Saturday, 20 August 2022

Statrt up

 मुंबईत शनिवारी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा

 

            मुंबईदि. 18 : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट2022 रोजी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर परिसरातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजक उमेदवारांनी या यात्रेत सहभाग नोंदवावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रविंद्र सुरवसे  यांनी केले आहे.

            मुंबई शहरामध्ये 20 ऑगस्ट2022 रोजी स. 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठफोर्टएच.आर.कॉलेज व चर्चगेटहिंदुजा कॉलेजचर्नीरोडआणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी सादरीकरण होईल. स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणाऱ्या प्रतिभागीपैकी जिल्ह्यातून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप प्रथम रु. 25 हजारद्वितीय रु. 15 हजार आणि तृतीय रु. 10 हजार असे राहिल. तसेच सर्वात्तम 10 (अव्वल 3 विजेत्यांसह) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल.

            महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व नवउद्योजक हे जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या प्रत्यक्ष ठिकाणी किंवा www.msins.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (022) 22626303 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनश्री. सुरवसे  यांनी केले आहे.

            राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018" जाहिर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता तसेच राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्यरोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संपूर्ण राज्यात "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे" आयोजन करण्यात आले आहे.

00000

इरशाद बागवान/विसंअ/18.8.22


Govinda


 

पुरस्कार

 दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 18 : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २८ ऑगस्ट, २०२२ पर्यंत आहे.

            अर्ज, नामांकने www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याचे आवाहन दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.

            राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व २०२२ करिता दि. २८ ऑगस्ट २०२२ पूर्वी प्राप्त अर्ज, नामांकने विचारात घेण्यात येतील. सन २०२१ आणि सन २०२२ करिता स्वतंत्ररित्या अर्ज, नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL.www.awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

            पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येतील, असे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी कळविले आहे.

सावधान

 जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्याफसव्या संकेतस्थळांबाबत सावध रहा.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन.

            मुंबई, दि. 18 : जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यू महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

            भारत सरकारच्या अधिकृत मूळ संकेतस्थळांची नक्कल करुन CRSORGIGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATONLINE.COM अशा काही फसव्या, बनावट संकेस्थळांच्या माध्यमातून समाजकंटकांद्वारे नोंदण्या केल्या जात आहेत. ही संकेतस्थळे अधिकृत मूळ संकेतस्थळांसारखीच आहेत. नागरिकांकडून जन्म - मृत्यू प्रमाणपत्रांसाठी रक्कम घेतली जात आहे. नागरिकांनी अशा संकेस्थळांवर जन्म – मृत्यू घटनांची नोंदणी करु नये.

            जन्म – मृत्यू नोंदणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, शहरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कार्यकारी अधिकारी, कटक मंडळे (कॅन्टोनमेन्ट बोर्ड), शासकीय आरोग्य संस्थेचे प्रमुख (जर घटना शासकीय आरेाग्य संस्थेत घडली असेल तर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००

Covid

Continue.  गृहभेटीद्वारे (हर घर दस्तक) शंभर टक्के लसीकरणाचे प्रयत्न.

•कोविड १९ लसीकरण कमी असलेली गावे, तालुके, वॉर्ड याबाबत माहिती संकलीत करुन प्राधान्याने त्या गावातील लसीकरण सत्रांचे आयोजन.

• जिल्हा, मनपा तसेच तालुकास्तरावर टास्क फोर्स बैठकांचे आयोजन

•सुक्ष्मकृती नियोजन आराखड्याच्या मदतीने लसीकरण सत्रांचे आयोजन व अंमलबजावणी

• लसीकरण सत्रांची संख्या वाढविण्यासोबतच लाभार्थ्यांना सोईच्यावेळी सत्रांचे आयोजन

•कोविन प्रणालीचा सहाय्याने ड्यूलिस्टचा वापर (दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी) करुन प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे पाठपुरावा

•’हर घर दस्तक’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण झालेल्या व्यक्तीची माहिती घेत लसीकरण राहिलेल्या व्यक्तींचा पाठपुरावा. लाभार्थ्यांना लसीकरण सत्राच्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था

•व्यापक प्रमाणात लसीकरणाबाबत जनजागृती तसेच इतर विभागांचा लसीकरणात सक्रिय सहभाग.

मिशन कवच कुंडल

राज्यात ८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत विशेष कोविड लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी गावांगावांमध्ये तसेच शहरी भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. लसीकरणाच्या दिवशी लाभार्थीना बोलविण्यासाठी गावातील स्वयंसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती यांना जबाबदारी देण्यात आली. ८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत या मोहिमेच्या माध्यमातून नागरीकांना १ कोटी २३ लाख मात्रा देण्यात आल्या.

