Wednesday, 14 September 2022

अशोक सराफ यांनी नाट्य - सिने क्षेत्रात



 अशोक सराफ यांनी नाट्य - सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. 13 : आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कलासाहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य - सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केलेअसे सांगताना युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करावे परंतु अशोक सराफ यांच्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा ध्यास घेतला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.   

            मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ५५ व्या युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. 

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते वयाची ७५ वर्षे तसेच चित्रपट - रंगभूमीवरील ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी - सराफ यांचेसह सत्कार करण्यात आला.

            देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. आगामी काळ देशासाठी तसेच अशोक सराफ यांचेसाठी देखील अमृत काळ ठरेल अशी आशा व्यक्त करताना युवकांनी अशोक सराफ यांच्या अद्भुत कार्यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

लोकांचे प्रेम हीच ऊर्जा : अशोक सराफ

            मुंबई विद्यापीठाच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आपण भारावलो. लोकांचे प्रेम हीच ऊर्जा आहेअसे सांगताना 'तुम्ही लोकांनी मला इथपर्यंत आणून ठेवलंअशी भावना सराफ यांनी यावेळी व्यक्त केली.   

            कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्केज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी -सराफविविध विभागांचे अधिष्ठाताशिक्षक तसेच युवा महोत्सवात सहभागी होणारे विद्यार्थी कलाकार उपस्थित होते. निलेश सावे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुनील पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.

००००

 

Maharashtra Governor inaugurates 55th Youth Festival; felicitates Ashok Saraf on completion of 75

            Maharashtra Governor and Chancellor of University Bhagat Singh Koshyari inaugurated the 55th Inter University Youth Festival of theatre, music and dance being hosted by the University of Mumbai at the Cawasji Jehangir Convocation Hall in Mumbai on Tue (13 Sept). 

            The Governor also felicitated popular film personality Ashok Saraf on the latter's completion of 50 years in film and theater and 75 years of age.

            Officiating Vice Chancellor of the University of Mumbai Dr Digambar Shirke, actress Nivedita Joshi- Saraf, Deans of various faculties, teachers and student artists participating in the Youth Festival were present.


पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे

 पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता देण्यासाठी

मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महारेलला निर्देश

            मुंबईदि. 13 : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यानपुणे- नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करावाअशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

            महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) च्या पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गासह इतर प्रकल्पांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळेहेमंत गोडसेश्रीरंग बारणे, ‘महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वालमुख्य सल्लागार सत्यप्रकाशमुख्यमंत्री सचिवालयाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग या २३५ कि.मी. प्रकल्पाचा लाभ पुणेअहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला होणार असून देशातील सर्वात किफायतशीर अतिजलद मार्ग म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. १६ हजार ३९ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात महाराष्ट्र शासनाचा ३ हजार २७३ कोटी रुपयांचा हिस्सा आहे. या खर्चाला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली असून सर्व आवश्यक त्या परवानग्या या प्रकल्पाला मिळाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरु करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केल्या.

पुणे-नाशिक रेल्वे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बैठक सुरु असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि महारेलच्या प्रकल्पांची माहिती दिली. पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या  विनंतीवर कार्यवाही करण्यात येईलअसे  रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

इगतपुरी-मनमाड प्रस्तावित रेल्वे मार्ग कसाऱ्यापर्यंत वाढवा

            इगतपुरी-मनमाड तिसराचौथा रेल्वे मार्ग कसाऱ्यापर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी महारेल’ ला दिल्या. तसेच इगतपुरी- मनमाड तिसरा व चौथा मार्ग (१२४ कि.मी.)सल्वा-बुटीबोरी कॉर्ड लाईन (५१ कि.मी.)औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग (८८ कि.मी.)रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग (३२ कि.मी.)गडचांदूर- मुकुटबन-आदिलाबाद रेल्वे मार्ग (७० कि.मी.) या प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे प्राप्त झाले आहेतलवकरच बैठक घेऊन प्राधान्याने हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत नवीन केबल स्टेड उड्डाणपूलांची उभारणी सुरु

            मुंबई महानगरात रेल्वे मार्गांवर असलेल्या जुन्या उड्डाणपूलांच्या जागी नवीन केबल स्टेड उड्डाणपूल महारेल’ कडून उभारण्यात येत आहे. या उड्डाणपूलांचे काम अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ते अधिक आकर्षक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर दादर टिळक उड्डाणपूलबेलासिस उड्डाणपूलमध्य रेल्वे मार्गावर रे रोडघाटकोपरऑलिव्हंटगार्डनभायखळाऑर्थर रोडकरी रोडमाटुंगा लेबर कॅम्पजवळ (भुयारी मार्ग) येथे तर पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर लोअर परळ येथे हे नवीन केबल स्टेड उड्डाणपूल उभारले जात आहेत.


