Friday, 16 September 2022

दिलखुलास’

 दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या

 कविता संघवी यांची मुलाखत

 

             मुंबईदि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर'  या ॲपवरून सोमवार दि. 19 सप्टेंबर व मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुंबईतील चत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी शाळेत राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रम याची माहिती दिलखुलास कार्यक्रमात दिली आहे.

00000

लम्पी चर्म रोग बाधित


 लम्पी चर्म रोग बाधित पशुधनाच्याऔषधांचा सर्व खर्च शासन करणार

- राधाकृष्ण विखे पाटील

            पुणे, दि. १६: राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

            पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. डी. डी परकाळे आदी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील म्हणाले, राज्यासाठी एका आठवड्यात ५० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रूपये प्रमाणे मानधन सुरू करावे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लम्पी चर्म रोगाबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा.

            राज्य शासनाने वेळेत उपाययोजना केल्याने हा आजार नियंत्रणात आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाचा वेग वाढविण्यात आल्याने देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. आजारावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पाच किलोमीटर परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून येत्या काळात हा वेग अधिक वाढेल, असा विश्वास श्री. विखे पाटील त्यांनी व्यक्त केला.

            श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, मृत जनावरांसाठी गाय ३० हजार, बैल २५ हजार आणि वासरू १६ हजार याप्रमाणे मदत पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल आणि राज्य पातळीवरील हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर देखील हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हशींवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने म्हशींच्या संदर्भातील केंद्र सरकारची मंजुरी घेऊन बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात येईल. पशुपालकांनी भयभित न होता जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाची लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

            प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी राज्यभरात पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलेल्या औषध पुरवठा व इतर उपाययोजनांची माहिती दिली.

            पशुसंवर्धन आयुक्त श्री. सिंह म्हणाले, शासन सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असून पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जनजागृतीवर भर द्यावा. लसमात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून अधिक लसीकरण असलेल्या जिल्ह्यांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येईल.

            या बैठकीस दूरदृश्‍य प्रणालीद्वारे राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना


निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

            मुंबई, दि. १६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

      “संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती लढा हा प्रदीर्घ लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक ज्ञात व अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढ्यातील सर्व हुतात्म्यांना आपली भावपूर्ण आदरांजली वाहतो. या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरूवात होत आहे. राज्यातील सर्व जनतेला तसेच आज जगभर विखुरलेल्या मराठवाड्यातील बंधू – भगिनींना मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


०००

Governor greets people on Marathwada Mukti Sangram din 

      Mumbai Dated 16 : The Governor Bhagat Singh Koshyari has greeted the people of State particularly those from Marathwada on the occasion of Marathwada Mukti Sangram Din.

      In a message, the Governor has said: “The struggle for the liberation of Marathwada was long and protracted. Many known and unknown martyrs laid down their lives for securing liberation of Marathwada. I salute the memory of all the martyrs who sacrificed their life in the struggle for the liberation of Marathwada. The Platinum Jubilee celebrations of the Marathwada Mukti Din start from this year. I extend my heartiest greetings and good wishes to the people of the State and the people of Marathwada scattered all over the world on the occasion of Marathwada Mukti Sangram Din.”

0000



जागतिक ओझोन दिनानिमित्त

 पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा





जागतिक ओझोन दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन.

            मुंबई, दि 16 : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र शासन आपले संपूर्ण योगदान देत आहे. फ्रीज, एसीसारख्या उपकरणांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अशा विविध पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण रक्षणासाठी स्वत:पासून सुरूवात करून हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            जागतिक ओझोन दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या प्रतिनिधी शोको नोडा, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार राजश्री रे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ओझोन कक्षाचे अतिरिक्त संचालक आदित्य नारायण सिंग, मुंबईतील विविध शाळांचे विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, जीवनात ऑक्सीजनप्रमाणेच ओझोनचा थर महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. प्रदूषणामुळे ओझोनच्या थरात छेद होऊन जीवनावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्या संरक्षणासाठी मांट्रियल येथे करार करण्यात आला. हायड्रोफ्लुरोकार्बनची पातळी खाली आणण्यासाठी किगाली येथे सुधारणा करार करण्यात आला. भारत या करारामध्ये सहभागी असून हायड्रोफ्लुरोकार्बनची पातळी कमी करण्यासाठी भारतात विविध उपाययोजना आखण्यात येत असून महाराष्ट्र शासन या कामी आपले संपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांमध्ये ओझोनबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून पर्यावरण मंत्रालयामार्फत याबाबत जाणीवजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पर्यावरणाच्या अनुषंगाने कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक असल्याने शासकीय जमिनीवरील कांदळवन क्षेत्र ‘संरक्षित वन’ अंतर्गत आणण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री.शिंदे म्हणाले, प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भावी पिढीसाठी ओझोन थराचे संरक्षण करणे आवश्यक असून शासनाबरोबरच देशातील सर्व सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सामूहिक सहभागाची आवश्यकता आहे. नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढवून हे लक्ष्य गाठण्याकडे तसेच ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दूर करण्याकडे आपण वाटचाल करू शकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शाश्वत विकास आवश्यक - केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव

            केंद्रीय मंत्री श्री. यादव म्हणाले, विकास हा अत्यावश्यक आहे. त्यासाठी ऊर्जेचा वापरही गरजेचा आहे. तथापि ऊर्जेचा अपव्यय न करता त्याचा जागरूकपणे वापर करून शाश्वत विकास घडवून आणणे गरजेचे आहे. जल वायु परिवर्तन ही मोठी समस्या असून प्लास्टिकचा मर्यादित वापर करतानाही ते पुन्हा वापरता येणारे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ओझोनच्या रक्षणासाठी माँट्रियल येथे झालेल्या करारात भारत देखील सहभागी झाला असून नुकताच भारताने तयार केलेला ‘कुलींग ॲक्शन प्लॅन’ जगासमोर मांडला आहे. भारतात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या माध्यमातून 2070 सालापर्यंत भारत ‘नेट झिरो’चे उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास व्यक्त करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी मानवाने आपल्या जीवनशैलीमध्ये पूरक बदल घडविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.चौबे यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देताना, निसर्ग तेव्हाच आपले रक्षण करेल जेव्हा आपण त्याचे रक्षण करू’. विद्यार्थी यामध्ये मोठी जबाबदारी पार पाडू शकतात असे सांगून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून लवकरच आपण 1980 पूर्वीची परिस्थिती आणण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर यांनी वातावरणात होत असलेले बदल हे सत्य असून ते मान्य करून त्याबाबत उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ओझोनच्या संरक्षणासाठी भारताने मागील काही वर्षांमध्ये भरीव कामगिरी केल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास मोठ्या संख्येने असलेली शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनशैलीत किमान एक पर्यावरणपूरक बदल घडवून आणण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले.

ओझोन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘पोस्टर’ आणि ‘स्लोगन’ स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात येऊन त्यांचे सर्वांनी कौतुक केले. तर पर्यावरणविषयक विविध पुस्तके आणि अहवालांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

काय आहे माँट्रियल करार

            सूर्याच्या हानीकारक किरणांच्या उत्सर्गामुळे वनस्पती, प्राणी तसेच शेतीवरही परिणाम होऊ शकतो आणि पर्यावरणीय व्यवस्थांचाही नाश होऊ शकतो. ओझोनचा थर या किरणांना पृथ्वीतलावर येण्यास अटकाव करतो. माँट्रियल करार हा ओझोन थराच्या संरक्षणासाठी विविध देशांनी एकत्र येऊन केलेला एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करार आहे. पर्यावरणविषयक नियम-व्यवस्था अधिकाधिक देशांनी मान्य करून तिची अंमलबजावणी केल्यास, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी ठरू शकते, याचे हा करार द्योतक मानला जातो.

००००



 

सुनावणी मागास प्रवर्ग

 राज्य मागासवर्ग आयोगाची अकोला येथे जन सुनावणनी

            मुंबई दि. 16 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अकोला येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केले आहे. ही सुनावणी अमरावती विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वा पासून होणार आहे.

            या सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहांमध्ये तेलंगी ऐवजी तेलगी तसेच अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार व हलवाई अशा जाती समूहांची सुनावणी होणार आहे, असे संशोधन अधिकारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



काऊवा पाहिजे

 


सुरळी

 *डिग्री 🎓 संपवून नोकरी शोधत असताना समजते की,*


🏛 university वाले 


डिग्रीचे certificate *सरळ* न देता,


 🗞 *सूरळी करुन* का देतात !!!


🙊😂

Featured post

Lakshvedhi