले आहे. या धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचेे 6 दरवाजे 1 फुटांनी उघडले आहे. त्यातुन 120 घन मिटर लिटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे.

  नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. सदचेर दरवाजे केवळ सावधानता बाळगण्याकरिता उघडण्यात आले आहेत अशी माहिती हेटवणे धरणाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जाधव व उपविभागीय अभियंता आकाश ठोंबारे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या तरी पूरपरिस्थिती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे.

शैक्षणिक साहित्य देवूया





 🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻 शैक्षणिक साहित्य देवूया 

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आमच्या घरी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने साखर चौथीचा गणपती दि. 13/9/2022 रोजी गणपती बाप्पाचे 5 दिवसांसाठी आगमन झाले आहेत. आपण सर्वं दर्शनासाठी आतुरतेने येणार परंतु यावर्षी गणपती दर्शनाला येताना बाप्पाला पेढे, लाडू, मोदक, हार, फुल, फळ न आणता *बाप्पाच्या चरणी शैक्षणिक साहित्य (वही, पेन, पेन्सिल, ई.)* आणलेत तर बरं होईल. या तत्वावर आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद म्हणून हेच शैक्षणिक साहित्य आपण एखाद्या गरीब गरजू किव्वा अनाथ आश्रम मध्ये तीर्थ प्रसाद म्हणून देऊ. यामागे आम्हा हसनबाई मारुती आणि कोळी परिवाराचे एकच उद्दिष्ट आहे की गणपती बाप्पाला हार फुल सर्वच आणतात त्या फुलांचा सुगन्ध 2-3 दिवस राहणार, परंतु आपण जर बुद्धीच्या देवते समोर जर शैक्षणिक साहित्य अर्पण केले तर नक्कीच त्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग गोर गरीब, गरजू आणि अनाथ आश्रमातील मुलांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच गोर गरीब अनाथ विद्यार्थ्यांना एक शिक्षणाची मदत होईल.

सर्वांना माझा मनापासून निमंत्रण आहे.

संकल्पना गोर गरीब अनाथ मुला मुलींसाठी असेल तर नक्कीच त्यांच्या हिताचे विचार करणारे सुद्धा महान माणसे या संकल्पनेत पुढाकार घेत असतात.

त्याच प्रमाणे आमच्या हसनबाई मारुती आणि कोळी परिवाराच्या गणपती बाप्पाचे दर्शनाला यायला जमलं नाही म्हणून रायगड जिल्ह्यातून महाड शहरातून माझी मैत्रिण *सौ स्वाती शेट मॅडम* यांनी नवीन संकल्पने नुसार गोर गरीब, अनाथ मुलांसाठी 501 रुपयाची शैक्षणिक साहित्य खरेदी साठी गणपती बाप्पाच्या चरणी मदत अर्पण केली.

नवघर गावातील माजी सरपंच नकुल महादेव कोळी व यांच्या कुटुंबियांने सामाजिक हिताची जाण ठेवून बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण केले, तसेच रसायनी विभागातील सुप्रसिद्ध डॉ. मोहन रोटकर, डॉ. मनाली रोटकर यांचे कुटुंब, श्री.विजय पांडुरंग कोळी, सौ.दर्शना भोईर, तसेच ज्यांना प्रत्यक्षात बाप्पाच्या दर्शनाला येता येत नाहीत परंतु ऑनलाईन दर्शन घेऊन नवीन संकल्पना आवडल्याने घरी बाप्पाच्या चरणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी साठी रुपये पाठवून बाप्पाला अर्पण करण्यात आले.

अजून बरेचशे मित्र परिवार आणि आप्टेंष्ठ दर्शनाला येणार आहेत. नक्कीच या संकल्पनेतून 

*निमंत्रक : देवेंद्र मारुती कोळी आणि कोळी परिवार*

Featured post

Lakshvedhi