सुंदर बाई, मुंबई

 मुंबईच्या सुशोभीकरणाची कामे महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

रस्ते दुभाजकवाहतूक बेटंस्कायवॉकपदपथ यांना मिळणार झळाळी

 

            मुंबईदि. 13 : मुंबईचे सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटंदुभाजकपदपथस्कायवॉकसमुद्र किनारेउद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावीअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुशोभीकरणाचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सादरीकरण केले. खासदार राहुल शेवाळेएमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासबेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रामुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेपी. वेलारासूसंजीवकुमारआशिष शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

            मुंबई महापालिकेच्या हद्दीत २०५० किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये सुमारे ९९० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. २०९ किमीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. ऑक्टोबरपासून ४५० किमी लांबीच्या रस्त्यांचे पूर्नपृष्टिकरण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण करा. खड्डे पडणार नाही याची दक्षता घ्यावीअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            मुंबई शहरातील ३०० किमी लांबीच्या विविध ठिकाणच्या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोकळ्या जागेत फुल झाडांची लागवड करणेबोधचिन्हेसिग्नल यांचा कलात्मकरित्या सजावट करणे अशी कामे पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहरपश्चिम व पूर्व उपनगरातील दुभाजकांचा समावेश आहे.

            पदपथांचे सुशोभीकरण करताना वर्दळीच्या ठिकाणची आणि रेल्वेस्थानकांजवळील पदपथांचे सुशोभीकरण करावे,अशी सूचना मुख्यमंत्र्यानी केली. सुमारे १७० किमी लांबीच्या पदपथांवर प्रकाश योजना व सजावट केली जाणार आहे.

            पुलांखालील मोकळ्या जागेचा वापर करण्यात यावा. त्याठिकाणी स्वच्छता ठेवावी. रंगरंगोटी करण्यात यावीअसेही श्री. शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील २५ महत्त्वाच्या पुलांची रोषणाई केली जाणार आहे. १८ स्कायवॉकना रोषणाई केली जाणार असून विविध आकाराचे स्ट्रीट फर्निचर देखील महत्त्वाच्या पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यात ६१ वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

            जुहूगिरगाव चौपाटीअक्सावर्सोवादादरमाहीमगोराई या सात समुद्र किनाऱ्यावर त्रिमितीय प्रतिमाकलाकृतीशिल्प साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्यानांमध्ये प्रकाशित कारंजेपदपथ करण्यात येणार आहे. उद्याने पर्यटन स्थळे बनू शकतील यासाठी ग्लो उद्यान संकल्पना राबविली जाणार आहे.

            वांद्रे किल्लावरळी किल्लागेट वे ऑफ इंडियाएशियाटिक वाचनालयमाझगांव उद्यानअफगाण चर्च याठिकाणी प्रकाश योजनेच्या माध्यमातून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यावेळी मियावाकी तंत्रज्ञानगेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण याबाबत आढावा घेण्यात आला. मुंबईत २६ ठिकाणी धारावीच्या धर्तीवर तीनमजली स्वच्छतागृह करण्यात येणार असून अत्याधुनिक बस थांबे करण्यात येणार आहेत.


मोफत सेवा आरोग्य

 मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखानाच्या माध्यमातून२ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा

पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

            मुंबई, दि. 13 : सामान्य मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईत सुमारे २२७ आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.

L

            सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. झोपडपट्टीभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटची संख्या वाढवावी तसेच मॅमोग्राफीसाठी देखील मोबाईल व्हॅन सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे क्लिनिक आणि पॉलिक्लिनिक चालविण्यात येणार आहे. सध्या ५० ठिकाणी या क्लिनिकचे काम पूर्ण झाले असून शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत २२७ क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३४ पॉलिक्लिनिक असणार आहेत. त्याद्वारे विशेषज्ञांची सेवा मिळणार आहे. पोर्टाकॅबिन आणि पक्के बांधकाम अशा दोन स्वरूपात हे क्लिनिक चालविण्यात येणार आहे.

            साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येकरीता एक याप्रमाणे हे क्लिनिक सुरू करण्यात येईल. सकाळी सात ते दुपारी दोन, दुपारी तीन ते रात्री दहा अशी रुग्णाच्या सोयीनुसार दोन सत्रात या दवाखान्याची वेळ असणार आहे. या दवाखान्यात एक एम बी बी एस डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता, आणि बहुउद्देशीय कामगार असे मनुष्यबळ असेल. पॉलीक्लिनिक महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी असेल. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी करण्यात आहे. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादरीकरण केले.

००००



 



Sports planning

 


देव तारी

 _*९/११ च्या हल्ल्या नंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर कार्यालय मधील माणस सुखरुप असण्यामागची छोटी, छोटी कारण... 🤔😌*_

कारणा वाचून काहीच घडत नसतं.

९/११ च्या हल्ल्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर मधे कार्यालय असलेल्या एका कंपनीने त्या दिवशीच्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे अनुभव मनमोकळेपणाने कथन करता यावे यासाठी एक कार्यक्रम आयोजीत केला होता. 

ती माणस सुखरुप असण्यामागची छोटी, छोटी कारण स्तिमीत करणारी होती. 

* चिरंजीवांचा बालवाडीतील पहिला दिवस असल्यामुळे त्या कंपनीचा प्रमुख त्या दिवशी उशिरा आला होता.

* एका रस्ते अपघातामुळे झालेल्या प्रदीर्घ ट्रॅफिक जाम मधे अडकून एक जण उशिरा आला होता.

* एका महाशयांची नेहमिची बस चुकली होती.

* कार्यालयात यायला निघाले, आणि कार स्टार्टच होईना, असे एकाच्या बाबतीत घडले.

* एक सदगृहस्थ इमारतीत प्रवेश करतानाच फोनची बेल वाजली. बोलण्यासाठी बाहेर थांबले, त्यामुळे त्यांना उशिर झाला.

* एक सकाळी सकाळीच बाप झाला त्यामुळे ऑफिस ला निघालाच नाही.

* एकाला त्यादिवशी लवकर टॅक्सीच मिळाली नाही.

* सगळ्यात मजेदार वाटावी अशी गोष्ट म्हणजे एकाने त्या दिवशी नवीन कोरे बुट पायात घातले. 

 त्याच्या एका पायाला नवीन बुट चावला म्हणून तो बॅंड एड पट्टी घ्यायला औषधांच्या दुकानात थांबला आणि म्हणून तो आज जीवंत होता. 

तेव्हापासून जेव्हा मी रहदारीत अडकतो ;

माझी लिफ्टची फेरी चुकते ;

फोन घेण्यात माझा वेळ जातो ;

आणि अशा अनेक गोष्टी जेव्हा मला संताप अनावर होतो, मी अस्वस्थ होत असतो तेव्हा मी एकच विचार करतो ..!!

*"बेटा, तु या क्षणी जिथे असायला हवा त्या योग्य जागीच आहेस...."*

ह्या नंतर कधी एखाद्या सकाळी तुमच्या तयारीत घोळ झाला असेल, 

मुल शाळेचा गणवेश घालायला त्रास देत असतील,

 वेळेवर कारची किल्ली सापडत नसेल,

 रस्त्यात सगळे सिग्नल लाल दिसत असतील....

तर रागावू नका, 

त्रागा करु नका...!!!


एक गोष्ट कायमची ध्यानात ठेवा....!


*तुम्ही योग्य वेळी या योग्य जागी आहात.*


सुखरूप घरी परत आल्यावर देवाचे आभार माना . 

कायस्वरूपी कृतज्ञता बाळगा!!!


                    🙏🏻 😌 🙏

Tuesday, 13 September 2022

शक्तिदाता बुध्दी दाता darshnam

 *इतका मोठा गणपती अख्या महाराष्ट्रात नाही!!! कुठलीही फालतुगिरीनाही,DJ नाही,अचकट विचकट गाणी डान्स नाही!!! अत्यंत भाक्तीभावाने परिपूर्ण अशी मिरवणूक... बोध घ्यावा अशी  मिरवणूक तामीळनाडू (साऊथ)येथील आहे...🙏🏻🌸👇🏻🌸👇🏻🌸👇🏻


Featured post

Lakshvedhi