मिशन युवा स्वास्थ अभियान

            सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ‘मिशन युवा स्वास्थ’ उपक्रम सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोविड १९ लसीकरण सत्र राबविण्यात आले.या दरम्यान राज्यात एकूण २३२ महाविद्यालयांमध्ये २ हजार ५८० लसीकरण सत्र आयोजित करुन विद्यार्थ्यांना १ लाख ८ हजार मात्रा देण्यात आल्या.

हर घर दस्तक अभियान

• ‘हर घर दस्तक’ अभियान ८ नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ अखेर संपूर्ण राज्यात राबविण्यात आले. १८ वर्षे व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिला डोस शंभर टक्के पूर्ण लसीकरण होईल याचे नियोजन करण्यात आले. ज्या नागरिकांचा लसीकरणाचा पहिला तसेच दुसरा डोस राहिला आहे, अशा नागरिकांना या मोहिमेअंतर्गत घरोघरी जावून आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे कोविड १९ लसीकरणाची माहिती देण्यात आली व त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येऊन नजीकच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आले. हर दस्तक या अभियानात ८ नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ अखेर ७१ लाख ६१ हजार ५४९ पहिली मात्रा आणि ८५ लाख २५ हजार ८५१ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली.

हर घर दस्तक अभियान २.०

            हर घर दस्तक अभियान २.० हे १ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत राबविण्यात आले. १२ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासोबतच तुरुंगातील कैद्याचे कोविड लसीकरण आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना वर्धित मात्रा मोहिमेअंतर्गत घरोघरी जावून आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे कोविड १९ लसीकरणाची माहिती घेण्यात आली. प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येऊन घरीच किंवा नजीकच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आले. १२ ते १८ वयोगटास पहिली मात्रा ३ लाख ३२ हजार ६४०, दुसरी मात्रा – ४ लाख २१ हजार ७४ तर १८ वर्षावरील दुसरी मात्रा ९ लाख २७ हजार ७७७, ६० वर्षावरील वर्धित मात्रा ९ लाख ९५, हजार १३९ नागरिकांना देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी दृष्टिक्षेपात

            आरोग्य कर्मचारी -१२ लाख ९५ हजार ६८८ पाहिली मात्रा, ११ लाख ९५ हजार ७२ दुसरी मात्रा तर ५ लाख १ हजार २५७ कर्मचाऱ्यांना वर्धित मात्रा देण्यात आली.

            फ्रंट लाईन वर्कर-२१ लाख ५० हजार २६६ पहिली मात्रा, २० लाख १० हजार ८२९ दुसरी मात्रा तर ७ लाख ७३ हजार २ फ्रंट लाईन वर्करना वर्धित मात्रा देण्यात आली.

            १२ ते १७ वर्षे वयोगटामध्ये ६८ लाख १३ हजार ३१० पहिली मात्रा, ४६ लाख ३७ हजार ८४४ मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

            १८ ते ५९ वर्षे वयोगटात ६ कोटी ७७ लाख ४३ हजार ६९ नागरिकांनी पहिली मात्रा, ५६ कोटी ५ लाख १६ हजार ६८० नागरिकांनी दुसरी तर ३३ लाख ५४ हजार ३७७ नागरिकांनी वर्धित मात्रा घेतली.

            ६० वर्षे व त्यावरील नागरिक या गटात १ कोटी ३३ लाख ८९ हजार ७२१ नागरिकांनी पहिली, ११ कोटी ५ लाख, ३१ हजार १८ नागरिकांनी दुसरी तर २७ लाख ११ हजार १४० नागरिकांनी वर्धित मात्रा घेतल्याची नोंद आहे.

            लसीकरणामध्ये हेल्थ वर्कर ४२ टक्केफ्रंट लाईन वर्कर ३९ टक्के१८ ते ५९ वर्षे वयोगट ७ टक्के६० वर्षे व त्यावरील नागरिक २७ टक्के नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.

            डॉ.सचिन देसाई-महाराष्ट्र राज्य लसीकरण अधिकारी-कोरोना नियंत्रणासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आणि दोन्ही मात्रा घेतलेल्यांनी लशीची वर्धित मात्रा घेणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेस चांगले सहकार्य केले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी गाफील राहून चालणार नाही. कोविड लसीकरणाच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन लशीची वर्धित मात्रा घेऊन कोरोनावर पूर्णपणे मात करुया!

 

संकलन

जिल्हा माहिती कार्यालय पुणे


Covid

 कोविड लसीकरण अमृत महोत्सव.

            ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ जुलै ते ३० सप्टेंबर (७५ दिवस) या कालावधीत १८ वर्षावरील सर्व नागरीकांना कोविड लशीची वर्धित मात्रा शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत देण्यात येत आहे. देशभरात ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका अद्यापही पुर्णत: टळलेला नसल्याने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वर्धित मात्रा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

            राज्यात कोविड लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी २०२१ पासून प्रारंभ झाला. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड लसीकरण मोहिमेची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धे (फ्रंट लाईन वर्कर) यांच्या लसीकरणाने मोहिमेची सुरुवात झाली. १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरीकांचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला, तर १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटाचा कोविड लसीकरणामध्ये समावेश करण्यात आला. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार २१ जून २०२१ पासून केंद्र शासनाकडून १८ वर्षे ते पुढील वयोगटाकरीता लस पुरविण्यात येत आहे.

