Sunday, 11 September 2022

विभागीय मुख्यमंत्री सचिवालय

 


नागरिकांनी तक्रारीअर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे

विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश  

 

मुंबईदि.11: ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुखपारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

            नागरिकांनी देखील आपल्या तक्रारीनिवेदनेअर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेसुशासन नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 8 सप्टेंबरला घेतलेल्या बैठकीत विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या कामकाजाविषयी चर्चा झाली. नागरिकांचे विविध प्रश्न आणि शासनस्तरावरील कामे तालुकाजिल्हा पातळीवरच निकाली निघावेत यासाठी विभागीय मुख्यमंत्री सचिवालय अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  मुख्य सचिवांना दिल्या.

            नागरिकांची शासनस्तरावर असलेली कामेत्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्जनिवेदने आदी मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात स्विकारून त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीयस्तरावर कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखतापारदर्शकतागतिमानता आणतानाच सर्वसामान्य जनतेला कमी त्रास व्हावा या हेतूने कोकणअमरावतीपुणेनाशिकऔरंगाबादनागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय (सीएमओ) यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे.

            विभागीय आयुक्त कार्यालयांमधील महसुल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ते याबाबत संनियंत्रण करीत असून विभागीय कक्षांमध्ये अर्ज स्विकारणेपोच पावती देणेअर्जावर कार्यवाही करणे तसेच प्राप्त अर्जत्यावरील कार्यवाही केलेले अर्ज व प्रलंबीत अर्ज इ. बाबतचा मासिक अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवितात. मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचे या क्षेत्रियस्तरावरील मुख्यमंत्री कार्यालयावर संनियंत्रण केले जात आहे.

            माहिती अधिकाराअन्वये प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जावर प्रशासकीय विलंब टाळण्याच्या दृष्टीने व तातडीने कार्यवाही होण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जन माहिती अधिकारीसहायक जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांना पदनिर्देशित करण्यात आले आहे.

सफाई mohim


 माणुसकी प्रतिष्ठान , अलिबाग किनारपट्टी 

भले भी हम


 

आभार महा पोलिस


 

L most

 *Life begins with our cry. Life ends with others cry*

*Fill this gap with as much laugh as possible.*

*Always be happy and make others happy too.*

          😂😂😂😂😂😂

         *Good Morning*

   *Have a relaxed Sunday*

साथ संगत


 

सुप्रभात






 

Featured post

Lakshvedhi