कोविड वर्धित मात्रा महत्वाची

            १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे (फ्रंट लाईन वर्कर) व ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरीकांना वर्धित मात्रा देण्यास सुरुवात झाली. ज्या नागरीकांनी दुसरा डोस घेतल्यानंतर ३८ आठवडे अथवा ९ महिने पूर्ण केले असतील अशाच व्यक्तींना ही मात्रा देण्यास सुरुवात झाली. पहिली व दुसरी मात्रा ज्या लशीची घेतली त्याच लशीची वर्धित मात्रा घ्यायची आहे. कोरोना प्रतिबंधासाठी वर्धित मात्रा महत्वाची आहे.

वर्धित मात्रा घेण्याच्या कालावधीत बदल

            केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी कोव्होवॅक्स लस वापरास परवानगी देण्यात आली आहे. लस खाजगी केंद्रावर उपलब्ध आहे. १५ ते १७ वर्षे वयोगटासाठी कॉरबीव्हॅक्स लशीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली असून ही लस या वयोगटासाठी खाजगी केंद्रावरच घेता येणार आहे. स्पुटनिक लशीची वर्धित मात्रा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. १३ मे २०२२ पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशी व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत परदेशात सहभागी होणारे खेळाडू, आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी होणारे अधिकारी यांच्यासाठी वर्धित मात्रेचा कालावधी कमी करण्यात येऊन तो ९० दिवसांचा करण्यात आला आहे. ६ जुलै २०२२ पासून वर्धित मात्रा घेण्यासाठीचा कालावधीत ९ महिन्यावरुन ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण करण्यात आला आहे.

कोविड लसीकरणाचे ७५ दिवस

            १५ जुलै २०२२ पासून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ (७५ दिवस) या कालावधीत १८ वर्षावरील सर्व नागरीकांना वर्धित मात्रा शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत दिली जात आहे. १२ ऑगस्ट २०२२ पासून कॉरबीव्हॅक्स लशीचा वर्धित मात्रेसाठी वापर करण्यास केंद्र शासनाने सूचना दिल्या आहेत. आझादी का अमृतमहोत्सव अभियान अंतर्गत १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत ३ लाख ४४ हजार ५८५ नागरिकांना पाहिली, ७ लाख १३ हजार ५४४ नागरिकांना दुसरी, तर ३१ लाख ९३ हजार ११ नागरिकांना वर्धित मात्रा देण्यात आली आहे.

कोविड लसीकरणासाठी विशेष सत्र

            केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ज्या लाभार्थ्यांकडे ओळखपत्र नाही असे जेलमधील कैदी, भटक्या जमाती, मनोरुग्ण संस्थेतील लाभार्थी, भिकारी, वृद्धाश्रमातील लाभार्थी, रस्त्यालगत राहणारे, पुर्नवसन शिबिरात राहणारे इत्यादीसाठी कोविड लसीकरण विशेष सत्र आयोजित करुन लसीकरण केले जाते.

१५ ते १८ वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस

            केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार स्तनदा मातांकरीता आणि गरोदर महिलांकरीता जुलै २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जागेवरुन हालचाल न करता येणाऱ्या व्यक्तींकरीता जुलै २०२१ पासून कोविड लसीकरण करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना तिसऱ्या लाटेतील विषाणूच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता ३ जानेवारी २०२२ पासून १५ वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. १५ ते १८ वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येत आहे. या लसीकरणामुळे शाळा सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत झाली आहे.

१२ पूर्ण ते १४ वर्ष वयोगटासाठी कॉरबीव्हॅक्स लसीचा वापर

            १६ मार्च २०२२ पासून १२ वर्ष व त्यावरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्यात आले. वय वर्ष १२ पूर्ण ते १४ वर्ष या वयोगटासाठी कॉरबीव्हॅक्स लशीचा वापर करण्यात येत आहे. तसेच ६० वर्षावरील सर्व नागरीकांना वर्धित मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १८ ते ५९ वयोगटातील नागरीकांना केंद्रामार्फतदेखील वर्धित मात्रा देण्यात येत आहे.

Continue 

 महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2022 ची 8.90 टक्के दराने परतफेड

             मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.90 टक्के कर्जरोखे 2022 ची अदत्त शिल्लक रकमेचे परतफेड दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

             महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि. 14 सप्टेंबर 2012 अनुसार 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 19 सप्टेंबर 2022 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 20 सप्टेंबर, 2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 20 सप्टेंबर 2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.


            सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.


            तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.


            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.


            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, अशी माहिती वित्तीय सुधारणा विभागाच्या सचिव शैला ए. यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.


*****



Featured post

Lakshvedhi